Wednesday , August 26 2026
Breaking News

बेळगाव केन्द्राला राष्ट्रीय निबंध स्पर्धेत द्वितीय क्रमांक

Spread the love

 

बेळगाव (प्रतिनिधी) : बृहन्महाराष्ट्र मंडळ, नवी दिल्ली मध्यवर्ती संघटना व मराठी प्रतिष्ठान बेंगलोर यांच्या संयुक्त विद्यमाने बेंगलोर येथील महाराष्ट्र सदनाच्या सभागृहात राष्ट्रीय निबंध स्पर्धेच्या बक्षीस समारंभात बेळगाव केन्द्राला द्वितीय क्रमांकाच्या बक्षिसाने गौरवण्यात आले.

बेंगलोर येथे रविवारी पार पडलेल्या बक्षिस वितरण समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री. संजीव केसकर व श्री. जयदीप भालेराव, बेंगळूर अध्यक्ष श्री दिलीप कुंभोजकर, महाराष्ट्र राज्याच्या मराठी भाषा संवर्धन मंत्रालयाचे प्रशासकीय अधिकारी श्री. गिरीष पतके, सह-कोषाध्यक्ष श्री. नितीन कपिलेश्वरकर, विभागीय कार्यवाह श्री. परशराम माळी व संयोजक श्री. बापूसाहेब शिंदे हे व्यासपिठावर उपस्थित होते. याप्रसंगी मान्यवरांच्या दीप प्रज्वलन करण्यात आले.

प्रमुख पाहुणे तसेचं महाराष्ट्र सरकार मराठी भाषा संवर्धन मंत्रालयाचे प्रशासकिय अधिकारी श्री. गिरीष पतके यानी मराठी भाषा व जन हे आता जगभरातील विविध देशात याचा वावर आहे व याची संस्कृती प्रकर्षाने पाळली जाते. राज्य मराठी विकास संस्था मुंबई व बृहन्महाराष्ट्र मंडळ नवी दिल्ली याचा मराठी संस्थाना व सभासदाना फायदा कसा होतो याचे विचार मांडले. यावेळी मराठी भाषा निबंध स्पर्धा व मराठी व्याकरण स्पर्धा याच्या 2025-26 या वर्षातील विजेते विद्यार्थी, विषय मार्गदर्शक शिक्षक व निबंध केन्द्र प्रमुख यांचा स्मृतीचिन्हे देऊन गौरव करण्यात आला.

याप्रसंगी राष्ट्रीय सह-कोषाध्यक्ष श्री. नितीन कपिलेश्वरकर, विभागीय कार्यवाह (कर्नाटक) श्री.परशराम माळी, सौ.किर्ती टेंबे, मंथन, श्रीमती प्रिया कवठेकर, शारदोत्सव, सौ. स्वरूपा इनामदार, वसंत व्याख्यानमाला, श्री. सुहास सांगलीकर, सरस्वती वाचनालय, श्री कुमार पाटील, मराठी भाषा प्रेमी मंडळ, श्री. रविशंकर मालशेट, बेळगाव पत्रकार संघ, श्री. विलास पेडणेकर, युवा समिती श्री. सी.आर.पाटील, लोकमान्य ग्रंथालय आदी पदाधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला.

 

About Belgaum Varta

Check Also

शेळ्या चोरीच्या तीन घटनांचा उलगडा; दोघे अटकेत

Spread the love    बेळगाव : जिल्ह्यातील तीन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या शेळ्या चोरीच्या घटनांचा पोलिसांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *