Monday , April 20 2026
Breaking News

पाल्याच्या जडणघडणीत पालकांची भूमिका महत्त्वाची

Spread the love


युवा नेते उत्तम पाटील : आर. ए. पाटील पब्लिक शाळेचे स्नेहसंमेलन

निपाणी (वार्ता) : कोरोना नंतरच्या काळात ऑनलाइन अभ्यासक्रमामुळे मुलांच्या जडणघडणीत मोठा बदल दिसून येत आहे. मोबाईल अति वापरामुळे मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होत आहे. आपल्या मुलांना शाळेत पाठविले की आपली जबाबदारी संपली नसून मुलांच्या जडणघडणीत पालकांची भूमिका महत्त्वाची आहे, असे मत युवा नेते अरिहंत शिक्षण संघाचे अध्यक्ष उत्तम पाटील यांनी व्यक्त केले. बोरगाव येथील आर. ए. पाटील पब्लिक शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन संस्थापक अध्यक्ष रावसाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. त्यावेळी उत्तम पाटील बोलत होते.
उत्तम पाटील म्हणाले, बोरगाव आणि परिसरातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना केंद्रीय सी.बी.एस.सी. पॅटर्नचा इंग्रजी अभ्यासक्रम मिळावा व ग्रामीण भागातील विद्यार्थी हा उच्चशिक्षित व्हावा, यासाठी रावसाहेब पाटील व उद्योजक अभिनंदन पाटील यांनी विशेष प्रयत्न करून या ठिकाणी आर. ए. पाटील इंग्रजी शाळेची स्थापना केली. या शाळेत शिक्षणाबरोबरच विद्यार्थी हा सर्वगुणसंपन्न व्हावा, यासाठी प्रयत्न केले जात आहे. विद्यार्थ्यांच्या भौतिक वाढ व्हावा व त्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी प्रत्येक वर्षी वेगवेगळे उपक्रम हाती घेण्यात येतो. प्रत्येक महिन्यात पालकांची सभा घेऊन त्यांच्या अभ्यासक्रमाबाबत सांगण्यात येते. सर्व संगणीकृत असलेल्या या शाळेचा निकाल हा शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडवणारी असल्याचे सांगितले.
अशोककुमार असोदे यांनी, अरिहंत परिवाराने सहकार क्षेत्राबरोबरच शिक्षण क्षेत्रातही क्रांती घडवीत आहे. या ठिकाणी शिक्षण घेणारा प्रत्येक विद्यार्थी हा उच्चशिक्षित होत असून विद्यार्थ्यांचे भविष्य याठिकाणी उज्वल होत आहे. ग्रामीण भागात अत्याधुनिक इंग्रजी माध्यम शाळेची स्थापना करून संपूर्ण निपाणी तालुक्याला मार्गदर्शक असल्याचे सांगितले.
स्नेहसंमेलनात देशभक्तीपर गीत, धार्मिक गीत, भावगीत, पारंपरिक कलागुणांना वाव देणारे नाटक, शेतकरी जीवनमान उंचावणार मार्गदर्शनपर भाषण असे विविध गाणी सादरी करण्यात आली.
प्रारंभी प्राचार्य शमिका शहा यांनी स्वागत केले. अनुराग पाटील यांनी प्रास्ताविक केले.
कार्यक्रमास समूह संपनमूल अधिकारी माळी, उद्योजक अभिनंदन पाटील, संचालिका मीनाक्षी पाटील, निरंजन पाटील, संचालक अभयकुमार करोले, सतीश पाटील, राकेश चिंचणी, सौ. दिपाली पाटील, विनयश्री पाटील, धनश्री पाटील, पृथ्वीराज पाटील, सुभाष शेट्टी, मनोजकुमार पाटील, एम. सी. उलपे, राजू मगदूम, अण्णासाहेब भोजकर, गजानन कावडकर, अमोल नाईक, पिंटू पाटील, अशोक बंकापुरे, आर. टी .चौगुले, बाळासाहेब हावले यांच्यासह नूतन नगरसेवक, पालक, विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित नितीन कांबळे यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

मध्यवर्ती शिवाजी तरुण मंडळातर्फे शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रम

Spread the love  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील मध्यवर्ती शिवाजी तरुण मंडळातर्फे रविवारी (ता.१९) शिवजयंती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *