Wednesday , August 26 2026
Breaking News

बिदर जिल्हा म. ए. समितीची आज महत्त्वपूर्ण बैठक

Spread the love

 

बिदर : शासकीय व अशासकीय कार्यालयांवर मराठी भाषेतील फलक लावणे तसेच मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये शिक्षकांची पदे मंजूर करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी, बिदर यांच्याकडे शिष्टमंडळाद्वारे निवेदन सादर करण्यासंदर्भात बिदर जिल्ह्यातील मराठी भाषिक बांधवांची महत्त्वपूर्ण बैठक आज, बुधवार (दि. २६ ऑगस्ट) रोजी आयोजित करण्यात आली आहे.

महाराष्ट्र एकीकरण समिती, बिदरचे अध्यक्ष रामराव राठोड, सचिव पृथ्वीराज पाटील तसेच सदस्य प्रा. डी. डी. शिंदे-पाटील यांच्या पुढाकाराने ही बैठक भालकी येथील एसबीआय बँकेसमोरील आप्पा कॉम्प्लेक्समधील विवेकानंद को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि. येथे दुपारी १२.३० वाजता होणार आहे.

बिदर जिल्ह्यातील मराठी भाषिकांच्या विविध प्रश्नांवर बैठकीत चर्चा करण्यात येणार असून, शासकीय व अशासकीय कार्यालयांवर मराठी भाषेतील फलक लावणे, मराठी माध्यमाच्या शाळांना आवश्यक शिक्षकांची पदे मंजूर करणे आदी मागण्यांबाबत पुढील आंदोलनात्मक व प्रशासकीय भूमिका निश्चित केली जाणार आहे.

या मागण्यांसंदर्भात जिल्हाधिकारी, बिदर यांच्याकडे शिष्टमंडळ घेऊन जाऊन निवेदन सादर करण्याबाबतही बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे.

तरी बिदर जिल्ह्यातील सर्व मराठी भाषिक बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून बैठकीत सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

शेळ्या चोरीच्या तीन घटनांचा उलगडा; दोघे अटकेत

Spread the love    बेळगाव : जिल्ह्यातील तीन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या शेळ्या चोरीच्या घटनांचा पोलिसांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *