Wednesday , December 17 2025
Breaking News

Classic Layout

कॉंग्रेसच्या फ्रीडम वॉकला मोठा प्रतिसाद

बंगळूर : देशाच्या स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त काँग्रेसला २०२३ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांचे मनोबल वाढवण्याची एक संधी प्राप्त झाली. पक्षाने आयोजित केलेल्या फ्रीडम वॉकला मोठा प्रतिसाद मिळाला. कॉंग्रेसला फ्रीडम वॉकपेक्षा चांगली संधी मिळू शकली नसती. पक्षाने या कार्यक्रमाला अराजकीय असे म्हटले असले तरी, मिरवणुकीच्या सांगता समारंभात भाजपला लक्ष्य करणाऱ्या …

Read More »

एसडीव्हीएस शिक्षण संस्थेत स्वातंत्र्य दिनी शानदार पथसंचलन..

  संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर श्री दुरदुंडीश्वर विद्या संवर्धक शिक्षण संस्थेत एनसीसी छात्रांच्या शानदार पथसंचलनाने आझादी का अमृतमहोत्सव सोहळा उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. एस.डी. हायस्कूल मैदानावर शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष माजी मंत्री ए. बी. पाटील यांनी ध्वजारोहण केले. महाविद्यालयीन एनसीसी छात्रांनी शानदार पथसंचलन सादर केले. शिक्षण संस्थेच्या शाळा-महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी …

Read More »

बेळगाव वार्ताचे पत्रकार संजय पाटील यांना “भारत कर्तव्यम्” समाजभूषण पुरस्कार

  पद्मश्रीकार डॉ. रविंद्र कोल्हे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान बेळगाव : शामरंजन बहुद्देशिय फाऊंडेशन मुंबई व विद्यार्थी विकास अकादमी महाराष्ट्र यांच्या वतीने बेळगाव येथील लोकमान्य रंगमंदिर येथे आयोजित राष्ट्रीय संस्कृती संमेलनात यंदाचा “भारत कर्तव्यम्” समाज भूषण पुरस्कार चंदगड पत्रकार संघाचे सदस्य व बेळगाव वार्ताचे पत्रकार संजय केदारी पाटील यांना प्रदान करण्यात आला. …

Read More »

मराठा मंडळमध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहाने साजरा

  बेळगाव : मराठा मंडळ बेळगाव या शिक्षण संस्थेच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मराठा मंडळ चव्हाट गल्ली बेळगाव येथे मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. संस्थेचे अध्यक्षा सौ. राजश्री नागराजु (हलगेकर) यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे संचालक मंडळ, विश्वस्त मंडळ, मराठा मंडळ शिक्षण संस्थेचा प्रशासकीय वर्ग, कॉलेजचे प्राध्यापक, प्राचार्य, …

Read More »

’अथणी शुगर्स’मध्ये स्वातंत्र्यदिन साजरा

विद्यार्थ्यांकडून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन अथणी : केंपवाड येथील अथणी शुगर्स लि., च्या प्रांगणात 75 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. सौ. उज्वलाताई श्रीमंत पाटील प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कारखान्यातील सुरक्षा विभाग, येथील आदर्शन कॉन्व्हेंट स्कूल व केंपवाड येथील विद्यार्थ्यांंनी प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली. …

Read More »

उगार खुर्दला क्रांतीवर संगोळ्ळी रायण्णा जयंती जल्लोषात

  अथणी : येथे क्रांतीवर संगोळ्ळी रायण्णा जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. युवानेते श्रीनिवास श्रीमंत पाटील यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन झाले. तत्पूर्वी निघालेल्या भव्य मिरवणुकीत त्यांनी सहभाग घेत युवकांना मार्गदर्शन केले. श्रीनिवास पाटील म्हणाले, कित्तूर राणी चन्नम्मा यांचा उजवा हात म्हणून ओळखले जाणारे क्रांतीवीर संगोळ्ळी रायण्णा यांचे स्वातंत्र्य लढ्यात मोठे …

Read More »

संकेश्वर श्रींनी इतिहास रचला, मठावर झेंडा फडकविला..

  संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर ग्रामदैवत श्री शंकराचार्य संस्थान मठावर श्री सच्चिदानंद अभिनव विद्यानू्सिंह भारती महास्वामीजींनी ध्वजारोहण करुन नवा इतिहास रचला आहे. मठाच्या इतिहासात प्रथमच भगव्या ध्वजाबरोबर तिरंगा डौलाने फडकविणाचे कार्य श्रींनी करुन दाखविले आहे. स्वातंत्रदिनी श्री शंकराचार्य संस्थान मठावर श्रींच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. भक्तगणांनी अभिमानाने राष्ट्रगीत सादर …

Read More »

गणेशपूर येथील संतमीरा इंग्रजी स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिन साजरा

बेळगाव (प्रतिनिधी) : संतमीरा इंग्लिश मेडीयम स्कूलतर्फे स्वातंत्र दिन उत्साहात संत मीरा इंग्लिश मीडियम स्कूल गणेशपुर हिंडलगा येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून मधुकर गुर्लहोसूर हे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी रामनाथ नाईक यांनी स्वातंत्र्याबद्दल आपले विचार व्यक्त केले. यावेळी नर्सरी ते सहावीच्या …

Read More »

संकेश्वरात उद्या “आरंभ” नॅशनल लेवल फेस्टचे आयोजन

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरात मंगळवार दि. १७ ऑगस्ट २०२२ रोजी एसडीव्हीएस शिक्षण संस्था संचलित अन्नपूर्णा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट रिसर्च (एमबीए) काॅलेजतर्फे “आरंभ” नॅशनल लेवल फेस्टचे भव्य आयोजन करण्यात आल्याची माहिती संचालिका डॉ. विद्या स्वामी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. त्या पुढे म्हणाल्या, गेली सात वर्षे झाली “आरंभ” फेस्टने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी …

Read More »

जिल्हा मराठी पत्रकार संघाच्यावतीने स्वातंत्र्य दिन साजरा

  बेळगाव : बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. पत्रकार संघाचे अध्यक्ष विलास अध्यापक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात झाले. यावेळी उपाध्यक्ष महेश काशीद, कार्यवाह शेखर पाटील, माजी अध्यक्ष कृष्णा शहापुरकर, सुहास हुद्दार, मधू पाटील, दिनेश नाईक, कृष्णा कांबळे, दीपक सुतार आदी उपस्थित होते. …

Read More »