Wednesday , August 26 2026
Breaking News

फटाक्यांच्या आवाजाने घाबरलेल्या मेंढ्या कालव्यात पडल्याने ८० मेंढ्यांचा मृत्यू

Spread the love

 

बेळगाव : श्रावण महिन्यानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही मेंढपाळांनी एकत्र येत श्री. मेंढी लक्ष्मीदेवी यात्रा महोत्सवाचे आयोजन केले होते. मात्र, यात्रेदरम्यान फटाक्यांच्या मोठ्या आवाजाने घाबरलेल्या मेंढ्या कालव्यात पडल्याने सुमारे ८० मेंढ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली.

ही घटना बेळगाव जिल्ह्यातील मूडलगी तालुक्यातील यादवाड गावात घडली. या दुर्घटनेत सुमारे २० लाख रुपये किमतीच्या ७५ मेंढ्या आणि ५ मेंढरांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

यात्रेच्या उत्साहात घडलेल्या या हृदयद्रावक घटनेमुळे मेंढपाळ कुटुंबांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. मोठ्या संख्येने मेंढ्या मृत्युमुखी पडल्याने मेंढपाळांना लाखो रुपयांचे नुकसान सहन करावे लागले आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. फटाक्यांच्या आवाजामुळे मेंढ्या घाबरून कालव्यात पडल्या का, अथवा या घटनेमागे अन्य काही कारण आहे, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

मृत मेंढ्यांची नेमकी संख्या आणि नुकसानीचा अंतिम आकडा प्रशासनाच्या पाहणी व पोलिसांच्या तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

ज्योती सेंट्रल स्कूलमध्ये राजर्षी शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

Spread the love  बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित ज्योती सेंट्रल स्कूल, कॅम्प, बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *