Monday , September 21 2026
Breaking News

’अथणी शुगर्स’मध्ये स्वातंत्र्यदिन साजरा

Spread the love

विद्यार्थ्यांकडून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
अथणी : केंपवाड येथील अथणी शुगर्स लि., च्या प्रांगणात 75 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. सौ. उज्वलाताई श्रीमंत पाटील प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
कारखान्यातील सुरक्षा विभाग, येथील आदर्शन कॉन्व्हेंट स्कूल व केंपवाड येथील विद्यार्थ्यांंनी प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली. या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. त्यांना बक्षिसे देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी जनरल मॅनेजर आर. एल. लटके, केंपवाडचे प्रख्यात डॉ. नामदेव शिरगुप्पी, भास्कर पाटील, चिफ इंजिनिअर चंद्रकांत पाटील, लेबर ऑफिसर संजीवकुमार कायापुरे, आय. टी. विभागाचे ए. आय. गड्डेकर यांच्यासह कारखान्याच्या विविध विभागातील प्रमुख, अधिकारी, कर्मचारी यांच्यासह दोन्ही शाळेचे शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांना मिठाई वाटून आजादी का अमृत महोत्सव साजरा करण्यात आला.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *