Monday , September 21 2026
Breaking News

विविध मागण्यांसाठी ‘सफाई कर्मचारी समिती’चे सुवर्णसौधसमोर आंदोलन

Spread the love

 

बेळगाव : बेळगावमध्ये सफाई कर्मचारी संरक्षण समितीच्या वतीने आंदोलन करून, सफाई कर्मचाऱ्यांच्या ३२ हून अधिक समस्या त्वरित सोडवण्याची मागणी करण्यात आली. प्रामुख्याने, बेळगावमधील २५३ सफाई कर्मचाऱ्यांची वस्तीगृहे सध्या तिथे राहणाऱ्या कुटुंबांना हस्तांतरित करावीत, या प्रमुख मागणीसाठी आंदोलनकर्त्यांनी जोर धरला.

बेळगाव येथील अधिवेशन काळात आंदोलनस्थळी आंदोलनकर्त्यांची आणखी एक महत्त्वाची मागणी होती, ती म्हणजे ‘मॅन्युअल स्कॅव्हेन्जर’ सर्वेक्षणामध्ये ओळखल्या गेलेल्या ३९६ कुटुंबांच्या सर्वेक्षण फॉर्मची संयुक्त तपासणी व्हावी. समितीने सफाई कर्मचाऱ्यांच्या वस्तीगृहांची दुरुस्ती आणि पाण्याची टाकी बसवण्याची मागणी केली आहे. तसेच, कायमस्वरूपी नियुक्तीचे आदेश मिळालेल्या १३४ सफाई कर्मचाऱ्यांना त्वरित आदेशाच्या प्रती उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणीही करण्यात आली. सफाई कर्मचारी संरक्षण समितीने संबंधित अधिकाऱ्यांकडे या सर्व समस्या त्वरित सोडवण्याबाबत निवेदन दिले आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *