Monday , September 21 2026
Breaking News

खानापूर-रामनगर रस्त्यासंदर्भात जाब विचारताच अधिकाऱ्यांनी केली पाहणी!

Spread the love

 

खानापूर : खानापूर-रामनगर राष्ट्रीय महामार्गावर पडलेल्या खड्ड्याच्या दुरावस्थेसंदर्भात आज पुन्हा खानापूर येथील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या कार्यालयात जाऊन जाब विचारून त्यांना धारेवर धरण्यात आले. त्यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जाऊन रस्त्याच्या दुरावस्थेची पाहणी केली. तातडीने नवीन कंत्राट घेतलेल्या कंत्राटदाराशी संपर्क साधला आणि त्यांना रस्त्याच्या दयनीय परिस्थितीची जाणीव करून देण्यात आली.

गेल्या दोन दिवसामध्ये तहसीलदार यांना शिंदोली ग्राम पंचायतच्या माध्यमातून निवेदन दिले होते. त्या संदर्भात पाठपुरावा केल्यामुळे आज नवीन रस्ता कंत्राटदार रोडची पाहणी करण्यासाठी आले. रस्ता अभियंता निलेश कापसे यांनी दुरावस्था झालेल्या रोडची पाहणी केली. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. दुरावस्था झालेल्या रस्त्याची पाहणी करण्यासाठी आलेल्या रस्ता अभियंता निलेश कापसे यांना शिंदोली ग्रा. पं. चे सदस्य प्रा. शंकर गावडा, तालुका ग्रामपंचायत असोसिएशनचे अध्यक्ष विनायक मुतगेकर, शिंदोळी ग्रामपंचयतचे अध्यक्ष राजेश पाटील यांनी होनकल ते रामनगर पर्यंत खराब झालेला रस्ता अभियंता निलेश कापसे यांच्या निदर्शनास आणून दिला. तातडीने रस्ता दुरुस्ती करून नागरिकांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी त्वरित दखल देण्याची विनंती केली…

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *