Monday , April 20 2026
Breaking News

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची सामाजिक कार्यकर्ते विजय मेत्राणी यांच्या घरी भेट

Spread the love


विविध विषयावर चर्चा : मेत्राणी कुटुंबीयांतर्फे सत्कार
निपाणी : येथील सामाजिक कार्यकर्ते विजय मेत्राणी यांच्या घरी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी सदिच्छा भेट दिली. विजय मेत्राणी हे माजी केंद्रीय मंत्री बी. शंकरानंद यांचे भाचे आहेत. या भेटी दरम्यान मेत्राणी व आठवले यांच्यात विभागातील शैक्षणिक, राजकीय सामाजिक प्रश्नावर चर्चा झाली. त्यानंतर आठवले यांचा सत्कार करण्यात आला.
गेल्या तीन दशकापासून देशातील सर्व क्षेत्रातील दिग्गजांशी मेत्राणी कुटुंबियांचे घनिष्ठ संबंध आहेत. माजी केंद्रीय मंत्री बी शंकरानंद यांनी देशातील अनेक नेत्यांच्या प्रवासात खंबीर मार्गदर्शकाची भूमिका बजावली होती. आठवले यांच्या राजकीय प्रवासात बी. शंकरानंद यांनी मोलाचे सहकार्य केले आहे.
त्यांच्या कार्याचा वसा घेऊन विजय मेत्राणी हे देखील दीनदलित, तळागाळातील गरजू लोकांसाठी सतत कार्यरत असतात. मंत्री रामदास आठवले यांनी भेटी दरम्यान मेत्राणी कुटुंबियांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी हालशुगरचे अध्यक्ष चंद्रकांत कोठीवाले, संचालक प्रताप मेत्राणी, संचालक पप्पू पाटील, अखिल भारतीय दलित संघटनेचे अध्यक्ष मल्लेश चौगुले, कोल्हापूर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, पश्चिम महाराष्ट्र जिल्हाध्यक्ष प्रा. शहाजी कांबळे, कर्नाटक डोंबारी समाजाचे अध्यक्ष अशोक लाखे, प्रा. सुरेश कांबळे, सामाजिक कार्यकर्ते इर्शाद कोच्चरगी, किसन दावणे, अजित पोळ, मृगेश कल्याणशेट्टी, दत्ता लाटकर, यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

मध्यवर्ती शिवाजी तरुण मंडळातर्फे शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रम

Spread the love  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील मध्यवर्ती शिवाजी तरुण मंडळातर्फे रविवारी (ता.१९) शिवजयंती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *