Wednesday , December 17 2025
Breaking News

Classic Layout

तोपिनकट्टीत माऊली यात्रेला प्रारंभ

खानापूर (प्रतिनिधी) : तोपिनकट्टी (ता. खानापूर) येथे दर तीन वर्षातून एकदा होणार्‍या माऊली देवीच्या यात्रेला शुक्रवारी दि. 19 ऑगस्टपासून प्रारंभ झाला आहे. मंगळवारी दि. 23 रोजी यात्रेची सांगता होणार आहे. यात्रेचा प्रारंभ शुक्रवारी दि. 19 रोजी झाला. यावेळी सकाळी 10.30 वाजता गार्‍हाणे घालून गावची सीम बांधण्यात आली. या पाच दिवसांत …

Read More »

चापगाव येथे गोकुळाष्टमी उत्साहात साजरी

  खानापूर : चापगाव येथे गोकुळाष्टमी उत्साहात साजरी करण्यात आली. चापगाव येथील भजनी मंडळ व ग्रामस्थांनी मिळून रात्रभर भजन व किर्तनाचा कार्यक्रम सादर केला आला. त्यानंतर महाकाला पार पडला. त्यानंतर श्रीकृष्णाच्या मूर्तीची वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली व कृष्णमंदिराचा दहावा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमेश धाबाले यांनी केले. …

Read More »

खानापूर, बेळगावच्या श्रीकृष्ण हणबर गवळी समाजाचा पुण्यात वार्षिक स्नेहमेळावा संपन्न

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर, बेळगाव भागातील श्रीकृष्ण हणबर गवळी समाज पुण्यात स्थायिक असून या श्रीकृष्ण हणबर गवळी समाजातील बांधवांचा पुण्यातील वारजे माळवाडी येथील कम्युनिटी हॉलमध्ये वार्षिक स्नेह मेळाव्याचे आयोजन मोठ्या उत्साहात पार पडले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्या डी. आर. करणुरे सर व सौ. करणुरे, श्रीमती नंदा पाटील, समाजाचे …

Read More »

खानापूरात अंगणवाडी कर्मचार्‍यांचा विविध मागण्यांसाठी मोर्चाद्वारे तहसीलदाराना निवेदन

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील अंगणवाडी शिक्षिका व सहाय्यिका यांच्यावतीने आपल्या विविध मागण्यासाठी तहसील कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन दिले. यावेळी अंगणवाडी शिक्षिका व सहाय्यिकाचा मोर्चा शिवस्मारक चौकातून तहसील कार्यालयावर काढण्यात आला. यावेळी अंगणवाडी संघटनेच्या मेघा मिठारी यांच्या नेतृत्वाखाली निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, अंगणवाडीच्या शिक्षिका व …

Read More »

सलग 21 वर्षे नामजप सोहळ्याबद्दल महादेव मंदिरतर्फे चंद्रकुडे दाम्पत्यांचा सत्कार

  निपाणी (वार्ता) : येथील महादेव गल्ली मधील पुरातन महादेव मंदिरात दिवंगत शिवपुत्रप्पा कोठीवाले यांच्या मार्गदर्शनाखाली श्रावण महिन्यात सलग 21 वर्षे जपनाम कार्यक्रम सेवा सुरू आहे. त्याबद्दल महादेव मंदिर देवस्थान ट्रस्ट कमिटीतर्फे सदानंद चंद्रकुडे व मंगल चंद्रकुडे दाम्पत्य, महालिंग काठीवाले, रुमा कोठीवाले दाम्पत्यांचा समाधी मठामधील मठाधीश प्राणलींग स्वामी यांच्या हस्ते …

Read More »

नगरसेवकाने स्वखर्चाने बसवले पथदीप

  शौकत मणियार यांचा उपक्रम : नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे घेतला निर्णय निपाणी (वार्ता) : शहराबाहेरील वॉर्ड नंबर 19 मधील संभाजीनगर परिसरात नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या परिसरात मूलभूत सुविधा देण्याची मागणी नगरसेवक शौकत मणियार यांनी नगरपालिका प्रशासनाकडे बर्‍याचदा केली होती. शिवाय संभाजी महाराज बर्‍याच ठिकाणी पथदीप नसल्याने रात्रीच्या …

Read More »

रस्त्यावरच्या कचर्‍यासाठी नगरसेविका रस्त्यावर

  पठाडे दाम्पत्यांनी केली जनजागृती : कचरा घंटागाडीला देण्याचे आवाहन निपाणी (वार्ता) : शहर आणि उपनगरातील कचरा उठाव करण्यासाठी नगरपालिकेतर्फे घंटागाड्या उपलब्ध केल्या आहेत. तरीही काही वेळा घंटा गाड्या कचरा उचलण्यासाठी येत नसल्याने अथवा उशिरा आल्याने वार्ड क्रमांक 13 मधील नागरिक रस्त्यावरच कचरा टाकत होते. परिणामी दुर्गंधीचा सामना नागरिकांनाच करावा …

Read More »

तालुका, जिल्हा पंचायत अस्तित्वअभावी गैरसोय

  राजेंद्र वडर : अनेक कामावर परिणाम निपाणी (वार्ता) : गेल्या सव्वा वर्षांपासून तालुका आणि जिल्हा पंचायत अस्तित्वात नसल्याने जिल्हा पंचायत अधिकार्‍यांवर अंकुश ठेवण्यासाठी कोणी नाही. त्यामुळे नागरिकांचे कोणतेही काम होत नसल्याने निवडणुकीबाबत ताबडतोब निर्णय घेण्याची मागणी माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र वडर यांनी केली आहे. वडर म्हणाले, ग्राम पंचायत, …

Read More »

संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत ५ सप्टेंबरपर्यंत वाढ

  मुंबई : पत्राचाळ मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अटकेत असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांना आज पुन्हा पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्यांच्या न्यायालयीन कोठडीत ५ सप्टेंबरपर्यंत वाढ केली आहे. यापूर्वी न्यायालयाने संजय राऊत यांना २२ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यापूर्वी ते ईडी (सक्तवसुली संचालनालय) कोठडीत होते. …

Read More »

बिबट्याला जेरबंद करण्यासाठी मोहीम तीव्र

  बेळगाव : बेळगावातील हिंडलगा रोडवर (वनिता विद्यालयाजवळ) आज सकाळी बिबट्या दिसल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस व वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी मोहीम तीव्र केली. आमदार अनिल बेनके, जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन कारवाईची माहिती घेतली. पोलिस उपायुक्त रवींद्र गडाडी आदी उपस्थित होते.

Read More »