Wednesday , July 15 2026
Breaking News

बसवजयंतीनिमित्त खिळेगावला विविध कामांना चालना

Spread the love


मंगल कार्यालय भूमिपूजन, टी-शर्ट वितरण : आ. श्रीमंत पाटील यांची उपस्थिती
अथणी : बसवजयंतीचे औचित्य साधून खिळेगाव येथे विकासकामांचे उद्घाटन व युवक मंडळाला टी शर्ट वितरण असा संयुक्तिक कार्यक्रम झाला. माजी मंत्री व कागवाडचे आ. श्रीमंत पाटील यांनी या सर्व कार्यक्रमांना चालना दिली.
आ. पाटील यांनी खिळेगाव बसवेश्वर मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले. सर्व जनतेला बसवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या.
राज्य धर्मादाय खात्यातर्फे मंजूर झालेले अनुदान व भक्तांच्या देणगीतून येथे मंगल कार्यालय उभारण्यात येत आहे. याचे भूमीपूजन आ. पाटील यांनी केले. येथील बसव युवक मंडळाला श्रीमंत पाटील फाऊंडेशनतर्फे टी शर्टचे वितरण करण्यात आले.


यावेळी खिळेगाव ग्रामपंचायत अध्यक्ष रवी नागनोळी, बसवेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष धरेप्पा होन्नागोळ (पुजारी), कार्याध्यक्ष शिवाप्पा अक्कीमरडी, रेवाण्णा पाटील, महादेव कोरे, दिलीप पवार, विजय अळ्ळट्टी, सुनील होन्यागोळ, विजय नागनोळी, गणेश नागनोळी, सचिन पुजारी यांच्यासह ग्रामपंचायत तसेच देवस्थान कमिटीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

ऊसाच्या शेतात वीजतारेचा स्पर्श होऊन दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू

Spread the love  बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील मुधोळगी (मुडलगी) तालुक्यातील नागनूर गावाच्या हद्दीत ऊसाच्या शेतात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *