Sunday , December 14 2025
Breaking News

Classic Layout

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत केंद्रीय नेतृत्वाकडून लवकरच निर्णय

मुख्यमंत्री बोम्मई, उपमुख्यमंत्रिपदावर मुख्यमंत्र्यांचे मौन बंगळूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मंत्रिमंडळाचा विस्तार कि पुनर्रचना याबाबत भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा निर्णय लवकरच कळविणार असल्याची माहिती, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी बुधवारी येथे दिली. शाह मंगळवारी शहरात असताना मंत्रिमंडळ विस्तार किंवा फेरबदल यावर काही चर्चा झाली का, असे पत्रकारांनी विचारले असता, दिल्लीला गेल्यावर …

Read More »

बसवजयंतीनिमित्त खिळेगावला विविध कामांना चालना

मंगल कार्यालय भूमिपूजन, टी-शर्ट वितरण : आ. श्रीमंत पाटील यांची उपस्थिती अथणी : बसवजयंतीचे औचित्य साधून खिळेगाव येथे विकासकामांचे उद्घाटन व युवक मंडळाला टी शर्ट वितरण असा संयुक्तिक कार्यक्रम झाला. माजी मंत्री व कागवाडचे आ. श्रीमंत पाटील यांनी या सर्व कार्यक्रमांना चालना दिली. आ. पाटील यांनी खिळेगाव बसवेश्वर मंदिराला भेट …

Read More »

खानापूर तालुका म. ए. समितीची उद्या कुप्पटगिरीत जनजागृती सभा

खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने जनजागृती व पुनर्बांधणी संदर्भात कुप्पटगिरी येथील हुतात्मा नागप्पा होसुरकर यांच्या गावी निर्धार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यासंदर्भात खानापूर येथील राजा शिव छत्रपती स्मारकात उद्या दि. 5 मे रोजी सायंकाळी 6 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यानंतर खानापूरची ग्रामदेवता चौराशी …

Read More »

रविवारी होणार मराठी साहित्य संमेलन

कवी संमेलनाध्यक्षपदी शिवाजी शिंदे यांची निवड बेळगाव (प्रतिनिधी) : बेळगाव येथील अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद व मराठा मंदिर आयोजित तिसरे बेळगाव मराठी साहित्य संमेलन रविवार दिनांक 8 मे 2022 रोजी मराठी मंदिर बेळगाव येथे संपन्न होणार आहे. या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस भूषविणार असून दुसऱ्या सत्रात …

Read More »

छत्रपती राजर्षि शाहू महाराज स्मृती शताब्दी सोहळ्यानिमित्त प्र. ले. संघाच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन : वक्ते प्रा. आनंद मेणसे

बेळगाव: प्रगतिशील लेखक संघ बेळगांव यांच्यावतीने राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दीसोहळा निमित्त शुक्रवार दिनांक 6 मे 2022 रोजी व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, महावीर जयंती, छत्रपती शिवाजी महाराज जयंती, संत बसवेश्वर जयंती तसेच राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी निमित्त ज्येष्ठ विचारवंत, …

Read More »

प्रभाग १३ ची पोटनिवडणूक नेसरी विरुद्ध नेसरी होणार?

अण्णा-तम्मा लढतीसाठी सज्ज संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर प्रभाग क्रमांक १३ चे धडाडीचे नगरसेवक संजय नष्टी यांच्या निधनाने रिक्त झालेल्या नगरसेवक निवडीसाठी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून अद्याप एकही अर्ज दाखल करण्यात आलेला नाही. नुकतेच काॅंग्रेसचे नेते माजी मंत्री ए. बी. पाटील …

Read More »

सेवानिवृत्तीनिमित्त मारुती नारायण दळवी यांचा सत्कार!

खानापूर : ब्रँच पोस्टमास्तर मणतुर्गा मारुती नारायण दळवी यांचा मुदतपूर्व सेवानिवृत्ती सत्कार समारंभ खानापूर पोस्ट ऑफिस येथे संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य डाकघर खानापूर पोस्टमास्तर विरभद्रप्पा बेंचनमर्डी हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून साऊथ सब डिव्हिजन बेळगाव श्री. बी. पी. माळगी, माजी तालुका पंचायत सदस्य मणतुर्गा बाळासाहेब महादेवराव शेलार, …

Read More »

कर्नाटकात मुख्यमंत्री बदल नाही : उमेश कत्ती

संकेश्वर (प्रतिनिधी) :राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांना बदलणेचा प्रश्नच उदभंवत नसल्याचे राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्तीं यांनी सांगितले. ते संकेश्वर येथील छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवात सहभागी होऊन पत्रकारांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी वर्षभरात चांगली कामगिरी करुन दाखविली आहे. त्यांच्या …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाचा महाराष्ट्र सरकारला धक्का; दोन आठवड्यात निवडणुका जाहीर करण्याचे आदेश

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने महाविकास आघाडी सरकारला ओबीसी आरक्षणावरून मोठा धक्का दिला आहे. राज्य सरकारने या संदर्भात केलेला कायदा फेटाळून लावत 15 दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाकडून राज्य निवडणूक आयोगाला देण्यात आला आहे. ओबीसी आरक्षणा संदर्भात आज महत्वपूर्ण सुनावणी होती, यावेळी न्यायालयाने दिलेल्या …

Read More »

संभाजीराजे महाविकास आघाडीसोबत राहण्याची शक्यता; काँग्रेस की शिवसेना याचा लवकरच फैसला

कोल्हापूर : मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे नेतृत्व करत राज्यभर चर्चेत आलेले संभाजीराजे छत्रपती यांची नवी राजकीय इनिंग लवकरच सुरू होणार आहे. राष्ट्रपती नियुक्त खासदारकीची मुदत 3 मे रोजी संपल्याने त्यांची नवी राजकीय वाटचाल महाविकास आघाडीच्या दिशेने होण्याचे संकेत आहेत. मात्र, यामध्येही शिवसेना की काँग्रेस यांचा फैसला होण्यास विलंब लागण्याची चिन्हे आहेत. …

Read More »