Monday , September 21 2026
Breaking News

अनुष्का चव्हाण हिची राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : कर्नाटक सरकार, डेप्युटी डायरेक्टर, डिपार्टमेंट ऑफ प्री युनिव्हर्सिटी एज्युकेशन, एज्युकेशन जिल्हा चिकोडी, व सी एल ई सोसायटी प्री युनिव्हर्सिटी आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स कॉलेज चिकोडी येथे तायक्वांदो, जुदो, कराटे जिल्हास्तरीय स्पर्धा उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेमध्ये एकूण 180 पेक्षा जास्त मुला-मुलींनी सहभाग घेतला होता. तायक्वांदो या क्रीडा प्रकारांमध्ये निपाणी येथील सद्गुरु तायक्वांदो स्पोर्ट्स अकॅडमीची विद्यार्थिनी अनुष्का उदय चव्हाण या विद्यार्थिनीने 68 किलो वजन गटात सुवर्णपदक पटकाविल्याबद्दल चिकोडी येथील पी. आय. भंडारे, डीडीपीयु सागर बिस्कोप आयोजक सीएलई सोसायटी, प्रशांत कांडेबेट्टू, आयोजक, प्राचार्य दीपक पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र व मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.
यशस्वी विद्यार्थिनीची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.
यशस्वी विद्यार्थिनीला निपाणी येथील केएलई इंडिपेंडेंट पियू कॉलेज प्राचार्य रमेश जे, क्रीडा शिक्षक रामन्ना होरांनी तसेच कॉलेजचे शिक्षक वर्गाचे प्रोत्साहन मिळाले. तर तायक्वांदो प्रशिक्षक बबन निर्मले यांचे मार्गदर्शन लाभले.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *