Wednesday , December 17 2025
Breaking News

Classic Layout

संजीव कांबळे यांनी स्वीकारला सीईएन पोलीस स्थानकाचा पदभार

  बेळगाव : बेळगाव शहरातील सायबर, इकॉनॉमिक्स ऑफेन्स आणि नार्कोटिक्स अर्थात सीईएन पोलीस स्थानकाच्या पोलीस निरीक्षक पदी संजीव कांबळे यांनी पदभार स्वीकारला आहे. मावळते पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर यांनी कांबळे यांना पदभार सोपवला. गड्डेकर यांची हेस्कॉम जागृत दलाचे पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. गेल्या दोन वर्षात गड्डेकर यांनी …

Read More »

कामगार व शेतकर्‍यांच्या हक्कांसाठी संयुक्त लढा शेकापचे काम चालूच : अ‍ॅड. राजाभाऊ पाटील यांचे मत

  बेळगाव : शेतकरी आणि कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी, त्यांना मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाची स्थापना झाली. पण, सीमाभागात हा पक्ष महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यात सहभागी आहे. त्यामुळे पक्षाचे स्वतंत्र कामकाज होत नाही. पण, शेतकरी आणि कामगारांच्या हितासाठी संयुक्तरित्या लढा देण्याचे काम सुरूच आहे, असे मत अ‍ॅड. राजाभाऊ पाटील …

Read More »

नक्षलवादाला खतपाणी घालणार्‍यांच्या विरोधातील वैचारिक लढाई जिंकणे आवश्यक! : अधिवक्ता रचना नायडू

  कोल्हापूर : नक्षलवाद हा देशाच्या अंतर्गत सुरक्षेला असलेला सर्वात मोठा धोका आहे. भारतीय सैन्य बिकट भौगोलिक परिस्थितीत बंदूकधारी नक्षलवाद्यांविरोधात सक्षमपणे लढतच आहेत; मात्र ही लढाई लढत असताना ‘ग्रामीण लोकांच्या हत्या केल्या’, ‘महिलांवर अत्याचार केले’, ‘मानवाधिकाराचे उल्लंघन केले जाते’, असा दुष्प्रचार जेव्हा भारतीय सैन्याविरोधात केला जातो, तेव्हा त्या वैचारिक लढाईत …

Read More »

अवचारहट्टी येथील श्री विठ्ठलाईदेवी मंदिराचे चौकट पूजन

बेळगाव : अवचारहट्टी येथील श्री विठ्ठलाईदेवी मंदिराचे चौकट पूजन कार्यक्रम गुरूवारी करण्यात आला. ओबीसी मोर्चा राज्य सेक्रेटरी व सकल मराठा समाज संयोजक किरण जाधव आणि श्री. सोमनाथ धामणेकर यांच्या हस्ते चौकट पूजन करण्यात आले. श्री विठ्ठलाईदेवी मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम अंतिम टप्प्यात आहे. आकर्षक असे मंदिर बनवण्यात येत आहे. या ठिकाणी …

Read More »

वाहतुकीवेळी ट्रकमधून होणारी तांदळाची नासाडी समाजसेवक संतोष दरेकर यांनी रोखली!

बेळगाव : तालुक्यातील देसूर रेल्वे स्थानकावरून तांदूळ भरलेला ट्रक गणेशपूर गोदामाकडे जात होता. यावेळी पोते फाटून तांदूळ वाटेत पडून वाया जात होता. हे लक्षात येताच सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर यांनी वाया जाणार्‍या तांदळाची नासाडी रोखली. तांदूळ रस्त्यावर पडल्याचे पाहून संतोष दरेकर यांनी टिळकवाडीच्या तिसर्‍या रेल्वे गेटपासून ट्रकचा पाठलाग करून ट्रक …

Read More »

अनुष्का चव्हाण हिची राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड

  निपाणी (वार्ता) : कर्नाटक सरकार, डेप्युटी डायरेक्टर, डिपार्टमेंट ऑफ प्री युनिव्हर्सिटी एज्युकेशन, एज्युकेशन जिल्हा चिकोडी, व सी एल ई सोसायटी प्री युनिव्हर्सिटी आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स कॉलेज चिकोडी येथे तायक्वांदो, जुदो, कराटे जिल्हास्तरीय स्पर्धा उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेमध्ये एकूण 180 पेक्षा जास्त मुला-मुलींनी सहभाग घेतला होता. तायक्वांदो या …

Read More »

पेपरच्या वाढत्या किमतीमुळे झेरॉक्स दरात वाढ

  व्यवसायिकही अडचणीत : विद्यार्थ्यांचाही होणार खिसा रिकामा निपाणी (वार्ता) : दिवसेंदिवस पेट्रोल, डिझेल, स्वयंपाक गॅस, जीवनावश्यक वस्तू सह घरात लागणार्‍या प्रत्येक वस्तूंच्या किमतीत वाढ होत चालली आहे. त्याचा सर्वसामान्य कुटुंबियांना चांगलाच फटका बसत या महागाईच्या फेर्‍यातून शासकीय व इतर कामासाठी दैनंदिन गरज बनलेल्या झेरॉक्सला लागणारा पेपरही सुटलेला नाही. त्यामुळे …

Read More »

सिंगीनकोप शाळेत एसडीएमसी कमिटीची निवड

  खानापूर (प्रतिनिधी) : सिंगीनकोप (ता. खानापूर) येथील लोअर प्राथमिक मराठी मुलाच्या शाळेत एसडीएमसी कमिटीची निवड नुकताच करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी एसडीएमसी अध्यक्ष धोंडीबा कुंभार होते. यावेळी शिक्षण प्रेमी कृष्णा कुंभार, ग्राम पंचायत सदस्य परशराम कुंभार, सदस्या माया कुंभार, बसापा पाटील, ओमाणा पाटील, देवाप्पा पाटील, मल्लापा पाटील, मोहन कुंभार, …

Read More »

निलावडे ग्रा. पं. हद्दीतील दुर्गम भागाच्या गवळीवाडा, कबनाळीत अंगणवाडीची सोय करा

  उपाध्यक्ष विनायक मुतगेकरांनी केली मागणी खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्याच्या अतिशय दुर्गम भागातील निलावडे ग्राम पंचायती च्या हद्दीतील गवळीवाडा जोगमठ व कबनाळीत अंगणवाडीची सोय करावी, अशी मागणी निलावडे ग्राम पंचायतीचे उपाध्यक्ष व खानापूर तालुका ग्राम पंचायत संघटना अध्यक्ष विनायक मुतगेकर यानी गवळीवाडा येथे भेट देऊन केली. खानापूर तालुक्यातील अतिदुर्गम …

Read More »

अंमलझरी रोडवरील शिवनगरमध्ये स्वयंभू शिवलिंग मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा

  निपाणी (वार्ता) : येथील आंबेडकर नगर मधील अंमलझरी रोड शिवनगर येथे नव्याने बांधण्यात आलेल्या स्वयंभू शिवलिंग मंदिरात श्री च्या प्राण प्रतिष्ठापनेचा सोहळा पार पडला. त्यानिमित्त दर्शनासाठी भाविकांनी दिवसभर गर्दी केली होती. मंदिरामध्ये समाधी मठाचे प्राणलिंग स्वामींच्या हस्ते प्रतिष्ठापना करण्यात आली. पहाटेपासूनच श्रीगणेश पूजन व पुराण वाचन पुरोहित महेश यरनाळकर …

Read More »