
मुलांच्या कृतीशीलतेला वाव मिळावा, त्यांच्या कल्पनाशक्तीला नवी दिशा मिळावी आणि त्यांच्या कल्पना प्रत्यक्ष कलाकृतीच्या माध्यमातून साकार व्हाव्यात, या उद्देशाने डूडलीफाय (Doodlify) मुलांसाठी आगळावेगळा कलात्मक अनुभव घेऊन आले आहे. विविध आकर्षक रेखाचित्रांना रंग आणि कल्पकतेची जोड देत मुलांच्या क्राफ्ट, पेंट आणि इमॅजिन या सर्जनशील प्रवृत्तीला चालना देण्याचा प्रयत्न डूडलीफायच्या माध्यमातून केला जात आहे.
युनिकॉर्न थीम, डॉल्स थीम, स्पेस किट, कस्टमाइज्ड गिफ्ट, ए टू झेड लेटर किट, क्रिकेट थीम, झिरो टू नाईन नंबर थीम, सुपरहिरो थीम, कार्टून थीम आणि नेम थीम अशा विविध आकर्षक कलाकृती मुलांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
मोबाईलच्या वाढत्या वापरापासून मुलांना काही काळ दूर ठेवत त्यांना रंग, रेषा आणि कल्पनांच्या विश्वात रमविण्याचा अनोखा अनुभव डूडलीफाय देत आहे. ‘पेंट युवर ड्रीम, क्रिएट युवर मॅजिक’ या संकल्पनेतून मुलांना कलाकार आणि चित्रकार म्हणून स्वतःची ओळख निर्माण करण्याची संधी मिळणार आहे.
वाढदिवसाची भेट, रिटर्न गिफ्ट तसेच रक्षाबंधनानिमित्त आगळीवेगळी भेटवस्तू म्हणून डूडलीफायच्या कलाकृती निश्चितच लक्षवेधी ठरणार आहेत. मुलांच्या हातून साकारलेली कलाकृती ही केवळ भेटवस्तू न राहता त्यांच्या कल्पकतेची आणि सर्जनशीलतेची आठवण ठरणार आहे.
मुलांच्या कल्पनांना द्या रंगांची पंखे आणि त्यांच्या स्वप्नांना द्या कलात्मक भरारी!
डूडलीफायची आगळीवेगळी भेटवस्तू आजच बुक करा.
अधिक माहितीसाठी संपर्क : 8050467470 / 636300855

Belgaum Varta Belgaum Varta