Thursday , June 4 2026
Breaking News

छत्रपती राजर्षि शाहू महाराज स्मृती शताब्दी सोहळ्यानिमित्त प्र. ले. संघाच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन : वक्ते प्रा. आनंद मेणसे

Spread the love

बेळगाव: प्रगतिशील लेखक संघ बेळगांव यांच्यावतीने राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दीसोहळा निमित्त शुक्रवार दिनांक 6 मे 2022 रोजी व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, महावीर जयंती, छत्रपती शिवाजी महाराज जयंती, संत बसवेश्वर जयंती तसेच राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी निमित्त ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक, पत्रकार, माजी प्राचार्य डॉ. आनंद मेणसे यांचे “राजर्षि शाहू महाराज जीवन कार्य : शैक्षणिक धोरण आणि आजची सद्यपरिस्थिती” या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बेळगाव जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार कृष्णा शहापूरकर हे राहणार आहेत.

प्रगतिशील लेखक संघाच्या वतीने व्याख्यान रामदेव गल्ली कार पार्किंग येथील गिरीश कॉम्प्लेक्सच्या शहीद भगतसिंग सभागृहात हे व्याख्यान सायंकाळी 5:30 वाजता होणार आहे. बेळगाव जिल्ह्यासह विविध भागातून प्राध्यापक, शिक्षक, रसिक, विद्यार्थी, पालक, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संघटनाचे सर्व पदाधिकारी सदस्य यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन माजी महापौर ॲड. नागेश सातेरी, प्रगतिशील लेखक संघाचे उपाध्यक्ष मधु पाटील, प्रा. अशोक आलगोंडी, प्रा. निलेश शिंदे यांनी उपस्थित राहून या वैचारिक मेजवानीचा आनंद घ्यावा मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन केले आहे. कार्यक्रम वेळेत चालू होणार आहे तरी सर्वांनी नोंद घ्यावी ही विनंती.

About Belgaum Varta

Check Also

खडेबाजार पोलिसांची मटका अड्ड्यावर धाड; एक आरोपी अटकेत

Spread the love  बेळगाव : खडेबाजार पोलीस ठाण्याच्या पथकाने मटका जुगार विरोधात कारवाई करत एका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *