Wednesday , December 17 2025
Breaking News

Classic Layout

पहिले बालकवी संमेलन सोमवारी; कवी शिवाजी शिंदे संमेलनाध्यक्ष

  बेळगाव : तारांगण सरस्वती इन्फोटेक आणि पोमन्ना बेनके यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 11 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी तीन वाजता कॅन्टोन्मेंट मराठी शाळा, खानापूर रोड, बेळगावच्या सभागृहामध्ये पहिले बालकवी संमेलन आयोजित करण्यात आले आहे. बेळगाव सीमाभाग हा साहित्याची पंढरी म्हणून ओळखला जातो. दरवर्षी 16 ते 17 साहित्य संमेलने या सीमाभागात …

Read More »

मत घोटाळ्याची चौकशी करून सहभागी अधिकाऱ्यांवर कारवाई करा : राहूल गांधी

  ‘मत चोरी’ च्या विरोधात बंगळूरात निषेध सभा बंगळूर, ता.८: भारतीय निवडणूक आयोगावर (ईसीआय) देशातील “जागा आणि निवडणुका चोरण्यासाठी” भाजपशी संगनमत असल्याचा आरोप करत, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी (ता. ८) कर्नाटक सरकारला बंगळुर मध्य लोकसभा मतदारसंघातील महादेवपुर विधानसभा जागेतील “मत घोटाळ्या” ची चौकशी करण्यास आणि त्यात सहभागी …

Read More »

बेळगाव- नवी दिल्ली इंडिगो एअरलाइन्सची विमानसेवा पूर्ववत सुरू होणार

  बेळगाव : इंडिगो एअरलाइन्सची विमानसेवा आता पूर्ववत सुरू होणार असल्यामुळे बेळगावातील विमान प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार आहे. 21 सप्टेंबर 2025 पासून इंडिगो एअरलाइन्सची बेंगलोर – बेळगाव विमानसेवा पूर्ववत सुरू करणार आहे. हे विमान सकाळी 8.25 वाजता बेळगाव येथून निघेल तर सकाळी 10.10 मिनिटांनी बेंगलोर येथे पोहोचेल. त्याचप्रमाणे दिल्ली ते …

Read More »

शिवाजीनगर येथील युवक मारहाणी प्रकरणी 7 जण ताब्यात; 2 फरारी

  बेळगाव : शिवाजीनगर येथील साई मंदिर जवळ कुणाल राजेंद्र लोहार (वय 21) नामक तरुणावर काल दुपारी क्षुल्लक कारणावरून प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. याप्रकरणी मार्केट पोलिसांनी सात आरोपींना अटक केली असून दोन जण फरारी आहेत. हल्लेखोरांनी आपल्या अन्य दोन साथीदारांसह हल्ला करण्यापूर्वी जखमी कुणाला प्रथम दोरीने ओढून त्याच्या डोक्यावर …

Read More »

कन्नडसक्तीसंदर्भात कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू; मंत्री उदय सामंत

  कोल्हापूर : महाराष्ट्र नेहमीच सीमावासीयांच्या पाठीशी आहे. कन्नडसक्ती विरोधातही मराठी जनतेच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत. तसेच वेळ पडल्यास कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची प्रत्यक्ष भेटून आणि कन्नडसक्ती संदर्भात चर्चा करू असे वक्तव्य महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केले. सीमाभागात सुरू असलेल्या कन्नडसक्ती विरोधात सोमवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी बेळगाव येथे …

Read More »

आशा कार्यकर्त्यांच्यावतीने विविध मागण्यांसाठी 12 ऑगस्ट ते 14 ऑगस्टपर्यंत राज्यव्यापी निदर्शने

  बेळगाव : आशा कार्यकर्त्यांच्यावतीने विविध मागण्यांसाठी 12 ऑगस्ट ते 14 ऑगस्टपर्यंत राज्यव्यापी निदर्शने करण्यात येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्याप्रमाणे आशा कार्यकर्त्यांना राज्याचे आणि केंद्राचे प्रोत्साहन धन मिळून किमान मासिक वेतन दहा हजार रुपये मिळावे तसेच या वेतन प्रणालीची अंमलबजावणी एप्रिल महिन्यापासून व्हावी अशी मागणी यावेळी करण्यात येत …

Read More »

सौंदत्ती यल्लम्मा डोंगर परिसरात ढगफुटीसदृश्य पाऊस

  बेळगाव : सौंदत्ती शहरात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. खासकरुन रेणुका-यल्लम्मा मंदिराच्या परिसरात पाणी शिरले होते. शुक्रवारी सायंकाळच्या जोरदार पावसामुळे 500 वर्षांपूर्वीच्या मंदिरात पाणी गेले होते. सौंदत्ती व यल्लम्मा डोंगर परिसरात ढगफुटीसदृश्य पावसाने तडाखा दिला. तासाहून अधिक काळ पाऊस झाल्याने सर्वांची तारांबळ उडाली. सौंदत्तीहून यल्लम्मा डोंगराकडे जाणाऱ्या …

Read More »

विद्याभारती राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेत बेळगाव, बंगळूर अंतिम फेरीत

  बेळगाव : अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या मैदानावर विद्याभारती कर्नाटक पुरस्कृत विद्याभारती बेळगांव जिल्हा आयोजित विद्याभारती राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेत बेळगांव, बंगळूर यांनी अतिम फेरीत प्रवेश केला. संत मीरा शाळेच्या माधव सभागृहात स्पर्धेला गुरुवार ता 7 रोजी प्रारंभ झाला. स्पर्धेच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून संत मीरा माजी विद्यार्थी …

Read More »

इंडियन कराटे क्लबच्या कराटेपटूंचे घवघवीत यश

  बेळगाव : इंडियन कराटे क्लब बेळगांव अकॅडमीच्या तहसीलदार गल्ली श्री सोमनाथ मंदिर शाखा आणि छ. श्री शिवाजी महाराज चौक, मन्नुर बेळगाव शाखा या शाखांच्या कराटेपटूंनी लक्ष्मीईश्वर, गदग येथील साईन स्पोर्ट्स कराटे अकॅडमीतर्फे आयोजित लक्ष्मीईश्वर कराटे स्पर्धेत 16 सुवर्ण पदकांसह एकूण 27 पदके जिंकत घवघवीत यश मिळविले आहे. इंडियन कराटे …

Read More »

म. ए. युवा समितीची महत्वपूर्ण बैठक उद्या

  बेळगाव : कन्नडसक्ती विरोधात ११ ऑगस्ट रोजी काढण्यात येणार आहे. या मोर्चा संदर्भात विचारविनिमय करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची बैठक शनिवार दिनांक ९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.०० वाजता युवा समिती कार्यालय, कावळे संकुल टिळकवाडी बेळगाव येथे बोलाविण्यात आली आहे तरी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन …

Read More »