Sunday , December 14 2025
Breaking News

Classic Layout

मन्सापूरच्या ग्रा. पं. सदस्य रिचर्ड मिनिजीसने साकारली कृषी होडाची योजना

खानापूर (प्रतिनिधी) : भारत हा कृषी प्रदान देश आहे. कृषी खात्याच्यावतीने अनेक योजना शेतकरी वर्गाला मिळत आहेत. खानापूर तालुक्यातील मन्सापूरचे ग्रा. पं. सदस्य रिचर्ड मिनिजीस यांनी मन्सापूर येथील सर्वे नंबर ८४/ ४ शेतात कृषी होडा योजना राबवून शेतकरी वर्गाला एक आदर्श दाखवला आहे. त्यांनी आपल्या शेतात कृषी खात्याच्यावतीने ७० फूट …

Read More »

गव्हानंतर साखरेच्या निर्यातीवरही निर्बंध?

नवी दिल्ली : गव्हानंतर केंद्र सरकार आता साखरेच्या निर्यातीवरही निर्बंध घालण्याचा विचार करत आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने सरकारी सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. देशांतर्गत साखरचे वाढत चालेल्या दरांवर निर्बंध घालण्यासाठी सरकारने हा निर्णय घेणार आहे. जवळपास १ कोटी टन इतक्या साखरेची निर्यात रोखली जाणार आहे. सहा वर्षांनंतर प्रथमच साखरेची …

Read More »

राज्यसभेच्या सहाव्या जागेचा सस्पेन्स कायम, घडामोडींना वेग; संभाजीराजे मुंबईच्या दिशेने रवाना

मुंबई: राज्यसभा निवडणुकीच्या सहाव्या जागेवरुन सुरु असलेल्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर आता राजकीय हालचालींना वेग येताना दिसत आहे. संभाजीराजे राज्यसभेची निवडणूक अपक्ष लढवण्यावर ठाम असल्याने शिवसेनेने सहाव्या जागेसाठी पर्यायी उमेदवाराची निवड केल्याची चर्चा आहे. त्यामुळे संभाजीराजे छत्रपती यांनी निर्णायक हालचाली करायला सुरुवात केली आहे. त्यासाठी संभाजीराजे हे मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत, …

Read More »

लाच मागणार्‍या आरोग्यमंत्र्याची हकालपट्टी; मुख्यमंत्री भगवंत मान यांनी घेतला धडाकेबाज निर्णय

अमृतसर : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी घेतलेल्या एका धडाकेबाज निर्णयाची सध्या जोरदार चर्चा आहे. लाच घेतल्याचा आरोप सिद्ध झाल्याने भगवंत मान यांनी आपल्याच मंत्रिमंडळातील आरोग्यमंत्र्यांची हकालपट्टी केली आहे. मंत्री विजय सिंगला यांना पदाचा राजीनामा देण्याचे आदेश भगवंत मान यांनी दिले आहेत. त्याचबरोबर, त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. …

Read More »

विधान परिषदेसाठी भाजप वतीने लक्ष्मण सवदी यांना उमेदवारी

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या वतीने कर्नाटक राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी आपल्या पक्षाच्या उमेदवारांची यादी पक्षाचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंग यांनी जाहीर केली आहे. यादी अनुसार भारतीय जनता पक्षाच्या वतीने विधान परिषदेसाठी चलवादी नारायणस्वामी, श्रीमती हेमलता नायक, एस. केशव प्रसाद व लक्ष्मण सवदी यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. …

Read More »

शिवसेनेकडून राज्यसभेसाठी संजय पवार यांना उमेदवारी निश्चित, कट्टर शिवसैनिकाला दिली संधी

कोल्हापूर : राज्यसभेच्या सहाव्या जागेचा तिढा सुटल्यात जमा आहे. या जागेसाठी शिवसेनेने कोल्हापूर शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार यांचे नाव निश्चित केले आहे. याची लवकरच अधिकृत घोषणा होणार असल्याचे समजते. दरम्यान, याबाबत संजय पवार यांच्याशी संपर्क साधला असता, ‘मातोश्री’वरुन अद्याप आपल्याला कोणताही निरोप आला नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. शिवसेनेत प्रवेश …

Read More »

आम्ही छत्रपती घराण्याचा मान नक्कीच राखू, पण उमेदवार शिवसेनेचाच असेल : संजय राऊत

मुंबई: राज्यसभेच्या सहाव्या जागेवरील उमेदवारीसाठी सध्या संभाजीराजे छत्रपती आणि शिवसेनेकडून परस्परांविरोधात प्रेशर टॅक्टिक्स वापरल्या जात आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे छत्रपती घराण्याचा मान राखतील, असा विश्वास आहे, हे वक्तव्य करून संभाजीराजे यांनी राज्यसभेच्या उमेदवारीचा चेंडू शिवसेनेच्या कोर्टात ढकलला होता. त्यावर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनीही तितक्याच तत्परतेने प्रत्युत्तर दिल आहे. …

Read More »

टीम इंडियात धवनला स्थान न दिल्याने भडकला सुरेश रैना, केले मोठे वक्तव्य

नवी दिल्ली : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणार्‍या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. टी-20 संघामध्ये दिनेश कार्तिकचे पुनरागमन झाले आहे. आयपीएल 2022 मध्ये कार्तिकने फिनिशरची कामगिरी चांगली बजावली होती, त्यामुळे भारतीय निवडकर्त्यांनी त्याला टी-20 मालिकेसाठी संघात सामील केले आहे. दिनेश कार्तिकची संघात निवड झाली पण शिखर …

Read More »

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद कराचीत, भाच्याची ईडीसमोर कबुली

मुंबई : ईडीच्या चौकशीत मोठा खुलासा झाला आहे. कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पाकिस्तानमधील कराची शहरात असल्याचं समोर आलंय. दाऊदचा भाचा आणि हसिना पारकरचा मुलगा अलीशाह पारकरने ईडीसमोर ही कबुली दिलीय. ईडी मनी लाँडरिंग प्रकरणी तपास करत आहे. या प्रकरणाच्या चौकशी दरम्यान अलीशाह पारकरचाही जबाब नोंदवण्यात आला आहे. अलीशाह पारकरने …

Read More »

डॉ. प्रभाकर कोरे यांना अमेरिकेत जीवनगौरव प्रदान

बेळगाव : केएलई संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ.प्रभाकर कोरे यांना अमेरिकेतील प्रतिष्ठित इंडो-अमेरिकन प्रेस क्लबने जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले आहे. न्यूयॉर्क येथे शनिवारी झालेल्या विशेष समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. उत्तर कर्नाटकात व महाराष्ट्रात विशेष करून ग्रामीण भागात सामान्य लोकांना दर्जेदार शिक्षण आणि किफायतशीर आरोग्य सुविधा देत समाज आणि राष्ट्र …

Read More »