Monday , September 21 2026
Breaking News

बेळगाव- नवी दिल्ली इंडिगो एअरलाइन्सची विमानसेवा पूर्ववत सुरू होणार

Spread the love

 

बेळगाव : इंडिगो एअरलाइन्सची विमानसेवा आता पूर्ववत सुरू होणार असल्यामुळे बेळगावातील विमान प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार आहे. 21 सप्टेंबर 2025 पासून इंडिगो एअरलाइन्सची बेंगलोर – बेळगाव विमानसेवा पूर्ववत सुरू करणार आहे. हे विमान सकाळी 8.25 वाजता बेळगाव येथून निघेल तर सकाळी 10.10 मिनिटांनी बेंगलोर येथे पोहोचेल. त्याचप्रमाणे दिल्ली ते बेळगाव विमान सेवा काही कारणास्तव काही ठराविक दिवशी चालू होती आता बेळगाव – नवी दिल्ली इंडिगो विमानसेवा येत्या 16 सप्टेंबर 2025 पासून तिच्या दैनंदिन वेळापत्रकानुसार उड्डाण करणार आहे. नवी दिल्ली बेळगाव विमान सकाळी 9.10 बेळगाव येथून निघेल आणि सकाळी 11.40 वाजता नवी दिल्ली येथे पोहोचेल. इंडिगो एअरलाइन्सच्या विमानसेवा पूर्ववत सुरू झाल्यामुळे बेळगाववासियांना बेंगलोर व दिल्ली प्रवास सोपा होणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *