Friday , April 17 2026
Breaking News

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ज्योती सेंट्रल स्कूलमध्ये विशेष ‘करिअर मार्गदर्शन’ सत्राचे आयोजन

Spread the love

 

बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित ज्योती सेंट्रल स्कूल, बेळगाव येथे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या उज्ज्वल भविष्याची दिशा निश्चित करण्याकरिता एका विशेष “करिअर मार्गदर्शन” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला भारतीय महसूल सेवा (IRS) अधिकारी श्री. आकाश शंकर चौगुले आणि विद्या प्रबोधिनी एज्युकेशन सर्व्हिसेस प्रा. लि. चे संचालक व आयएएस (IAS) इच्छुकांना मार्गदर्शन करणारे ज्येष्ठ प्राध्यापक राजकुमार पाटील सर प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.
यावेळी व्यासपीठावर शालेय एस्.एम्.सी.कमिटीचे चेअरमन आणि ज्योती कॉलेजचे निवृत्त प्राचार्य आर्.के. पाटील, मुख्याध्यापिका श्रीमती सोनाली कंग्राळकर हे उपस्थित होते.
या मार्गदर्शन सत्रात विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रमुख वक्त्यांनी आपल्या अनुभवांतून विद्यार्थ्यांना अमूल्य अंतर्दृष्टी, व्यावहारिक सल्ला आणि प्रेरणा दिली, ज्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यातील करिअर निवडीबाबत माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत होईल. त्यांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांना त्यांची क्षमता ओळखण्यास आणि स्पष्ट उद्दिष्टे निश्चित करण्यास प्रेरणा मिळाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शालेय गणित विषय शिक्षक श्री. मनोहर करडी यांनी केले. तसेच, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विज्ञान विषय शिक्षिका किरण चलवेटकर यांनी केले,
या कार्यक्रमामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांना विविध करिअरच्या संधी आणि त्यांचे महत्त्व याबद्दल सखोल माहिती मिळाली, ज्यामुळे त्यांना त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीत मोठी मदत होईल.

About Belgaum Varta

Check Also

वडगाव विभागातील पारंपरिक श्री शिवजयंती भव्य मिरवणूक सोमवारी

Spread the love  पोलिस आयुक्त भूषण बोरसे यांच्याशी मिरवणूकी संदर्भात चर्चा बेळगाव : वडगाव परिसरातील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *