Sunday , July 26 2026
Breaking News

प्रभागातील लोकांचा आशीर्वाद पाठीशी : अ‍ॅड. प्रविण नेसरी

Spread the love

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर प्रभाग क्रमांक 13 मधील लोकांनी मला निवडणूक रिंगणात उतरविले आहे. त्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असल्याने विजय निश्चित असल्याचे काँग्रेसचे उमेदवार अ‍ॅड. प्रविण नेसरी यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
ते पुढे म्हणाले, प्रभाग 13 मधील जनतेचा प्रतिनिधी म्हणून मी पालिकेत जाणार आहे. पालिकेत प्रभागातील समस्या मांडून सोडविणेचे कार्य आपण निश्चितपणे करणार आहे. आमचे लाडके नेते माजी मंत्री ए. बी. पाटील यांनी आपणाला निवडणूक लढण्याची संधी मिळवून दिली आहे. त्यांचे बहुमोल मार्गदर्शन आणि आशीर्वाद आपणाला लाभले आहे. प्रभागात अनेक समस्या आहेत. ते सोडविणे आपले आद्य कर्तव्य राहणार आहे. प्रभागातील नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आपण कोठेच कमी पडणार नाही. लोकांना शुध्द पिण्याचे पाणी, पक्के रस्ते, गटार पथदिवे मिळवून देण्याचे कार्य आपण करणार आहोत. नुसते बोलण्यापेक्षा काम करुन दाखविणे ही आपल्या कामची पध्दत राहणार आहे. बोलणे कमी काम जादा करुन दाखविणेसाठी आपण पालिकेत नगरसेवक म्हणून जाणार आहे. आपण प्रभागातील लोकांच्या प्रेमाला विश्वासाला पात्र राहणार आहे. प्रभागातील लोकांचं उदंड प्रेम हेच आपले भांडवल आहे. पालिकेतून निधी मिळवून उत्कृष्ट विकास कामे आपण करणार आहे. प्रभागातील लोकांच्या हाकेला धावून जावून त्यांची कामे करुन देण्याचे कार्य आपल्या हातून निश्चितच होणार आहे. मी याच प्रभागातील नागरिक असल्यामुळे येथील समस्या मला चांगल्या माहित आहेत. येथील दिवंगत नगरसेवक संजय नष्टी हे आपले नातेवाईक असल्यामुळे त्यांच्या विकासकामांचा वारसा आपण पुढे चालविणार आहोत. प्रभागातील लोकांच्या आशीर्वादाने आपला विजय शंभर टक्के नक्की असल्याचे त्यांनी सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

सलामवाडीतून श्री भावेश्वरी दिंडीचे पंढरपूरकडे भक्तिभावाने प्रस्थान

Spread the love  दड्डी : हुक्केरी तालुक्यातील सलामवाडी येथून श्री भावेश्वरी दिंडीचे पंढरपूरकडे आषाढी वारीनिमित्त …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *