Monday , April 20 2026
Breaking News

हत्तरवाटमधील महिलेने जन्मले तिळे!

Spread the love


निपाणीतील पाटील नर्सिंग होममध्ये प्रसूती : डॉ. साईनाथ पाटील यांची माहिती
निपाणी (वार्ता) : आतापर्यंत बहुतांश महिलांनी तिळ्यांना जन्म दिला आहे. पण त्यापैकी काही मोजकीच अर्भके जगत असल्याच्या घटना सर्वांनी पाहिल्या आहेत. पण निपाणी येथील कित्तूर चन्नम्मा चौकात शेजारील पाटील नर्सिंग होममध्ये एका महिलेने तिळ्यांना जन्म दिला असून बालके व महिला सुखरूप आहे. आतापर्यंत हॉस्पिटलमध्ये १२ व्या तिळ्यांची प्रसुती केल्याची माहिती डॉ. साईनाथ पाटील यांनी दिली. कावेरी मगदूम (वय १९ रा. हत्तरवाट) असे या महिलेचे नाव आहे.
मागील आठ महिन्यापूर्वी मगदूम ही महिला निपाणी येथील डॉ. साईनाथ पाटील यांच्या हॉस्पिटलमध्ये गरोदरपणातील तपासणीसाठी आली होती. त्यानंतर सदर महिलेला तिळे असल्याचे समजल्यानंतर डॉ. पाटील यांनी तिच्यावर योग्य पद्धतीने औषध उपचार केले. या महिलेची शुक्रवारी (ता.२२) प्रसूती झाली असून तीन बालकांमध्ये दोन मुली व एक मुलगा आहे. सर्वांचेच वजन योग्य आहे. सात किंवा आठ महिन्यात तिळ्यांना जन्म देण्याची घटना क्वचितच घडत असते. याशिवाय अशा प्रसूतीच्या वेळी अर्भकांना अतिदक्षता विभागात ठेवावे लागते पण अशा प्रकारची कोणतीही गरज या तिन्ही बालकांना लागलेली नाही. ७२ तासानंतर तिन्ही बालके सुखरूप आहेत.
—-
३२ वर्षात तिळ्यांना जन्म
‘पाटील नर्सिंग होमची ही दुसरी पिढी कार्यरत आहे. गेल्या ३२ वर्षापासून आपण येथे वैद्यकीय सेवा बजावत असून नैसर्गिक प्रसुतीसाठी प्रयत्न केले आहेत. बाराव्या तिळ्यांच्या जन्मानंतर सध्या आणखी एक तिळे प्रसूतीपूर्व देखरेखीखाली असल्याचे डॉ. साईनाथ पाटील यांनी सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

मध्यवर्ती शिवाजी तरुण मंडळातर्फे शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रम

Spread the love  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील मध्यवर्ती शिवाजी तरुण मंडळातर्फे रविवारी (ता.१९) शिवजयंती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *