Sunday , December 14 2025
Breaking News

Classic Layout

आरसीबीच्या विजयामुळे पंजाब, हैदराबादचे आव्हान संपुष्टात!

गुजरात टायटन्सचा आरसीबीकडून 8 गड्यांनी पराभव मुंबई : गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात झालेल्या अटीतटीच्या सामन्यात बंगळुरुचा आठ गडी राखून दणदणीत विजय झाला. या विजयासह बंगळुरु संघ गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर पोहोचला असून या संघाच्या प्लेऑफर्यंत पोहोचण्याच्या आशा कायम आहेत. तर दुसरीकडे बंगळुरु संघाचा विजय झाल्यानंतर पंजाब किंग्ज, सनरायझर्स …

Read More »

तुरुंगातून सुटका झाल्यानंतर नवीन आयुष्य जगावे : उच्च न्यायालयाचे न्यायाधीश बी. वीरप्पा

बेळगाव : तुरुंगातून शिक्षा भोगून सुटका झालेल्या कैद्यांनी पुन्हा नव्या आयुष्याची सुरुवात करावी आणि नव्या आयुष्यात समाजासमोर आदर्श बनावे, असे प्रतिपादन उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि कायदा सेवा प्राधिकरणाचे राज्याध्यक्ष बी. वीरप्पा यांनी केले. राज्यातील विविध तुरुंगांना भेट देऊन तेथील मूलभूत सुविधांची पाहणी करताना न्यायाधीश बी. वीरप्पा यांनी हि प्रतिक्रिया व्यक्त …

Read More »

गावात गटारी, रस्ते सुविधा पुरवा

बसवणकुडची ग्रामस्थांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन बेळगाव : बेळगाव तालुक्यातील बसवणकुडची गावात विविध मूलभूत सुविधा पुरविण्यात याव्यात, तसेच शेतकर्‍यांना शेतात जाण्यासाठी मार्ग उपलब्ध करून द्यावा, यासह विविध मागण्यांसाठी बसवणकुडची ग्रामस्थांनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन सादर केले. बसवणकुडची गावात रस्ते, गटारी यासह विविध सुविधांचा अभाव आहे. बसवणकुडची तसेच मनपा व्याप्तीत येणार्‍या परिसराचा विकास झाला नाही. …

Read More »

कर्नाटकाचा दहावीचा निकाल 85.63 टक्के

बेळगाव, चिक्कोडी जिल्हा ’अ’ श्रेणीत, उत्तीर्णतेत मुलींचे प्रमाण अधिक बंगळूर : कर्नाटक माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाने आज दहावी (एसएसएलसी) बोर्डाचा निकाल जाहीर केला. यावर्षी एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी 85.63 टक्के आहे. मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण यावर्षीही मुलांपेक्षा अधिक (90.29 टक्के) आहे, तर मुलांची उत्तीर्णतेची टक्केवारी 81.30 टक्के आहे. यावेळी निकालाच्या टक्केवारीनुसार जिल्ह्यांची …

Read More »

प्रभाग 13 आदर्श वार्ड बनविणार : नंदू मुडशी

संकेश्वर (महंमद मोमीन) : प्रभागातील लोकांच्या आशीर्वाद आपल्या पाठीशी ठाम असल्याने आपला विजय निश्चित असल्याचे येथील भाजपाचे उमेदवार शिवानंद ऊर्फ नंदू मुडशी यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. ते पुढे म्हणाले, प्रभाग 13 मध्येच मी लहानाचा मोठा झालो आहे. येथील सुभाष रस्ता बाजारपेठेत आमच्या परिवाराच्या तीन पिढ्यांनी कडधान्य व्यापार करुन जीवनाचा …

Read More »

प्रभाग 13 च्या पोटनिवडणुकीत काँग्रेस-भाजपची प्रतिष्ठा पणाला!

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर प्रभाग क्रमांक 13 च्या पोटनिवडणुकीत काँग्रेस-भाजपची प्रतिष्ठा पणाला लागलेली दिसत आहे. येथे भाजपचे उमेदवार शिवानंद ऊर्फ नंदू शिवपुत्र मुडशी, काँग्रेसचे उमेदवार अ‍ॅड. प्रविण शिवप्पा नेसरी यांचेत अत्यंत चुरशीचा आणि अटीतटीचा सामना होत आहे. त्यामुळे संपूर्ण संकेश्वरकरांचे लक्ष निवडणुकीकडे लागून राहिलेले दिसत आहे. लढत नंदू विरोधात …

Read More »

विधवांना सन्मानाने जगण्याचा अधिकार देण्याचा हेरवाडचा निर्णय स्वागतार्ह : जिल्हाधिकारी राहुल रेखावार

सर्व ग्रामपंचायतींकडून या निर्णयाची अंमलबजावणी; हीच लोकराजाला आदरांजली ठरेल कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतीशताब्दी वर्षानिमित्त राजर्षी शाहू महाराज यांचे कार्य व त्यांचे विचार यांचा सर्वदूर प्रसार करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात विविध उपक्रम राबविले जात आहेत. राजर्षी शाहू महाराज यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक क्रांतिकारी बदल समाजात घडवून आणले. विधवा …

Read More »

प्रभागातील लोकांचा आशीर्वाद पाठीशी : अ‍ॅड. प्रविण नेसरी

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर प्रभाग क्रमांक 13 मधील लोकांनी मला निवडणूक रिंगणात उतरविले आहे. त्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असल्याने विजय निश्चित असल्याचे काँग्रेसचे उमेदवार अ‍ॅड. प्रविण नेसरी यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. ते पुढे म्हणाले, प्रभाग 13 मधील जनतेचा प्रतिनिधी म्हणून मी पालिकेत जाणार आहे. पालिकेत प्रभागातील समस्या मांडून सोडविणेचे …

Read More »

कोगनोळी येथे बिरदेव जन्मोत्सव उत्साहात

कोगनोळी : येथील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असणार्‍या ग्रामदैवत बिरदेव देवाचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त हालसिद्धनाथ नगरातील बिरदेव मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी सात वाजता बिरदेव मूर्तीस विठ्ठल भागोजी कोळेकर यांच्या हस्ते पंचामृत अभिषेक करण्यात आला. यावेळी विधिवत पूजन केले. मान्यवरांच्या …

Read More »

विविध प्रजातींच्या आंब्यांची चव चाखायचीय.. आंबा जत्रेला भेट द्या : जिल्हाधिकारी राहूल रेखावार

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व कोल्हापूर : आब्यांच्या अनेक प्रजातींची चव घेण्यासाठी कोल्हापूरकरांनी लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व अंतर्गत शाहू मिल येथे आयोजित आंब्याच्या जत्रेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृतीशताब्दी निमित्त जिल्हा प्रशासनाच्या …

Read More »