Sunday , December 14 2025
Breaking News

Classic Layout

राज्यातील वीज निर्मितीवर कोणताही परिणाम नाही : सुनीलकुमार

बंगळूर : राज्यात अतिरिक्त वीज असल्याचे सांगून उर्जा मंत्री व्ही. सुनीलकुमार मंगळुरू येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की, राज्याची विजेची गरज भागवली जात आहे. राज्यातील वीजेच्या तुटवड्याचे विरोधी पक्षांचे आरोप निराधार आहेत. किंबहुना इतर राज्यांच्या तुलनेत राज्यात वीजपुरवठा व्यवस्थित आहे. राज्याने १४ हजार ८०० मेगावॅटपर्यंत विजेची गरज पूर्ण केली आहे. सध्या …

Read More »

शिवजयंती चित्ररथ मिरवणूक शांततेत पार पाडा

बेळगाव : कॅम्पमधील रहदारी पोलीस स्थानकात आज शांतीसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या सभेत 4 मे रोजी होणाऱ्या शिवजयंती उत्सवानिमित्त मिरवणुकीमध्ये विनाकारण डॉल्बीचा आवाज मोठा ठेवू नये अशी सूचना करण्यात आली. त्याचबरोबर चित्ररथ मिरवणूक लवकरात लवकर आणि शांततेत संपवावे, असे आवाहन देखील करण्यात आले. यावेळी एसीपी चंद्रप्पा, खडेबाजार पोलीस …

Read More »

कोवाड ताम्रपर्णी नदितील गाळ व अतिक्रमण काढण्याची जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे कोवाड व्यापारी संघटनेची मागणी

तेऊरवाडी (एस. के. पाटील) : कोवाड ( ता. चंदगड ) बाजारपेठ व कोवाड गावात ताम्रपर्णी नदिच्या उथळ व अतिक्रमीत झालेल्या पात्रामुळे उद्भवणाऱ्या पुर पुरस्थितीमुळे व्यापारी वर्गाचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे या नदिपात्रातील गाळ व अतिक्रमणे काढण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे निवेदन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना कोवाड व्यापारी संघटनेने आज …

Read More »

शिवजयंती मिरवणूक मार्गाची पोलीस अधिकार्‍यांनी केली पाहणी

बेळगाव : छत्रपती शिवाजी महाराज आणि बसवेश्वर जयंती आणि रमजान तिन्ही एकाचवेळी आल्याने बेळगाव पोलिसांनी काटेकोर उपाययोजना केल्या आहेत. बेळगावात आज शिवजयंती मिरवणूक मार्गाची पोलीस अधिकार्‍यांनी पाहणी केली. बेळगावात शिवजयंती उत्सवासाठी क्षणगणना सुरु झाली आहे. मध्यवर्ती शिवजयंती उत्सव महामंडळाच्या अधिपत्याखाली शिवजयंतीच्या चित्ररथ मिरवणुकीची तयारी आतापासूनच उत्सव मंडळांनी सुरु केली आहे. …

Read More »

शहरातील कचर्‍यापासून खानापूर नगरपंचायत करणार खत निर्मिती

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील कचर्‍यापासून गांढूळ खत निर्मिती प्रकल्पाला सुरूवात होत आहे. मन्सापूर येथील कचरा डेपोत सदर प्रकल्प होणार त्यामुळे प्रत्येक महिन्याला एक टन गांढूळ खत निर्मिती केली जाणार आहे. त्यामुळे गांढूळ खत निर्मिती होणार दुसरीकडे शहरातील कचर्‍याच्या विल्हेवाटीची आडचण दूर होण्यास मदत होणार. खानापूर शहरापासून जवळ असलेल्या मन्सापूर …

Read More »

नंदगड संगोळी रायण्णा समाधीस्थळी माजी सैनिकांचा सत्कार

खानापूर (प्रतिनिधी) : नंदगड (ता. खानापूर) येथील वीर संगोळी रायण्णा समाधीस्थळी भाजप युवा मोर्चा खानापूर यांच्यावतीने तालुक्यातील माजी सैनिकांचा सत्कार नुकताच करण्यात आला. यावेळी बोलताना भाजपचे नेते व माजी आमदार अरविंद पाटील म्हणाले की, आपल्या भाजप पक्षाच्या अध्यक्षाच्या आदेशानुसार माजी सैनिकांचा आदर व्हावा. ज्यांनी आपले आयुष्य देशाच्या संरक्षणासाठी खर्ची घातले. …

Read More »

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची सामाजिक कार्यकर्ते विजय मेत्राणी यांच्या घरी भेट

विविध विषयावर चर्चा : मेत्राणी कुटुंबीयांतर्फे सत्कार निपाणी : येथील सामाजिक कार्यकर्ते विजय मेत्राणी यांच्या घरी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी सदिच्छा भेट दिली. विजय मेत्राणी हे माजी केंद्रीय मंत्री बी. शंकरानंद यांचे भाचे आहेत. या भेटी दरम्यान मेत्राणी व आठवले यांच्यात विभागातील शैक्षणिक, राजकीय सामाजिक प्रश्नावर चर्चा …

Read More »

जिल्हा प्रशासनाकडून त्रिभाषा सूत्रांची अंमलबजावणी; मध्यवर्ती समितीच्या पाठपुराव्याला यश

बेळगाव : सरकारी कार्यालयं, रस्ते, बसेस आदींच्या नामफलकांमध्ये मराठी भाषेचा अंतर्भाव करावा या मागणीसाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने सुरू ठेवलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. जिल्हा प्रशासनासह बेळगाव महापालिकेकडून कालपासून शहरातील रस्त्यांचे नामफलक मराठी भाषेत उभारण्यास सुरुवात करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनासह स्मार्ट सिटी, बेळगाव महापालिकेकडून शहरातील रस्त्यांच्या नामफलकांमध्ये त्रिभाषा सूत्राचा …

Read More »

बेळगाव बार असोसिएशनतर्फे उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांचा सत्कार

बेळगाव : बेळगाव बार असोसिएशनच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांच्या सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार मंगला अंगडी यांच्याहस्ते पार पडले. या कार्यक्रमात जिल्हा प्रधान आणि सत्र न्यायालयाचे न्यायाधीश सी. एम. जोशी उपस्थित होते. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी बोलताना न्यायाधीश सी. एम. …

Read More »

आमदार अमोल मिटकरी यांच्यावर हिंदूंच्या धार्मिक विधींची टिंगल केल्याप्रकरणी पोलीस तक्रार

कठोर कारवाईची हिंदु संघटनांची मागणी कोल्हापूर : राष्ट्रवादी पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी एका जाहीर कार्यक्रमात हिंदू धर्मातील कन्यादान विधी, त्यांतील मंत्र आणि पुरोहितवर्ग यांचा अपमान केला. तसेच उपस्थितांना ‘या विधींच्या माध्यमातून बहुजन समाजाला फसवले जात आहे’ असे वक्तव्यही केले. त्यांनी या भाषणातून एका समाज घटकाच्या विरोधात जातीय तेढ निर्माण …

Read More »