Monday , September 21 2026
Breaking News

डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर जे. जे. रुग्णालयात दाखल

Spread the love

 

मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याला जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रकृती अस्वास्थामुळे त्याला जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. इक्बाल कासकर याला रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

इक्बाल कासकर याला शनिवारी दुपारनंतर अचानकपणे त्रास जाणवू लागला. त्यानंतर त्याला तळोजा तुरुंगातून मुंबईतील जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हृदयाशी संबधित त्रासामुळे इक्बालला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

About Belgaum Varta

Check Also

फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; ११ कामगारांचा मृत्यू

Spread the love    कारखाना जमीनदोस्त; अनेक जण गंभीर जखमी, बचावकार्य सुरू कौशांबी (उत्तर प्रदेश) …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *