Sunday , December 14 2025
Breaking News

Classic Layout

….तर सीमावर्ती जिल्ह्यात पुन्हा पाळत

मुख्यमंत्री बोम्मई, नियमांचे पालन करण्याचे आवाहन बंगळूर : देशाच्या विविध भागांमध्ये कोविड- १९ च्या ताज्या चिंता आणि साथीच्या संभाव्य चौथ्या लाटेची भीती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर, केंद्राच्या सल्ल्यानुसार राज्याच्या विमानतळांवर आणि सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये खबरदारी आणि पाळत ठेवण्याचे उपाय पुन्हा सुरू केले जातील, असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी मंगळवारी सूचित …

Read More »

श्रीमंत सिध्दोजीराजे निपाणकर राजवाड्यात देव बोलवण्याचा कार्यक्रम

निपाणी (वार्ता) : येथे श्रीमंत सिध्दोजीराजे निपाणकर यांच्या राजवाड्यामध्ये सौंदत्ती येथे रेणुका देवीचा जग, महादेवाची कावड श्रीशैल आंध्र प्रदेश इथून व श्री क्षेत्र शिखर शिंगणापूर येथे निपाणकर यांच्या मानाची काठी व पालखी, जोतिबाची मानाची काठी जाऊन आल्यावर सर्व देव-देवतांना एकत्र बोलवायचा कार्यक्रम राजवाडामध्ये झाला. त्या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन …

Read More »

पाल्याच्या जडणघडणीत पालकांची भूमिका महत्त्वाची

युवा नेते उत्तम पाटील : आर. ए. पाटील पब्लिक शाळेचे स्नेहसंमेलन निपाणी (वार्ता) : कोरोना नंतरच्या काळात ऑनलाइन अभ्यासक्रमामुळे मुलांच्या जडणघडणीत मोठा बदल दिसून येत आहे. मोबाईल अति वापरामुळे मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होत आहे. आपल्या मुलांना शाळेत पाठविले की आपली जबाबदारी संपली नसून मुलांच्या जडणघडणीत पालकांची भूमिका महत्त्वाची आहे, असे …

Read More »

‘खेलो इंडिया’ मध्ये अक्षताची सुवर्ण पदकाची हॅट्ट्रिक!

बेळगाव : बेळगाव तालुक्यातील हालगा गावची होतकरू महिला वेटलिफ्टर अक्षता बसवंत कामती हिने बेंगलोर येथे आयोजित अखिल भारतीय पातळीवरील ‘2 ऱ्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स -2021’ क्रीडा महोत्सवामध्ये आज मंगळवारी वेटलिफ्टिंगच्या स्नॅच आणि क्लीन अँड जर्क प्रकारात सुवर्णपदक हस्तगत केले आहे. या पद्धतीने अक्षताने सलग तिसऱ्यांदा खेलो इंडिया स्पर्धेत सुवर्ण …

Read More »

सार्वजनिक वाचनालयाच्यावतीने पुस्तक दिन कार्यक्रम संपन्न

बेळगाव : बेळगाव शहरातील सार्वजनिक वाचनालयातर्फे पुस्तक दिना निमित्त आयोजित विशेष कार्यक्रम नुकताच उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडला. या कार्यक्रमांतर्गत वाचनालयाचा सातत्याने लाभ घेणाऱ्या वाचकांच्या प्रतिनिधींचा सन्मान करून त्यांचे मनोगत जाणून घेण्यात आले. सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहामध्ये आयोजित सदर कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर माजी महापौर गोविंदराव राऊत, वाचनालयाचे अध्यक्ष नेताजी जाधव, उपाध्यक्ष प्रसन्न हेरेकर …

Read More »

हुबळी दंगल प्रकरणी दोषींना सोडणार नाही : नलिनकुमार कटील

हुबळी : हुबळीची दंगल ही पूर्वनियोजित दंगल आहे. एआयएमआयएम असो किंवा इतर संघटनांवर पोलीस कारवाई करत आहेत. केवळ भावना भडकल्याने घडलेली ही घटना नाही. मंदिरांवर, पोलिसांवर झालेल्या हल्ल्याची आम्ही गंभीर दखल घेतली आहे. जे कोण याला जबाबदार आहेत त्यांना आम्ही सोडणार नाही, असे भाजपचे अध्यक्ष नलिनकुमार कटिल यांनी सांगितले. कटिल …

Read More »

‘जय किसान’ : डीसींसह पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा

बेळगाव : बनावट कागदपत्रे तयार करून शेतजमिनीची बिगरशेती (एनए) केल्याच्या आरोपावरून बेळगावचे तत्कालीन डीसी अर्थात जिल्हाधिकारी, तहसीलदार, बुडा आयुक्त कार्यालयातील अधिकारी यांच्यासह जय किसान भाजी मार्केटच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाच्या आदेशानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार मारुती पोलीस ठाण्यांमध्ये काल सोमवारी …

Read More »

छत्रपती संभाजीराजे यांना पोलंड देशाचा बेणे मेरितो सन्मान प्रदान

कोल्हापूर : युवराज संभाजीराजे छत्रपती यांना आज पोलंड देशाकडून छत्रपती संभाजीराजे यांना बेणे मेरितो पुरस्कार देऊन सन्मानित केले गेले. पोलंड देशाच्या नागरिकांना अथवा पोलंड देशाला सहकार्य केलेल्या इतर देशातील नागरिकांना पोलंड देशाच्या परराष्ट्र मंत्रालयामार्फत हा पुरस्कार प्रदान केला जातो. दुसऱ्या महायुद्धादरम्यान पोलंडच्या ५००० निर्वासित नागरिकांना कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याने आसरा दिला …

Read More »

संकेश्वर औषध संघटनेचे कार्य स्तुत्य : रमेश कत्ती

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर औषध व्यापारी संघटनेने हुक्केरी येथील मोफत आरोग्य तपासणी शिबिराला मोफत औषधे देऊन शिबिराला हातभर लावण्याचे कार्य केले आहे. संकेश्वर औषध संघटनेचे कार्य स्तुत्य असल्याचे बेळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष माजी खासदार रमेश कत्ती यांनी सांगितले. हुक्केरी शासकीय रुग्णालयातर्फे आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिरात संकेश्वर औषध …

Read More »

संकेश्वरात मराठा वधू-वर मेळाव्याला “मास्क’ बंधनकारक….

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वरात प्रथमच येथील रुक्मिणी गार्डनमध्ये येत्या रविवार दि. १ मे २०२२ रोजी सकाळी १० ते दुपारी ४ वाजता भव्य मराठा वधू-वर परिचय महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्याचे आयोजन शुभकार्य वधुवर सुचक केंद्र, न्यायनिवाडा लोकनेता फौंडेशनच्यावतीने करण्यात आले आहे. वधुवर महामेळाव्याला उपस्थित राहणाऱ्यांना मास्क बंधनकारक राहणार आहे. …

Read More »