Wednesday , December 17 2025
Breaking News

Classic Layout

माजी महापौर नागेश सातेरी यांना पत्नीवियोग

  बेळगाव : गुरुवार पेठ टिळकवाडी येथील रहिवासी कॉ. सौ. कला नागेश सातेरी (वय 72) यांचे अल्पशा आजाराने आज मंगळवार दि. 22 रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पती माजी महापौर ऍड. नागेश सातेरी, मुलगा ऍड. अजय सातेरी, एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. जायंट्स आय फौडेशनच्या माध्यमातून त्यांचे मरणोत्तर …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले : मुख्यमंत्री सिद्धरामय्या

  बंगळूर : मुडा भूखंड वाटपाच्या संदर्भात ईडीने त्यांच्या पत्नी पार्वती यांना बजावलेले समन्स रद्द करण्याचा आदेश कायम ठेवणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी स्वागत केले आहे. सर्वोच्च न्यायालयाचा हा ऐतिहासिक आदेश केंद्र सरकारला चपराक असल्याची त्यांनी निकालावर प्रतिक्रीया दिली. मुडा प्रकरणासंदर्भात माझ्या आणि माझ्या कुटुंबावर बनावट आरोप करणाऱ्या …

Read More »

बेळगावातील तिसरे रेल्वे ओव्हर ब्रिजवरील खड्ड्यांवर अनोखे आंदोलन

  बेळगाव : बेळगाव शहरातील तिसऱ्या रेल्वे गेटजवळ वाढलेल्या खड्ड्यांविरोधात येथील नागरिकांनी रांगोळी काढून अभिनव पद्धतीने निषेध व्यक्त केला. येत्या दोन-तीन दिवसांत रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. बेळगावच्या चौथ्या रेल्वे गेटवर भुयारी मार्ग बांधकामामुळे वाहतूक वळवण्यात आली आहे. यामुळे तिसऱ्या रेल्वे गेटवर वाहतुकीची कोंडी …

Read More »

2006 मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी उच्च न्यायालयाचा धक्कादायक निकाल; आरोपी निर्दोष

  मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील लोकल ट्रेनच्या फर्स्टक्लास डब्यांमध्ये 11 जुलै 2006 रोजी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाचा धक्कादायक निकाल आज उच्च न्यायालयाने दिला. या स्फोटात 284 जणांचा मृत्यू आणि 800 पेक्षा अधिक जखमी झालेले होते. या प्रकरणात तपास यंत्रणांनी अटक केलेल्या 4 आरोपींना सत्र न्यायालयाने फाशीची तर उर्वरित …

Read More »

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा

  नवी दिल्ली : भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी आरोग्याच्या कारणामुळे पद सोडले असल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले की, ‘प्रकृतीला प्राधान्य देण्यासाठी वैद्यकीय सल्ल्याचे पालन करत मी संविधानाच्या कलम 67(अ) नुसार तात्काळ भारताच्या उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा देत आहे.’ जगदीप धनखड यांनी …

Read More »

मुडा प्रकरण : ईडीचा अर्ज ‘सर्वोच्च’ने फेटाळला; मुख्यमंत्री सिद्धरामय्या, त्यांच्या पत्नी पार्वती यांना दिलासा

  बंगळूर : म्हैसूर विकास प्राधिकरण (मुडा) घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या पत्नी पार्वती आणि नगरविकास मंत्री भैरथी सुरेश यांना ईडीने बजावलेले समन्स रद्द करण्याचा राज्य उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. त्यामुळे मुडा प्रकरणात मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि त्यांच्या पत्नी पार्वती यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि …

Read More »

वडगाव ग्रामदेवता श्री मंगाई देवी यात्रोत्सव उद्या!

  बेळगाव : शेतकऱ्यांची देवी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री मंगाई देवीच्या यात्रोत्सवाला उद्या मंगळवार दिनांक 22 जुलै रोजी सुरुवात होणार आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर वडगाव परिसरात नागरिकांनी यात्रेची जय्यत तयारी केली आहे. मंदिर परिसरात पूजेच्या साहित्यांची दुकाने थाटण्यात आली आहे. मंगाई यात्रेच्या निमित्ताने मंदिर परिसरात विविध खेळणी, गृहपयोगी वस्तू तसेच खाद्यपदार्थांची …

Read More »

युवा समिती निपाणी तालुका यांच्या वतीने भिवशी, लखणापुर, पडलीहाल, अक्कोळ, ममदापूर येथे शैक्षणिक साहित्य वाटप

  निपाणी : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती निपाणी तालुका यांच्या वतीने भिवशी, लखणापुर, पडलीहाल, अक्कोळ, ममदापूर येथे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी मीडिया खजिनदार नेताजी पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, मराठी भाषा संस्कृती वाचविणे यासाठी युवा समिती शैक्षणिक साहित्य वाटप गेले चार वर्षे करत आहेत. मुलांनी मराठी …

Read More »

राज्य सरकारी निवृत्त कर्मचारी संघाचे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधानांना निवेदन सादर

  बेळगाव : निवृत्त कर्मचाऱ्यांना सुधारित पेन्शन मिळावे या मागणीसाठी आज बेळगाव येथे कर्नाटक राज्य सरकारी निवृत्त कर्मचारी संघाने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधानांना निवेदन सादर केले. अखिल भारतीय राज्य पेन्शनधारक संघटनेने सर्व राज्यांतील निवृत्त कर्मचाऱ्यांच्या वतीने एकत्रित स्वाक्षरी केलेले निवेदन आज निदर्शने करत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधानांना सादर केले. यावेळी आंदोलकांनी सांगितले की, “२०२५ …

Read More »

माजी सैनिक संघटनेतर्फे 26 जुलै रोजी कारगिल, ऑपरेशन सिंदूर विजयोत्सव!

  बेळगाव : अखिल कर्नाटक माजी सैनिक संघटनेच्या बेळगाव जिल्हा शाखेतर्फे येत्या शनिवार दि. 26 जुलै 2025 रोजी कारगिल आणि ऑपरेशन सिंदूर विजयोत्सव भव्य प्रमाणात साजरे केले जाणार असून यानिमित्ताने मोठी बाईक रॅली देखील काढली जाणार आहे, अशी माहिती बेळगाव जिल्हा माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष बसप्पा तरवार यांनी दिली. शहरातील …

Read More »