Wednesday , December 17 2025
Breaking News

Classic Layout

नंदगड येथील क्रांतीवीर संगोळी रायण्णा समाधी परिसराची भाजपाच्यावतीने स्वच्छता

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील नंदगड येथील प्रसिद्ध क्रांतीवीर संगोळी रायण्णा समाधीचा परिसर खानापूर तालुका भाजप पक्षाच्यावतीने अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाचे औचित्यसाधून स्वच्छ करण्यात आला. यावेळी समाधीच्या आवारातील पालापाचोळा, कचरा काढून टाकण्यात आला. फरशी झाडून पुसून स्वच्छ केली. क्रांतीवीर संगोळी रायण्णाच्या पुतळ्याची स्वच्छता करण्यात आली. त्यानंतर पुष्पहार अर्पण करून अभिवादन …

Read More »

खानापूरात हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत जनजागृतीची रॅली

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरात हर घर तिरंगा या उपक्रमांतर्गत दि. 13 ते 15 ऑगस्टपर्यंत घरोघरी तिरंगा फडकविण्यासाठी खानापूर शहरासह तालुक्यातील नागरिकांनी सहभागी व्हावे यासाठी मोटरसायकलवरून जनजागृती रॅलीचे नियोजन करण्यात आले. पणजी – बेळगांव महामार्गावरून शिवस्मारकातून रॅलीचे नियोजन करण्यात आले. यावेळी खानापूर तालुक्याचे दंडाधिकारी प्रविन जैन, नगरपंचायतीचे नगराध्यक्ष मजहर …

Read More »

भिंत कोसळून महिला जखमी, बिदरभावीतील घटना

  खानापूर (विनायक कुंभार) : तोपिनकट्टी ग्रा. पं. क्षेत्रातील बिदरभावी येथे घराची भिंत कोसळून महिला गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि. 12 रोजी सकाळी 10 च्या सुमारास घडली. लक्ष्मी विनोद पाटील असे जखमी महिलेचे नाव आहे. लक्ष्मी या सकाळी स्वयंपाक करत असताना अचानक त्यांच्या अंगावर भिंत कोसळून त्या खाली सापडल्या. …

Read More »

महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे

  आशिष शेलार यांच्याकडे मुंबईची जबाबदारी मुंबई : राज्यातील मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर भाजपने त्यांच्या नव्या कार्यकारिणीची घोषणा केली असून चंद्रशेखर बावनकुळे यांचेकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी तर आशिष शेलार यांच्याकडे मुंबईची जबाबदारी देण्यात आली आहे. भाजपच्या चंद्रकांत पाटील यांची मंत्रिमंडळात वर्णी लागल्यानंतर भाजपने ही नवीन कार्यकारिणी जाहीर केली आहे. आशिष शेलार हे या …

Read More »

पंचगंगेची पाणी पातळी स्थिर असल्याने दिलासा

  कोल्हापूर : गेल्या 48 तासांमध्ये कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्ये पावसाने उघडीप दिली आहे. गेल्या 24 तासांमध्ये पंचगंगेची पातळी स्थिर असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. आज सकाळी 11 वाजता राजाराम बंधार्‍यावर पंचगंगा नदीची पाणीपातळी 41 फूट 7 इंच होती. गेल्या 24 तासात पासून पंचगंगेची पातळी स्थिर आहे. जिल्ह्यातील 76 बंधारे पाण्याखाली …

Read More »

विमल फौंडेशन आणि भाजपा नेते किरण जाधव यांच्यावतीने ‘हर घर तिरंगा’ उपक्रमातंर्गत जनजागृती

बेळगाव : भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त बेळगाव शहरात विविध ठिकाणी विमल फौंडेशन आणि भाजपा नेते किरण जाधव यांच्यावतीने जनजागृती व ध्वज वितरण करण्यात आले. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त तसेच स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती देणार्‍या लाखो स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण करण्यासाठी ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमातंर्गत 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत एकत्र …

Read More »

मराठी पत्रकार संघातर्फे उद्या आचार्य अत्रे यांची जयंती

  बेळगाव : बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे उद्या  शनिवार दि. १३ ऑगस्ट रोजी आचार्य अत्रे यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ५.३० वाजता कुलकर्णी गल्ली येथील पद्मावती चेंबर मधील पत्रकार संघाच्या कार्यालयात सदर कार्यक्रम होणार आहे. पत्रकार संघाचे सदस्य, हितचिंतक आणि नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, …

Read More »

कुंभार्डाजवळ खासगी बस झाडावर आदळून तिघे जखमी

  खानापूर : रामनगर-बेळगाव मार्गावरील कुंभार्डाजवळ खासगी बस झाडावर आदळल्याने झालेल्या अपघातात ड्रायव्हर आणि कंडक्टरसह एक प्रवासी जखमी झाले आहेत. बेंगळुरूहून गोव्याला जाणारी नागश्री ट्रॅव्हल्सची खासगी बस रस्त्याच्या कडेला जाऊन झाडावर कोसळली. रामनगर-बेळगाव मार्गावरील कुंभार्डाजवळ आज सकाळी 8.00 च्या सुमारास हा अपघात घडला. अपघातात बस चालक आणि वाहकासह एक प्रवासी …

Read More »

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ‘हर घर तिरंगा’ उपक्रमातंर्गत जनजागृती रॅली

बेळगाव : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमातंर्गत 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत घरोघरी तिरंगा फडकविण्यासाठी सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे तसेच शहरात तसेच तालुक्यातील प्रत्येक घरांवर राष्ट्रध्वज फडकवावा यासाठी कॅम्प येथील सेंट जोसेफ शाळेच्यावतीने जनजागृती रॅली काढण्यात आली. रॅलीत 100 तिरंगा ध्वज हातात घेवून विद्यार्थ्यांनी …

Read More »

75 मीटर लांबीची भव्य तिरंगा रॅली

  बेळगाव : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवासाठी संपूर्ण देशात नवचैतन्य पसरले आहे. देशाच्या कानाकोपर्‍यात तिरंगा झेंडे फडकत आहेत. स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणार्‍या लाखो स्वातंत्र्यवीरांचे स्मरण करण्याचे एक महान कार्य सुरू आहे. या पार्श्वभूमीवर बेळगावात आज बेळगाव महानगरपालिकेच्या सहकार्याने दक्षिणचे आमदार अभय पाटील यांच्या नेतृत्वाखाली विशाल तिरंगा रॅली काढण्यात आली. धर्मवीर संभाजी मैदान, …

Read More »