Sunday , September 20 2026
Breaking News

दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या धडकेत एक जण ठार

Spread the love

 

चिक्कोडी : चिक्कोडी तालुक्यातील करोशी गावात दोन दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या धडकेत एका माजी सैनिकाचा जागीच मृत्यू झाला तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले.माजी सैनिक मलगौडा बसगौडा पाटील हे या अपघातात जागीच ठार झाले. ते मूळचे चिक्कोडी तालुक्यातील मुगळी गावचे आहेत. मयत मलगौडा पाटील हे त्यांचे नातेवाईक लक्ष्मी पाटील यांच्यासह मुगळी गावातून चिक्कोडीच्या दिशेने दुचाकीने जात होते. गंगाधर कोते हे चिक्कोडीहून करोशी गावाकडे येत होते.

करोशी गावातील घट्टी बसवेश्वर मंदिराजवळ या दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. यात गंभीर जखमी झालेल्या माजी सैनिक मलगौडा पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्या पाठीमागे बसलेली लक्ष्मी पाटील तसेच दुसरे दुचाकीस्वार गंगाधर कोते हे अपघातात गंभीर जखमी झाले. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वाहतूक पोलिस ठाण्याचे पीएसआय अनिल अम्मीनभावी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी चिक्कोडी वाहतूक पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *