Tuesday , December 16 2025
Breaking News

Classic Layout

देवेंद्र फडणवीसांची जेपी नड्डांसोबत तासभर खलबतं; सत्ता स्थापनेसंबंधी चर्चा झाल्याची शक्यता

नवी दिल्ली : राज्यात निर्माण झालेल्या अभूतपुर्व राजकीय संकटादरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मंगळवारी दिल्लीत दाखल झाले. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची त्यांनी भेट घेतली. भेटी दरम्यान राज्यात सरकार स्थापनेसंबंधीच्या शक्यतेसंबंधी उभय नेत्यांनी चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. दोघांमध्ये जवळपास तासभर चाललेल्या बैठकी दरम्यान सर्व राजकीय …

Read More »

एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना सवाल; पुत्राकडून शिव्या अन् बापाकडून…

गुवाहाटी : राज्यातील राजकीय पेचप्रसंग जटील बनत चालला आहे. शिवसेनेतील बंडाळीमुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना परत फिरण्याचे आवाहन केले आहे. आपण मुंबईत या. आपण एकत्र बसून यातून मार्ग काढू. तुम्ही आजही मनाने शिवसेनेतच आहात, अशी भावनिक साद बंडखोरांना घातली. यावर आता …

Read More »

जनावरांच्या तोंडचा घास कोण हिरावतोय?; अतिवाडमध्ये महिन्याभरात दोन लाखांच्या गवत गंजीना आग

तेऊरवाडी (एस. के. पाटील) : अतिवाड (ता. जि. बेळगाव) येथे गेल्या महिनाभरापासून गावातील शेतकऱ्यांच्या गवत गंजींना आग लावण्याचा प्रकार सुरुच आहे. आतापर्यंत पाच गवत गंजी अज्ञाताने पेटवल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान तर झालेच आहे पण मुक्या जनावरांच्या तोंडचा घास कोण हिरावत आहे यांचा पोलिसांना शोध घेणे गरजेचे आहे. …

Read More »

संकेश्वरातून विठूरायाच्या नाम गजरात पंढरपूर पायी दिंडीचे प्रस्थान

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरातून आज विठूरायाच्या नाम गजरात, टाळ मृदंगाच्या निनादात श्रीक्षेत्र पंढरपूर पायी दिंडीचे भक्तीमय वातावरणात प्रस्थान झाले. श्री शंकराचार्य संस्थान मठ येथून पायी दिंडी सोहळ्याचा शुभारंभ करण्यात आला. संकेश्वरात कोरोना महामारीमुळे गेली दोन वर्षे झाली पंढरपूर पायी वारीचे भाग्य वारकरींना लाभले नव्हते. यंदा मात्र विठ्ठलाच्या कृपेने वारकरींना …

Read More »

शंभर वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पायोनियर बँकेचा सन्मान

बेळगाव : “देशाचा विकास सर्वसमावेशक व्हायचा असेल तर सहकार क्षेत्राच्या शिवाय तो शक्य नाही या देशाच्या विकासात शेड्युल्ड आणि अर्बन बँकांचे योगदान फार मोठे आहे. तुम्ही शंभर वर्षे टिकून आहात हेच तुमच्या कर्तुत्वाचे गुपित आहे. पण आपल्याला येथे थांबून चालणार नाही पुढची शंभर वर्षे कशी प्रगती करता येईल त्याचा विचार …

Read More »

इंग्लंडचा विश्वविजेता कर्णधार इयॉन मॉर्गन निवृत्त, 35 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ‘अलविदा’

लंडन : इंग्लंडच्या क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी एकदिवसीय कर्णधार म्हणजे इयॉन मॉर्गन. पण हाच मॉर्गन मागील काही दिवसांपासून खास फॉर्ममध्ये नसून आता वयाच्या 35 व्या वर्षी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती  घेतली आहे. इंग्लंडला एकमेव एकदिवसीय चषक जिंकवून देणारा कर्णधार इयॉन मॉर्गन याच्या निवृत्तीची माहिती आयसीसीने ट्वीट करत दिली आहे. क्रिकेट …

Read More »

ठाकरे पिता-पुत्र आणि संजय राऊतांवर देशद्रोहाचा खटला दाखल करा! उच्च न्यायालयात याचिका दाखल

मुंबई : महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे आणि पक्षाचे नेते संजय राऊत यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. अराजकता आणि सरकारी काम रोखण्यासाठी तिन्ही नेत्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी जनहित याचिकेत करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते हेमंत …

Read More »

3 महिन्याचा पगार द्या; अंगणवाडी कर्मचार्‍यांची मागणी

बेळगाव : सरकार अंगणवाडी सेविकांकडून सर्व ती कामे करून घेतो, मात्र त्यांचे वेतन वेळेवर देण्यात येत नसल्याने आज सीआयटीव्हीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगणवाडी सेविकांनी निदर्शने केली आणि आपल्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांना सादर केले. गेल्या तीन महिन्यांपासून अंगणवाडी सेविकांचे वेतन थकित आहेत. सध्या शाळा कॉलेज सुरू झाले असल्याने मुलांना शिक्षणाकरिता लागणारे …

Read More »

बसवण कुडची येथे पायी पंढरपुर दिंडीला जाणार्‍या वारकर्‍यांना आमदार अनिल बेनके यांच्याकडून शुभेच्छा

बेळगांव : बेळगांव उत्तर मतक्षेत्रातील बसवण कुडची येथे गेल्या 24 वर्षापासून वारकरी भजनी मंडळतर्फे पायी पंढरपुर दिंडी काढण्यात येत आहे. आज मंगळवार दिनांक 28 जुन 2022 रोजी या दिंडीला सुरुवात झाली आहे. यावेळी बेळगांव उत्तर मतक्षेत्राचे आमदार अनिल बेनके यांनी माऊलीचा आशिर्वाद घेतला व या दिंडीला जाणार्‍या सर्व वारकर्‍यांना शुभेच्छा …

Read More »

कुर्ला इमारत अपघातात 11 जणांचा मृत्यू; बचाव, मदतकार्य अजूनही सुरूच

मुंबई : मुंबईतील कुर्ला येथील नाईकनगर परिसरातील काल रात्रीच्या सुमारास इमारत कोसळून झालेल्या अपघातातील मृतांचा आकाडा 11 वर गेला आहे. या ठिकाणी अद्यापही बचाव आणि मदतकार्य सुरू असून अजूनही अनेकजण या ढिगार्‍याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेत मृत पावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून 5 लाखांची मदत जाहीर …

Read More »