Monday , September 21 2026
Breaking News

बेनाडीच्या अमोल हजारेची मर्चंट नेव्हीमध्ये भरारी!

Spread the love
प्रतिकूल परिस्थितीत मिळवले यश : बेनाडी हायस्कूलचा पहिलाच विद्यार्थी
निपाणी : जीवनात जिद्द, चिकाटी आणि सातत्याने अभ्यास केल्यास यश दूर राहत नाही. पण त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागते. हे बेनाडीच्या सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या अमोल अण्णासाहेब हजारे यांनी सिद्ध करून दाखविले आहे. सर्वसाधारण परिस्थिती असलेल्या कुटुंबात ध्येय उराशी बाळगून  प्रयत्न केल्याने अमोलची अमेरिका येथील मर्चंट नेव्हीमध्ये जूनियर अभियंता म्हणून निवड झाली आहे. त्यामुळे बेनाडीच्या अमोलने अटकेपार झेंडा रोवला असून त्याच्या या भरारीचे बेनाडी व परिसरात कौतुक होत आहे.
बेनाडी येथील धनगर कुटुंबात अमोल याचा जन्म झाला. वडील अण्णासाहेब हजारे हे इचलकरंजी जनता बँकेमध्ये कार्यरत आहेत. अमोल याचे प्राथमिक शिक्षण सरकारी शाळेत व माध्यमिक शिक्षण काडसिद्धेश्वर हायस्कूलमध्ये झाले. शालेय जीवनापासूनच त्यांनी मर्चंट नेव्हीमध्ये जाण्याचे स्वप्न बाळगून त्यानुसार अभ्यास केला. त्यानंतर बेळगाव येथे ज्योती कॉलेजमध्ये पुढील शिक्षण घेतले. त्याचे चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यानंतर मंगळूर येथे बीईचे शिक्षण पूर्ण केले. या ठिकाणी शिक्षण घेत असताना श्रीनिवास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीतर्फे कॅम्पस मुलाखती घेण्यात आल्या. त्यामध्ये अमोलची मर्चंट नेव्हीमध्ये निवड करण्यात आली. निवडीनंतर गोवा येथे चार महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर आता कॅनडा येथील व्हॅलेस इंडिया टेक-सर्व्हिसेस प्रा. लि. मध्ये तो नोकरीसाठी रवाना झाला आहे. तेथून तो अमेरिका येथील नेव्ही मर्चंटमध्ये कार्यरत राहणार आहे.
अमोलच्या वडील अण्णासाहेब हजारे व आई सुशीला हजारे यांनी परिश्रम घेतले. अमोलच्या या यशाबद्दल बेनाडी आणि परिसरातून त्याचे कौतुक होत आहे. सर्वसामान्य धनगर कुटुंबात जन्म घेऊन इतिहासात प्रथमच नेहमी मर्चंटमध्ये दाखल होणारा अमोल हा पहिलाच विद्यार्थी आहे. त्याच्यासाठी महाविद्यालयाचे प्राध्यापक व मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *