Monday , September 21 2026
Breaking News

विधवांना सन्मानाने जगण्याचा अधिकार देण्याचा हेरवाडचा निर्णय स्वागतार्ह : जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Spread the love

सर्व ग्रामपंचायतींकडून या निर्णयाची अंमलबजावणी; हीच लोकराजाला आदरांजली ठरेल
कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतीशताब्दी वर्षानिमित्त राजर्षी शाहू महाराज यांचे कार्य व त्यांचे विचार यांचा सर्वदूर प्रसार करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात विविध उपक्रम राबविले जात आहेत. राजर्षी शाहू महाराज यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक क्रांतिकारी बदल समाजात घडवून आणले. विधवा पुनर्विवाह असो.. विधवांना समाजात समान स्थान मिळवून देणे असो अथवा मुलींसाठी सक्तिच्या शिक्षणाचा कायदा असो.. हे सर्व कायदे त्यांनी स्वातंत्र्य पूर्व काळात करवीर संस्थानात केले होते. जे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशभरात अवलंबण्यात आले. याच विचाराने प्रेरित होऊन कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने ठराव केला आणि विधवांना समानता देण्याचा निर्णय घेतला.. त्यांना सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला.. आज याच निर्णयाचे स्वागत होत आहे.
राज्य शासनाने राज्यातील सर्व जिल्ह्यांना विधवा प्रथा बंदीच्या या निर्णयाबाबत आपापल्या जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या ठिकाणी जनजागृती करण्यासाठी शासन परिपत्रक काढून आवाहन केले आहे. संपूर्ण राज्यात जर याची अंमलबजावणी झाली तर ही खर्‍या अर्थाने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना आदरांजली ठरेल…

About Belgaum Varta

Check Also

अंबोली घाटात दरड कोसळली; बेळगाव – सिंधुदुर्ग वाहतूक विस्कळीत

Spread the love  बेळगाव : महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यात असलेल्या प्रसिद्ध अंबोली धबधब्याजवळ मंगळवारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *