Wednesday , December 17 2025
Breaking News

Classic Layout

फुलबाग गल्ली येथे समाज प्रमुखांसमवेत आमदार अनिल बेनके यांची बैठक

  बेळगाव : सोमवार दिनांक 22 ऑगस्ट 2022 रोजी फुलबाग गल्ली येथे समाज प्रमुखांसमवेत बेळगांव उत्तर मतदारसंघाचे आमदार अनिल बेनके यांनी बैठक घेतली. बेळगांव उत्तर भागातील चालु असलेली विविध विकासकामे तसेच आगामी विकासकामांबद्दल आमदार अनिल बेनके यांनी समाज प्रमुखांची बैठक घेतली आणि समाजप्रमुखांच्या मागणीनुसार बेळगांवमध्ये लवकरच हायटेक गो-शाळा बांधण्यात येणार …

Read More »

निपाणीत उद्या प्रथमच 51 हजाराची दहीहंडी

  युवा नेते उत्तम पाटील यांची उपस्थिती : गडहिंग्लजचे पालकर संघ फोडणार दहीहंडी निपाणी (वार्ता) : येथील चाटे मार्केट व्यापारी मित्र मंडळातर्फे 36 व्या वर्षी बुधवारी (ता.24) सायंकाळी 5 वाजता चाटे मार्केटमध्ये प्रथमच हजाराची दहीहंडी होणार आहे. बोरगाव येथील युवा नेते उत्तम पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत गडहिंग्लज येथील नेताजी पालकर …

Read More »

मत्तिवडे कुस्ती मैदानात इचलकरंजीच्या श्रीमंत भोसलेची बाजी

  श्रावणानिमित्त आयोजन : हजारो कुस्ती शौकिनांची उपस्थिती कोगनोळी : श्रावण महिन्याच्या निमित्ताने जय हनुमान तालीम मंडळ व समस्त ग्रामस्थ मत्तिवडे तालुका निपाणी येथे आयोजित कुस्ती मैदानात प्रदीप ठाकूर सोलापूर व श्रीमंत भोसले इचलकरंजी यांच्यात झालेल्या कुस्तीत श्रीमंत भोसले यांनी बाजी मारून रोख रक्कम व ढाल पटकावली. ग्रामपंचायत सदस्य राजेश …

Read More »

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष वाद आता घटनापीठाकडे; 25 ऑगस्टपासून नवा अध्याय सुरू

  नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुनावणी आता 5 सदस्यांच्या खंडपीठाकडे वर्ग करण्यात आले आहे. या प्रकरणाची सुनावणी आता 25 ऑगस्ट रोजी होणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाकडून यावेळी नमूद करण्यात आले आहे. याशिवाय, धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह नेमकं कुणाचे? या मुद्द्यावर आज दुपारी 3 वाजता नियोजित असलेली सुनावणी देखील दोन दिवसांसाठी …

Read More »

निपाणीतील दोन दुकाने आगीच्या भक्षस्थानी

सहा लाखाचे नुकसान : शॉर्टसर्किटने आग लागल्याचा संशय निपाणी (विनायक पाटील) : येथील भाग्यश्री वाईन शेजारी असलेल्या एंटरप्राइजेस आणि एसआरएस सलून दोन दुकानांना सोमवारी (ता.22) मध्यरात्री बाराच्या सुमारास आग लागून दोन्ही दुकानातील सर्वच साहित्य बेचिराख झाले आहे. या घटनेत दोन्ही दुकानांचे सुमारे सहा लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अग्निशामक …

Read More »

टिकटॉक स्टार आणि भाजपा नेत्या सोनाली फोगट यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

  मुंबई : प्रसिद्ध टिकटॉक स्टार आणि भाजपा नेत्या सोनाली फोगट यांचे निधन झाले आहे. त्या 41 वर्षांच्या होत्या. आज (23 ऑगस्ट) सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाच्या बातमीने अनेकांना धक्का बसला. यामुळे लाखो चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, …

Read More »

प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपाचे आमदार टी राजा सिंह यांना अटक

  हैदराबाद : प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत भाजपाचे आमदार टी राजा सिंह यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. युट्यूबवर राजा यांनी केलेल्या वक्तव्यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हैदराबाद शहरामध्ये सोमवारी रात्री अचनाक अनेक पोलीस स्थानकांच्या बाहेर मोठ्या संख्येने जमाव गोळा होण्यास सुरुवात झाली. यामुळे शहरामध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली …

Read More »

सार्वजनिक श्रीगणेशोत्सव महामंडळाकडून विविध मागण्यांसंदर्भात पोलिस आयुक्तांना निवेदन सादर

  बेळगाव : मध्यवर्ती सार्वजनिक श्रीगणेशोत्सव महामंडळ बेळगावतर्फे पोलिस आयुक्तांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. प्रामुख्याने गणेशोत्सव काळात उदभवणाऱ्या समस्यांबाबत चर्चा करण्यात आली. शहरात सुमारे 357 हुन अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहेत. या मंडळांना विविध परवानग्या घ्याव्या लागतात त्यासाठी जिल्हा प्रशासनाने जुन्या मनपा इमारतीत, टिळकवाडी येथील येथील मनपा कार्यालय, तसेच …

Read More »

नंदगड विभागीय स्पर्धेमध्ये मलप्रभा हायस्कुल चापगावचे यश

खानापूर (प्रतिनिधी) : चापगाव (ता. खानापूर) येथील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण संस्थेच्या मलप्रभा हायस्कूल च्या खेळाडूंनी नांदेड विभागीय क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले आहे. सांघीक खेळामध्ये खो-खो मुले – प्रथम क्रमांक खो – खो मुली – प्रथम क्रमांक कब्बड्डी मुले – प्रथम क्रमांक ४×१०० रिले मुले – प्रथम क्रमांक कब्बड्डी …

Read More »

खानापूर-रामनगर रस्त्यासंदर्भात जाब विचारताच अधिकाऱ्यांनी केली पाहणी!

  खानापूर : खानापूर-रामनगर राष्ट्रीय महामार्गावर पडलेल्या खड्ड्याच्या दुरावस्थेसंदर्भात आज पुन्हा खानापूर येथील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या कार्यालयात जाऊन जाब विचारून त्यांना धारेवर धरण्यात आले. त्यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जाऊन रस्त्याच्या दुरावस्थेची पाहणी केली. तातडीने नवीन कंत्राट घेतलेल्या कंत्राटदाराशी संपर्क साधला आणि त्यांना रस्त्याच्या दयनीय परिस्थितीची जाणीव करून देण्यात आली. गेल्या …

Read More »