Sunday , December 14 2025
Breaking News

Classic Layout

इंधन दरवाढीवरुन सुनावणार्‍या पंतप्रधान मोदींना मुख्यमंत्री ठाकरेंचं चोख उत्तर!

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोविडविषयक घेतलेल्या बैठकीत पेट्रोल-डिझेलवरील कराचा मुद्दा उपस्थित करून राज्य सरकारनं व्हॅट कमी न केल्यानंच महाराष्ट्रातील जनतेला त्रास सहन करावा लागत आहे, असा सूचक आरोप केला होता. दरम्यान, पंतप्रधानांच्या या आरोपांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चोख उत्तर दिलं आहे. महाराष्ट्रासारख्या देशाच्या विकासात सर्वात मोठे …

Read More »

बैठक कोरोनाची, पण मोदींची टीका महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालवर!

नवी दिल्ली : पेट्रोल, डिझेलच्या दरावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र, पश्चिम बंगालला आवाहन करताना इंधनावरील व्हॅट कमी करण्याच्या सुचना दिल्या आहेत. लोकांच्या हितासाठी इंधनावरील व्हॅट कमी करा, असे त्यांनी म्हटले आहे. देशातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवर पंतप्रधान मोदी यांनी आज (दि. 27) सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी ऑनलाइन संवाद साधला. यावेळी त्यांनी …

Read More »

युक्रेन रिटर्न विद्यार्थ्यांसाठी मोफत शिक्षण : माजी मंत्री एम. बी. पाटील यांचा स्तुत्य उपक्रम

विजापूर : रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरु झालेल्या युद्धानंतर भारतीय विद्यार्थ्यांना शर्थीच्या प्रयत्नातून मायदेशी परत आणण्यात आले. युद्धग्रस्त भूमीतून सदर विद्यार्थी मायदेशीर परतले. मात्र आता त्यांच्या उर्वरित शिक्षणाचा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. दरम्यान विजापूरमधील माजी मंत्री एम. बी. पाटील यांच्या पुढाकारातून काही विद्यार्थ्यांना वैद्यकीय शाखेअंतर्गत मार्फत मोफत शिक्षण देण्याचा निर्धार …

Read More »

पोलिसी बळ वापरून हलगा-मच्छे बायपासचे कामकाज; उच्च न्यायालयाची परवानगी असल्याचे जिल्हाधिकार्‍यांचे मत

बेळगाव : हालगा -मच्छे बायपास विरोधात शेतकर्‍यांचे आंदोलन सुरु आहे. या कामकाजाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली असून देखील पोलिसी बळाचा वापर करून पुन्हा कामकाज सुरु करण्यात आल्याचा आरोप शेतकर्‍यांनी केलाय. तर या कामकाजाला उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी देत आहेत. हलगा-मच्छे बायपास कामकाजाला शेतकर्‍यांनी सुरुवातीपासूनच तीव्र विरोध …

Read More »

पारीश्वाड येथे आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा

खानापूर (प्रतिनिधी) : पारीश्वाड (ता. खानापूर) येथे बुधवारी दि. 27 रोजी सकाळी शिशू अभिवृद्धी योजना खानापूर मलप्रभा स्त्रि शक्ती स्वसहाय्य संघ बँक सोसायटी खानापूर, पारीश्वाड ग्राम पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने आंतर राष्ट्रिय महिला दिनाच्या निमित्ताने स्त्री शक्ति समावेश कार्यक्रम सरकारी हायर प्रायमरी शाळा पारीश्वाड येथे पार पडला. यावेळी कार्यक्रमात पौष्टीक …

Read More »

कुंतिनाथ कलमणी यांना प्रभातकार वा. रा कोठारी पुरस्कार

बेळगाव : दर तीन वर्षांनी दक्षिण भारत जैन सभेचा वतीने देण्यात येणारे प्रभातकार वा. रा कोठारी आदर्श पत्रकारिता पुरस्कार बेळगावचे ज्येष्ठ पत्रकार आणि हळीय संदेश कन्नड वृत्तपत्राचे संपादक कुंतीनाथ कलमणी याना घोषित केले आहे अलीकडे सांगली यथे दक्षिण भारत जैन सभेचा अद्यक्ष रावसाहेब पाटील दादा यांचा अध्यक्षाखाली झालेला निवड समिती …

Read More »

कोल्हापूर महापालिकेचे कर्मचारी 13 मेपासून बेमुदत संपावर

कोल्हापूर : कोरोना कालावधीत स्वतःचा जीव धोक्यात घालून सेवा बजावणार्‍या महापालिका कर्मचार्‍यांनी विविध 22 प्रलंबित मागण्यांसाठी 13 मेपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. वारंवार चर्चा करूनही प्रश्न सुटत नसल्याने महापालिका कर्मचारी संघाने मंगळवारी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांना त्यासंदर्भात नोटीस दिली असून 12 मे रोजी मध्यरात्री बारापासून संपावर जाणार …

Read More »

रथ ओढताना विजेचा धक्का; १० भाविकांचा मृत्यू, १५ जखमी

चेन्नई : तामिळनाडूच्या तंजावर जिल्ह्यातील कालिमेडू शहरात उत्सवादरम्यान भाविकांना विजेचा धक्का बसला. तसेच १५ जण गंभीर जखमी झाले. भाविक मंदिराच्या रथाला ओढत असताना विजेची तार अडकली. यामध्ये दोन लहान मुलांसह १० जणांचा मृत्यू झाला. तमिळनाडूच्या तंजावार जिल्ह्यात भगवान अय्यपाचा उत्सव म्हणजे ९४ वा अप्पर गुरुपूजा उत्सव २६ एप्रिलला मंगळवारी रात्री …

Read More »

छत्रपती शाहू महाराजांच्या कलेचा वारसा वृद्धींगत व्हावा : जिल्हाधिकारी राहूल रेखावार

कोल्हापूर : छत्रपती शाहू महाराज हे द्रष्टे राजे होते. त्यांनी वेगवेगळ्या कलांना, कलावंताना प्रोत्साहन दिले.  छ. शाहू महाराजांच्या कलेचा वारसा अधिकाधिक वृद्धींगत व्हावा अशी अपेक्षा जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी व्यक्त केली. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्वानिमित्त जिल्हा प्रशासनामार्फत कसबा बावडा येथे आयोजित करण्यात आलेल्या, ‘ …

Read More »

कोगनोळीजवळ ट्रकची विद्युत खांबाला धडक

सुदैवाने जीवित हानी नाही कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार वर असणाऱ्या कोगनोळी फाट्यावर डिव्हायडरच्या मधोमध असणाऱ्या विद्युत खांबाला ट्रकची धडक बसण्याची घटना मंगळवार तारीख 26 रोजी सायंकाळी आठच्या सुमारास घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, कोल्हापूरहून बेळगावकडे जाणारा ट्रक येथील कोगनोळी फाट्यावर आला असता चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुभाजकाच्या …

Read More »