Tuesday , December 16 2025
Breaking News

Classic Layout

इंग्लंडचा भारतावर 7 गड्यांनी विजय; मालिका बरोबरीत

बर्मिंगहम : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात बर्मिंगहम येथे पार पडलेल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने 7 गडी राखून विजय मिळवला आहे. भारताने दिलेल्या 378 धावांचा पाठलाग करताना चौथ्या आणि पाचव्या दिवशी जॉनी बेअरस्टो आणि जो रुट जोडीने तुफान शतकं ठोकत इंग्लंडला विजय मिळवून दिला. मागील वर्षी सुरु झालेल्या मालिकेतील हा उर्वरीत पाचवा …

Read More »

कोल्हापूर जिल्ह्यासाठी 8 जुलैपर्यंत रेड अलर्ट, एनडीआरएफच्या दोन तुकड्या आजपासून तैनात

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी 25 फूट 8 इंचावर पोहोचली आहे. राजाराम बंधाराही पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून प्रशासनाकडून बंधाऱ्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. जिल्ह्यातील एकूण 15 बंधारे पाण्याखाली …

Read More »

कौलापूर गावच्या लोपेश्वर गल्लीत चिखलाचे साम्राज्य

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील कौलापूर गाव हे गवळ्याचे गाव म्हणून ओळखले जाते. या गावात जनावरे पाळणे हा मुख्य व्यवसाय आहे. नुकताच झालेल्या पावसामुळे कौलापूर गावच्या लोपेश्वर गल्लीत चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. आज देशाला स्वातंत्र्य मिळुन ७५ वर्षे ओलांडून गेली तरी कौलापूर गावच्या लोपेश्वर गल्लीत रस्त्याचा पता नाही. एखदाही रस्ता …

Read More »

शिक्षक भरतीसाठी हलशीवाडी ग्रामस्थ आक्रमक, गट गटशिक्षणाधिकारी कार्यालयात छेडले आंदोलन

खानापूर : गेल्या सहा वर्षांपासून शिक्षक भरती करण्यास टाळाटाळ केली जात असल्याने आक्रमक झालेल्या हलशीवाडी ग्रामस्थांनी मंगळवारी खानापूर गटशिक्षणाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांना धारेवर धरले. तसेच येत्या आठ दिवसात शिक्षक उपलब्ध करून दिल्यास दररोज गटशिक्षणाधिकारी कार्यालयात शाळा भरविण्याचा इशारा देण्यात आला आहे. हलशीवाडी येथिल सरकारी मराठी शाळेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या चांगल्या प्रमाणात आहे. …

Read More »

बोगस डॉक्टरांवर कारवाई करा : जिल्हाधिकारी राहुल रेखावार

कोल्हापूर (जिमाका): जिल्ह्यातील स्त्री भ्रूण हत्या विरोधी मोहीम गतिमान करा. यासाठी बोगस डॉक्टरांची तपासणी मोहीम प्रभावीपणे राबवून बोगस डॉक्टरांवर कारवाई करा, अशा सक्त सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केल्या. जिल्हा दक्षता पथक (पीसीपीएनडीटी) बैठक आज जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शाहूजी सभागृहात घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. …

Read More »

‘सरळ वास्तू’चे प्रख्यात ज्योतिषी चंद्रशेखर गुरुजी यांची निर्घृण हत्या

हुबळी : ‘सरळ वास्तू‘चे जगप्रसिद्ध ज्योतिषी चंद्रशेखर गुरुजी यांची हुबळीत निर्घृण हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.होय, ‘सरळवास्तू’ या वास्तुशास्त्र मार्गदर्शन संस्थेच्या माध्यमातून प्रसिद्धीस आलेले प्रख्यात वास्तुतज्ञ चंद्रशेखर गुरुजी यांची आज मंगळवारी हुबळीतील उणकल परिसरातील एका खासगी हॉटेलमध्ये अज्ञात मारेकऱ्यांनी चाकूने वार करून निर्घृण हत्या केली. हत्येनंतर …

Read More »

मुतगे येथील विहिरीत आढळला शिरविरहित मृतदेह

बेळगाव : शिरविरहित मृतदेह विहिरीत आढळून आल्याची खळबळजनक घटना बेळगाव तालुक्यातील मुतगा येथे उघडकीस आली आहे. अज्ञात मारेकऱ्यांनी सुमारे ३० वर्षे वयाच्या तरुणाचा गळा चिरून शीर वेगळे करून धड विहिरीत टाकून दिल्याचे स्पष्ट झाले आहे. मुतगा येथे आज सकाळी-सकाळीच सगळ्यांना घाम फोडणारी घटना उघडकीस आली. अज्ञात युवकाचा खून करून त्याचे …

Read More »

बेळगांव – जांबोटी रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी

नगरसेवक रवी साळुंखे यांची निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी बेळगाव : बेळगांव ते जांबोटी रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. बेळगावहून गोव्याला जाण्यासाठी चोर्ला मार्ग हा जवळचा मार्ग आहे. बेळगांव- गोवा मार्गावर वाहनांची वर्दळ जास्त असते. शिवाय बेळगावहून गोव्याला भाजीपाला पुरवठा करणारी वाहने …

Read More »

कोल्‍हापूर जिल्‍ह्यात मुसळधार पाऊस; पंचगंगेची पातळी २४.५ फुटांवर

कोल्‍हापूर : जिल्ह्यात साेमवार (दि. ४) पासून पावसाचा जोर वाढला. दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. त्यामुळे जनजीवनही विस्कळीत झाले आहे. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत २४ तासात १० फुटाने वाढ झाली आहे. आज (मंगळवार) सकाळी आठ वाजेपर्यंत पाण्याची पातळी 24.5 फुटावर गेली असून, जिल्ह्यातील १४ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. कोल्हापूर-खारेपाटण मार्गावर …

Read More »

कोगनोळी परिसरात पावसाची दमदार हजेरी

पिकांना पोषक वातावरण : शेतकरी वर्गातून समाधान कोगनोळी : कोगनोळी सह परिसरातील हणबरवाडी, दत्तवाडी, सुळगाव, मत्तीवडे, हंचिनाळ, आप्पाचीवाडी, हदनाळ आदी परिसरात सोमवार तारीख चार पासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. सुरुवातीला झालेल्या पावसामुळे या विभागातील शेतकरी वर्गाने मोठ्या प्रमाणात सोयाबीन पेरणी करून घेतली …

Read More »