Sunday , December 14 2025
Breaking News

Classic Layout

रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बेळगाव : रेड क्रॉस संस्था बेळगाव व संत निरंकारी मिशन यांच्या संयुक्त विद्यमाने मानव एकता दिवसानिमित्त येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान सर्वश्रेष्ठ दान मानत रक्तदात्यांनी रक्तदान करून रुग्णांचा जीव वाचविण्याकरिता हातभार लावला. यावेळी अध्यक्षस्थानी मारुती मोरे होते. तसेच व्यासपीठावर डॉक्टर डी. एन. मिसाळे, कर्नल विनोदिनी शर्मा, मुख्याध्यापक …

Read More »

खानापूर सरकारी दवाखान्यात महाआरोग्य शिबिरात १४ स्टॅालचे आयोजन

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील सरकारी दवाखान्याच्या आवारात सोमवारी दि. २५ रोजी केंद्र व राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात होते. या शिबीरात १४ स्टाॅलचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी सकाळी महाआरोग्य शिबिराचे उदघाटन आमदार अंजली निंबाळकर यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपिठावर तहसीदार प्रविण जैन, डॉ. एम. व्ही. …

Read More »

हत्तरवाटमधील महिलेने जन्मले तिळे!

निपाणीतील पाटील नर्सिंग होममध्ये प्रसूती : डॉ. साईनाथ पाटील यांची माहिती निपाणी (वार्ता) : आतापर्यंत बहुतांश महिलांनी तिळ्यांना जन्म दिला आहे. पण त्यापैकी काही मोजकीच अर्भके जगत असल्याच्या घटना सर्वांनी पाहिल्या आहेत. पण निपाणी येथील कित्तूर चन्नम्मा चौकात शेजारील पाटील नर्सिंग होममध्ये एका महिलेने तिळ्यांना जन्म दिला असून बालके व …

Read More »

गुरुवंदना कार्यक्रमासाठी सकल मराठा समाजाचे श्री भगवानगिरी महाराजांना, निपाणी सरकाराना निमंत्रण

बेळगाव : सकल मराठा समाज बेळगावच्या सदस्यांनी काल रविवारी कसबा नूल (ता. गडहिंग्लज) येथील मराठा समाजाच्या रामनाथगिरी (समाधी) मठाचे मठाधिपती जगतगुरु राष्ट्रीय धर्माचार्य श्री श्री भगवानगिरी महाराज यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार करण्याद्वारे त्यांना ‘गुरुवंदना’ कार्यक्रमासाठी निमंत्रित केले. श्री श्री भगवानगिरी महाराज यांना हल्लीच काशी धर्म पीठाचे जगद्गुरू शंकराचार्य, स्वामी …

Read More »

आ. श्रीमंत पाटील यांचा आराधना महोत्सवात सहभाग

अथणी : उगार बुद्रूक येथील ग्रामदेवता पद्मावती मंदिरात नुकतीच महामंगल आराधना महोत्सवाला सुरवात झाली. माजी मंत्री व कागवाडचे आ. श्रीमंत पाटील यांनी सहभाग घेऊन देवीचे दर्शन व महास्वामींचा आशिर्वाद घेतला. हा आराधना महोत्सव भव्य प्रमाणात साजरा करण्यात येतो. या महोत्सवात श्रीक्षेत्र सोंदा मठाचे जगद्गुरू अकलंकेसरी स्वस्तिश्री भट्टाकलंक भट्टारक स्वामी, श्रीक्षेत्र …

Read More »

गुंडेवाडी-चमकेरी रस्त्यासाठी 25 लाख

आ. श्रीमंत पाटील यांच्याकडून प्रयत्न : रस्ता कामास प्रारंभ संबरगी : गेल्या अनेक दिवसांची मागणी असलेल्या गुंडेवाडी-चमकेरी रस्ताकामाचा नुकताच प्रारंभ झाला. माजी मंत्री व कागवाडचे आ. श्रीमंत पाटील यांच्या हस्ते कुदळ मारुन याचे उद्घाटन झाले. सदरचा रस्ता बराच खचला होता. त्यामुळे येथून ये-जा करणार्‍या जनतेची अडचण होत होती. याचा विचार …

Read More »

एस. जी. बाळेकुंद्री महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याचा धबधब्यात बुडून मृत्यू

बेळगाव : तिलारी धरणाच्या पायथ्याशी असलेल्या अडक्याच्या वझर धबधब्यांमध्ये बुडवून बेळगावच्या अभियांत्रिकी विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना काल रविवारी घडली. हार्दिक प्रवीण परमार (वय 22, मूळ रा. गोवा, सध्या रा. एस. जी. बाळेकुंद्री अभियांत्रिकी महाविद्यालय, शिवबसवनगर, बेळगाव) असे धबधब्यात बुडून मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्याचे नांव आहे. मिळालेली माहितीनुसार काल रविवारी महाविद्यालयाला …

Read More »

कारच्या धडकेत कल्लेहोळचा वृद्ध जागीच ठार

बेळगाव : भरधाव कारच्या धडकेत शंकर बाळू यादव (वय ६०, रा. कल्लेहोळ ता. जि. बेळगाव) यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात आज सायंकाळी बेळगाव- वेंगुर्ला रस्त्यावरील तांबूळवाडी फाटा आणि ताम्रपर्णी नदीवरील पुलानजीक घडला. गवसे (ता. चंदगड) येथील नातेवाईकांच्या लग्न समारंभाला शंकर यादव गेले होते. लग्न उरकून ते कल्लेहोळ गावी आपल्या …

Read More »

‘बेळगाव जुडो संघाला सर्वसाधारण विजेतेपद’

बेळगाव : कर्नाटक जुडो असोसिएशनच्या वतीनं आयोजित कूटची भवन बंगळुरू येथे नुकत्याच पार पडलेल्या 40 व्या राज्यस्तरीय जुडो स्पर्धेत बेळगाव जुडो केंद्राने सर्वसाधारण विजेतेपद पटकावत घवघवीत यश संपादन केलं आहे. या स्पर्धेत जुडो कोच रोहिणी पाटील व सहाययक कोच कुतुजा मुलतानी यांच्या नेतृत्वाखालील खेळाडूंनी सहभागी होत नेत्रदीपक यश मिळवले आहे. …

Read More »

बेनाडीच्या अमोल हजारेची मर्चंट नेव्हीमध्ये भरारी!

प्रतिकूल परिस्थितीत मिळवले यश : बेनाडी हायस्कूलचा पहिलाच विद्यार्थी निपाणी : जीवनात जिद्द, चिकाटी आणि सातत्याने अभ्यास केल्यास यश दूर राहत नाही. पण त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागते. हे बेनाडीच्या सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या अमोल अण्णासाहेब हजारे यांनी सिद्ध करून दाखविले आहे. सर्वसाधारण परिस्थिती असलेल्या कुटुंबात ध्येय उराशी बाळगून  प्रयत्न केल्याने …

Read More »