Wednesday , December 17 2025
Breaking News

Classic Layout

‘ना नफा ना तोटा’ अथर्व फाउंडेशनची दुसरी लॅब बेळगावात सुरु

  बेळगाव : अथर्व फाउंडेशन या संस्थेच्या वतीने गेल्या वर्षी गणेश चतुर्थीला सोमवार पेठ टिळकवाडी येथे सुरू करण्यात आलेल्या लॅबोरेटरीला मिळालेला प्रतिसाद आणि शहरी विभागातील नागरिकांची मागणी लक्षात घेऊन अथर्वच्या वतीने कडोलकर गल्ली बेळगाव येथे रविवारी आणखी एक रक्त-लघवी कलेक्शन केन्द्राचा प्रारंभ करण्यात आला. उत्तर विभागाचे आमदार अनिल बेनके व …

Read More »

टिपू सुलतान चार वेळा इंग्रजांविरुद्ध लढले, सावरकरांनी चार वेळा माफी मागितली : असदुद्दीन ओवैसी

नवी दिल्ली : कर्नाटकमध्ये शिवमोगा येथे स्वातंत्र्यवीर सावरकर आणि टिपू सुलतान यांचे फलक लावण्यावरून १५ ऑगस्ट रोजी दोन गटांत मोठा वाद झाला. या वादामध्ये एकावर चाकूहल्ला करण्यात आला होता. या घटनेनंतर येथे तणाव निर्माण झाल्यामुळे जमावबंदीचे आदेश देण्यात आले होते. दरम्यान, याच घटनेचा संदर्भ देत एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी …

Read More »

निपाणीत २८ रोजी माऊली अश्वाचा गोल, उभा रिंगण सोहळा

निपाणी (वार्ता) : विठू माऊली व श्रीमंत सिद्धोजीराजे निपाणकर यांच्या आशीर्वादाने निपाणीत प्रथमच श्री संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या अश्वाचे गोल व उभे रिंगण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा रिंगण सोहळा रविवारी (ता. २८) दुपारी म्युनिसिपल हायस्कूल मैदानावर होणार आहे. याचा लाभ निपाणीसह परिसरातील वारकरी भाविकांनी घ्यावा, असे आवाहन श्रीमंत …

Read More »

निपाणीवासीयांना लवकरच २४ तास पाणी

मंत्री शशिकला जोल्ले : जवाहर तलावावर गंगापूजन निपाणी (वार्ता) : यावर्षी निसर्ग आणि पावसाने चांगली साथ दिल्याने शहरवासीयांना पाणीपुरवठा करणारा येथील जवाहर तलाव भरून ओसंडून वाहत आहे. त्या पाण्याचे पूजन आता झाले असून लवकरच शहर आणि उपनगरातील सर्वच विभागाला २४ तास पाणी उपलब्ध होणार असल्याची माहिती मंत्री शशिकला जोल्ले यांनी …

Read More »

क्रिडा स्पर्धेत किरावळे शाळेचे यश

  खानापूर (विनायक कुंभार) : गुंजी येथे नुकत्याच पार पडलेल्या विभागीय क्रीडा स्पर्धांमध्ये किरावळे शाळेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. मुलींच्या कबड्डी संघाने प्रथम क्रमांक मिळविला आहे. तसेच वैयक्तिक क्रीडा स्पर्धामध्ये जयश्री ज्योतिबा गोडसे हिने १०० मी धावणे व लांब उडी मध्ये प्रथम क्रमांक, आरती संजय नाईक हिने ४० …

Read More »

येळ्ळूर ग्राम पंचायत सदस्यांकडून स्मशानभूमी झाली स्वच्छ

बेळगाव : येळ्ळूर येथील मुख्य स्मशानभूमी गेली कित्येक महिने अस्वच्छ होती. यामुळे याठिकाणी गावातील भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला होता. व डासांचा पैदास वाढला होता. याची दखल घेऊन येळ्ळूर ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश बा. पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन स्मशान स्वच्छता केली. यावेळी ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश बा. पाटील, ग्राम …

Read More »

कोगनोळी परिसरात सार्वजनिक गणेश मंडळाच्या तयारीला वेग

कोगनोळी : गणेश उत्सव अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपला असताना कोगनोळी, हणबरवाडी, दत्तवाडी, सुळगाव, मतिवडे, हंचिनाळ आदी परिसरातील सार्वजनिक गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांची लगबग सुरू असल्याचे दिसून येऊ लागले आहे. सलग दोन वर्षे कोरोना काळ असल्याकारणाने गणेश उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला होता. यामुळे युवक मंडळांच्या मध्ये मोठी नाराजी पसरली …

Read More »

सदलगा येथील नवजीव हिप्पोकॅम्पस लेअरनिंग सेंटर शाळेत कृष्णाजन्माष्टमी

  चिक्कोडी : सदलगा येथील नवजीव हिप्पोकॅम्पस लेअरनिंग सेंटर सदलगा या शाळेत आज कृष्णाजन्माष्टमी निमित्त राधाकृष्ण वेशभूषा करून जन्माष्टमी साजरी करण्यात आली. यावेळी मुलांना कृष्णाजन्मची कथा सांगण्यात आली. मुख्याध्यापक राजू गस्ती, सहशिक्षीका सुरेखा दोडमनी तसेच हेल्पर दिपाली तांदळे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. यावेळी विद्यार्थी पालक तसेच शिक्षकवृंद …

Read More »

कुस्तीपटू लक्ष्मी पाटील यांना आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याकडून अभिनंदन!

  बेळगाव : हरियाणा येथे २४ ते २७ ऑगस्ट या कालावधीत होणाऱ्या फेडरेशन चषक – हरियाणा रोटक २०२२ या ५४ किलो गटातील कुस्ती स्पर्धेत सहभागी होणार्‍या हलगा बस्तवाड गावातील लक्ष्मी संजय पाटील हिचे बेळगाव ग्रामीण मतदारसंघाच्या आमदार लक्ष्मीबाई हेब्बाळकर यांनी अभिनंदन केले. लक्ष्मीच्या धाडसाचे आणि शौर्याचे कौतुक करून आमदार हेब्बाळकर …

Read More »

डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर जे. जे. रुग्णालयात दाखल

  मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याला जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रकृती अस्वास्थामुळे त्याला जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. इक्बाल कासकर याला रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. इक्बाल कासकर याला शनिवारी दुपारनंतर …

Read More »