Tuesday , December 16 2025
Breaking News

Classic Layout

मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये निवडणुकीचे प्रात्यक्षिक 

निपाणी (वार्ता) : बेळगाव मराठा मंडळ संचलित येथील मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यासाठी निवडणूक घेवून जनरल सेक्रेटरी व सहाय्यक जनरल सेक्रेटरी यांची निवड करण्यात आली. ६ वी ते १० वीच्या एकुण ४०० विद्यार्थ्यांचा निवडणुकीमध्ये सहभाग घेतला होता. निवडणुकीची प्रक्रिया कशी होते, त्याचे नियम काय असतात, याची माहिती देवून निवडणूक प्रक्रिया कशी …

Read More »

निपाणीतील बुधवारी पोलिस ठाणे इमारतींचे उद्घाटन गृह मंत्र्यांची उपस्थिती: प्रशासनाकडून तयारी पूर्ण

निपाणी (वार्ता) : येथील मंडल पोलीस निरीक्षक कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात  येणाऱ्या शहर व ग्रामीण या दोन पोलिस ठाण्यांच्या नूतन सर्व सोयींनीयुक्त इमारतींचे बांधकाम आठवड्यांपूर्वी पूर्ण झाले आहे. या इमारतींचे उद्घाटन बुधवारी (ता. ६) होणार आहे. या कार्यक्रमासाठी गृहमंत्री अरगज्ञानेंद्र, पालकमंत्री गोविंद कारजोळ  धर्मादाय खात्याचा मंत्री शशिकला जोल्ले, खासदार अण्णासाहेब जोल्ले, राज्याचे …

Read More »

विद्यार्थ्यांने घेतली डॉक्टरांची मुलाखत!

मॉडर्न स्कूलचा उपक्रम : ‘डॉक्टर्स डे’ चे निमित्त निपाणी (वार्ता) : बेळगाव मराठा मंडळ संचलित येथील मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये ‘डॉक्टर्स डे’ निमित्त डॉ. संदिप चिखले  व डॉ. त्रिवेणी चिखले यांच्या मुलाखती घेवून डॉक्टर्स डे अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी प्राचार्या स्नेहा घाटगे तर मुख्य अतिथी म्हणून डॉ. संदिप चिखले …

Read More »

‘हिंदूंव्यतिरिक्त इतर समुदायांपर्यंत पोहोचा’, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं पक्षाला आवाहन

हैदराबाद : मागील काही वर्षापासून भारतीय जनता पार्टी विरोधी पक्षांनी अनुसरलेल्या घराणेशाही आणि कुटुंबाभिमुख राजकारणावर सातत्याने टीका करताना दिसत आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी पक्षाला हिंदूंव्यतिरिक्त इतर वंचित आणि दलित समुदायापर्यंत पोहोचण्याचं आवाहन केलं आहे. “इतर समुदायांमध्ये देखील वंचित आणि दलित वर्ग आहेत. आपण केवळ हिंदूंपुरते मर्यादित न …

Read More »

संभाजीराजे छत्रपतींना पोलंड सरकारकडून मुख्य अतिथी म्हणून आमंत्रण

कोल्हापूर : संभाजीराजे छत्रपती यांना ३ ते ६ जुलै २०२२ या कालावधीत पोलंड देशाची राजधानी वॉर्सा येथे होणाऱ्या विशेष सोहळ्यास मुख्य अतिथी म्हणून आमंत्रित केले आहे. “आझादी का अमृत महोत्सव” अंतर्गत भारत सरकार व पोलंड सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने दोन राष्ट्रांतील संबंध वृद्धींगत करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. …

Read More »

शिंदे-फडणवीस सरकार 6 महिन्यात कोसळेल, मध्यवर्ती निवडणूकीला तयार राहा : शरद पवार

मुंबई : राज्यात सध्या आलेलं सरकार सहा महिन्यात कोसळू शकते, त्यामुळे मध्यवर्ती निवडणूकीच्या तयारीला लागा, अशी सूचना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आमदारांना दिली आहे. शिंदे सरकारची सोमवारी विधानसभेत बहुमत चाचणी होणार आहे. त्यापूर्वी राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक पार पडली. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आमदारांना मार्गदर्शन केले. आमदारांना मार्गदर्शन …

Read More »

पुण्यात खानापूर (बेळगाव) मित्र मंडळ आयोजित वार्षिक स्नेहमेळावा संपन्न

खानापूर (प्रतिनिधी) : पुण्यातील खानापूर (बेळगांव) मित्र मंडळ आयोजित वार्षिक स्नेहसोहळा शनिवार दि. २ रोजी मुक्ताई गार्डन धायरी, पुणे येथे उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खानापूर (बेळगांव) मित्र मंडळचे अध्यक्ष पीटर डिसोझा होते. यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून खानापूर तालुका माजी आमदार अरविंद पाटील, समिती कार्यकर्ते निरंजन सरदेसाई, पुणे मनपाचे …

Read More »

एकनाथ शिंदेंनी पहिली लढाई जिंकली! आजचं कामकाज स्थगित; उद्या बहुमत चाचणीची परीक्षा

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सरकारनं आज विधिमंडळ अधिवेशनात पहिल्या दिवशी पहिली लढाई जिंकली आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राहुल नार्वेकर यांची मोठ्या फरकानं निवड झाली. यामुळं उद्याच्या बहुमत चाचणीसाठी देखील शिंदे सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. आज पहिल्या दिवशीचं कामकाज विधानसभा अध्यक्ष निवड, त्यानंतर त्यांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावानंतर स्थगित करण्यात …

Read More »

कोगनोळी येथे क्रीडा व शैक्षणिक साहित्याचे वाटप

कोगनोळी : जायंट्स ग्रुप ऑफ कोगनोळी व मन्सूर शेंडूरे यांच्या संयुक्त विद्यमाने येथील मराठी मुला-मुलींच्या शाळेमध्ये क्रीडा साहित्य व शैक्षणिक साहित्याचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी माजी एसडीएमसी अध्यक्ष आप्पासाहेब माने हे होते. तर प्रमुख पाहूणे म्हणून कोगनोळी जायंट्स ग्रुपचे अध्यक्ष जगन्नाथ खोत, उपाध्यक्ष विलास माने, पीआरओ अभिजीत चिंचणे, …

Read More »

स्वामी विवेकानंद इंग्रजी शाळेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शिबीर संपन्न

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील स्वामी विवेकानंद इंग्रजी माध्यमाच्या शाळेत विद्यार्थ्यांना अभ्यासाविषय मार्गदर्शन शिबीर नुकताच पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे चेअरमन जयंत तिनेईकर होते. तर प्रमुख वक्ते म्हणून शिक्षण प्रेमी उद्योजक शंकर खासनीस होते. यावेळी संस्थेचे सचिव अ‍ॅड. चेतन मणेरीकर, अ‍ॅड. मदन देशपांडे, सदानंद कपिलेश्वरी, पंकज खासनीस, प्रशांत खासनीस, प्राचार्या …

Read More »