Sunday , September 20 2026
Breaking News

खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वपूर्ण बैठक रविवारी

Spread the love

 

खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वपूर्ण बैठक रविवार दिनांक 28 ऑगस्ट रोजी सकाळी ठीक 11 वाजता शिवस्मारक खानापूर येथे बोलाविण्यात अली आहे. यावेळी भाग्यलक्ष्मी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार कै. निळकंठराव सरदेसाई यांचा पुतळा कारखाना आवारात उभारण्यात येणार आहे. यासंदर्भात पाठिंबा दर्शविण्यासाठी आपले विचार व्यक्त करावयाचे आहेत. तसेच संघटना बळकटी संदर्भात विचारविनिमय करण्यात येणार आहेत. त्यासाठी खानापूर तालुक्यातील समितीप्रेमी नागरिकांनी बैठकीला उपस्थित रहावे, असे आवाहन माजी आमदार दिगंबर पाटील यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *