Wednesday , August 26 2026
Breaking News

आनंदनगर रहिवासी संघटनेतर्फे नगरसेविका सारिका पाटील यांचा सत्कार

Spread the love

 

बेळगाव : नगरसेविका सौ. सारिका पाटील यांची बेळगांव महापालिकेच्या लेखा समितीच्या अध्यक्षस्थानी निवड झाल्याबद्दल संघटनेतर्फे शाल, पुष्पगुच्छ आणि श्रीफळ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष आप्पाजी कुगजी हे तर शिवमंदिर विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष श्रीपाद रेवणकर व उत्कर्ष महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. शुभांगी पाटील ह्या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. याप्रसंगी एस. एस. वेसणे यांनी प्रास्ताविकात उपस्थित सर्वांचे स्वागत करुन सारिका पाटील यांच्या कार्याचा गौरव करताना त्या आदर्श नगरसेविका असल्याचे सांगून त्यांची महापालिकेच्या लेखासमितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले. त्यांच्या कार्याची पोच पावती म्हणून सदर सत्कार कार्यक्रम आयोजित केला असल्याचे सांगितले.

बी. एम. पाखरे यांनी कार्यतत्पर नगरसेविका असा त्यांचा गुणगौरव केला आणि आनंदनगर मधील समस्याबाबतचे विवेचन केले आणि त्यांची पूर्तता लवकरात लवकर करावी असे आवाहन केले. किरण करंबळकर यांनी सारिका पाटील ह्या सर्वोत्कृष्ट आणि नागरिकांच्या कामासाठी सदैव तत्पर नगरसेविका आमच्या विभागाला मिळाल्या असल्याचे सांगितले. संघटना अध्यक्ष आप्पाजी कुगजी यांनी आनंदनगरमधील विविध कामाचे निवेदन करुन सारिका पाटील यांनी त्यांचे निवारण करावे. आमची संघटना सर्वतोपरी आपणांस सहाय्य करेल असे सांगितले. शिवमंदिर ट्रस्टचे अध्यक्ष श्रीपाद रेवणकर यानी नगरसेविका म्हणून मॅडमनी सडेतोड भूमिका घेऊन जनतेच्या विकासासाठी प्राधान्य दिल्याचे सांगितले. उत्कर्ष महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. शुभांगी पाटील यांनी सारिका पाटील यांचा श्रीफळ-पानविडा देऊन सत्कार केला आणि पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

आपल्या सत्काराला उत्तर देताना सारिका पाटील यांनी हा सत्कार माझ्या माहेरकडूनच केला जात असल्याचे सांगून येथील नागरिकांचा मला सार्थ अभिमान असल्याचे सांगितले. नागरिकांच्या सर्व कामांची पूर्तता केवळ आश्वासन न देता ती पूर्णत्वास नेण्याची ग्वाही दिली. अनेक अडचणी आणि आव्हानांचा सामना करण्याचे केवळ तुम्हा नागरिकामुळेच शक्य झाले असल्याचे सांगितले. आनंदनगर संघटनेने विकास कामांची पूर्तता करण्यासाठी आपणाला संपूर्ण पाठींबा द्यावा असे आवाहन केले. यावेळी संघटनेतर्फे आनंदनगरमधील तातडीच्या कामांची पूर्तता करण्याचे निवेदन सारिका पाटील यांना देण्यात आले. सूत्रसंचालन एस. एस. वेसणे यांनी केले तर आभार उदय महागांवकर यांनी मानले. या कार्यक्रमाला एस. एन. पाटील, एस. बी. मुरकुटे, पी. ए. पाटील, चंद्रकांत धुडूम, किरण करंबळकर, बाळासाहेब पाटील, उदय महागांवकर, मधुकर सुतार, मल्लाप्पा कुंडेकर, बाळू तम्मुचे, सुनिता पाटील, लिला तुळजाई आदिसह तिन्ही संघटनाचे सदस्य आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

BEACON जिल्हा सदस्यत्व सेमिनार बेळगाव येथे यशस्वीपणे संपन्न

Spread the love  बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणतर्फे “BEACON – जिल्हा सदस्यत्व सेमिनार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *