Monday , September 21 2026
Breaking News

राज्य सरकारी निवृत्त कर्मचारी संघाचे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधानांना निवेदन सादर

Spread the love

 

बेळगाव : निवृत्त कर्मचाऱ्यांना सुधारित पेन्शन मिळावे या मागणीसाठी आज बेळगाव येथे कर्नाटक राज्य सरकारी निवृत्त कर्मचारी संघाने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधानांना निवेदन सादर केले.
अखिल भारतीय राज्य पेन्शनधारक संघटनेने सर्व राज्यांतील निवृत्त कर्मचाऱ्यांच्या वतीने एकत्रित स्वाक्षरी केलेले निवेदन आज निदर्शने करत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधानांना सादर केले.

यावेळी आंदोलकांनी सांगितले की, “२०२५ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राज्य निवृत्त कर्मचाऱ्यांना अतिरिक्त सुविधा दिल्या जाणार नाहीत अशी घोषणा केली आहे, हे निंदनीय आहे. आज केवळ कर्नाटकातच नाही, तर देशभरात निवृत्त कर्मचारी निदर्शने करत आहेत. केंद्र सरकारने निवृत्त कर्मचाऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केल्यास, तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा इशाराही आंदोलकांनी दिला. या प्रसंगी अध्यक्ष एस.पी. सिद्नाळ, बेंडिगेरी, एम.व्ही. हिरेमठ, एम.एस. मुदकवी, केंचरावत, सुजीत राजपूत, भांवी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *