Sunday , December 14 2025
Breaking News

Classic Layout

खानापूरच्या वनविभागाकडून तब्बल दोन महिन्याने व्याघ्र गणना!

खानापूर (प्रतिनिधी) : सालाबादप्रमाणे यंदाही खानापूर वनविभागाने व्याघ्र गणना दि. 4 फेब्रुवारी पासून सुरू करण्यात आली. मात्र खानापूर वनविभागाचे एसीएफ संतोष चव्हाण यांनी तब्बल दोन महिन्यानंतर माहिती दिली. व्याघ्र गणनेच्या निमित्ताने जंगलातील एकूण प्राण्यांची संख्याही मोजण्यात आली. त्यामुळे खानापूरच्या वनवैभवात भर पडून संख्या समजण्यास मदत झाली. खानापूर तालुक्यातील घनदाट जंगलात …

Read More »

कंत्राटदार संघटनेचे 25 मेपासून काम बंद आंदोलन

संघटनेचे अध्यक्ष केंपाण्णा, भ्रष्टाचाराची कागदपत्रे जाहीर करण्याचा इशारा बंगळूर : कर्नाटक स्टेट कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन (केसीएससीए)ने बुधवारी जाहीर केले, की त्यांचे सर्व सदस्य विविध सरकारी विभागांमधील बेकायदेशीर भ्रष्टाचारच्या निषेधार्थ 25 मे पासून एक महिना नागरी कामे बंद ठेवतील. असोसिएशनने सरकारमधील ’40 टक्के किकबॅक’ घोटाळ्याचा पर्दाफाश करण्यासाठी स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केली …

Read More »

‘हलाल’च्या आग्रहामुळे भारतात बहुसंख्य हिंदूंना खाण्याचे स्वातंत्र्यही नाही!

मुंबई : धर्मनिरपेक्ष भारतात प्रत्येकाला त्याच्या धर्मानुसार/पंथानुसार आचरण करण्याचे स्वातंत्र्य असल्याचे सांगितले जाते; मात्र भारतातील बहुसंख्य हिंदूंना हे स्वातंत्र्य नाही. मुसलमान इस्लामी मान्यतेनुसार ‘हलाल’ मांसाचा आग्रह धरतात, तर मांसाहारी हिंदु आणि शीख यांच्यासाठी ‘झटका’ मांस खाण्यास मान्यता असून शीखांच्या राहत मर्यादामध्ये ‘हलाल’ मांस निषिद्ध म्हटलेले आहे. असे असतांना भारतात व्यवसाय …

Read More »

श्री भगवान महावीर जनकल्याण महोत्सवानिमित्त बेळगावात भव्य शोभायात्रा

बेळगाव : श्री भगवान महावीर स्वामींच्या 2621व्या जन्म कल्याण महोत्सवानिमित्त आज गुरुवारी बेळगावात भव्य शोभायात्रा काढण्यात आली आहे. शोभायात्रेत भगवान महावीरांच्या जीवन कार्य आणि संदेशांवर आधारित आकर्षक चाळीस चित्ररथांसह 100 बुलेट स्वार युवक-युवती सहभागी झाले आहेत. बेळगावात गेल्या 23 वर्षांपासून श्री भगवान महावीर जन्म कल्याण सोहळा भव्य स्वरूपात साजरा केला …

Read More »

वडगावात एकाचा गळा चिरून खून, नागरिकात खळबळ

बेळगाव : वडगाव नाझर कॅम्प येथील सार्वजनिक विहिरीजवळ आज गुरुवारी सकाळी एका व्यक्तीची गळा चिरून हत्या केल्याची घटना घडली आहे. मृत व्यक्तीचे नाव शंकर उर्फ बाळू पाटील (वय 46) आहे. दरम्यान सकाळी सकाळी घडलेल्या या प्रकारामुळे वडगाव परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच शहापूर पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. …

Read More »

घुमटमाळ मारुती मंदिरात उद्यापासून विविध कार्यक्रम

बेळगाव : हिंदवाडी येथील पुरातन असलेल्या श्री घुमटमाळ मारुती मंदिरात हनुमान जयंतीच्या निमित्ताने शुक्रवार दि. 15  व शनिवारी दि. 16 विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. शुक्रवारी रात्री वारकरी भजनाचा कार्यक्रम होईल. शनिवारी पहाटे चार वाजता हनुमान मूर्ती अभिषेक, पाच ते सात वाजेपर्यंत श्रीकृष्ण मूर्ती बोंगळे यांचे कीर्तन, सूर्योदयास जन्मकाल व …

Read More »

सरकारी वाहने अधिक सुरक्षित आणि अपघातमुक्त : मंत्री गोविंद कारजोळ

अपघातमुक्त चालकांना रौप्य पदक प्रदान बेळगाव : जनतेने खाजगी वाहनांपेक्षा शासकीय वाहनांचा वापर अधिक करावा. खाजगी वाहनांपेक्षा सरकारी वाहने अधिक सुरक्षित आणि अपघातमुक्त आहेत, असे प्रतिपादन जलसंपदा आणि जिल्हा पालक मंत्री गोविंद कारजोळ यांनी केले आहे. आज बुधवारी बेळगावच्या मध्यवर्ती बसस्थानकावर उत्तर पश्चिम कर्नाटक परिवहन महामंडळ, बेळगाव विभागाच्या अपघातमुक्त चालकांना …

Read More »

संकेश्वर बाजारात निळे फेटे, टोप्यांचे आकर्षण….

संकेश्वर  (प्रतिनिधी) : घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त संकेश्वर बाजारात निळे ध्वज, फेटे-टोप्या बॅच (बिल्ले) यांना मोठी मागणी दिसली. येथील पुष्पंम सेंटर दुकानात निळे बॅच (बिल्ले) हातोहात विक्री झाले. आमच्या प्रतिनिधींशी बोलताना पुष्पंम सेंटरचे मालक पुष्पराज माने म्हणाले, घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आपण दुकानात निळे …

Read More »

संकेश्वरात शनिवारी श्री हनुमान मंदिर उद्घाटन सोहळा

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर जुना पी. बी. रोड यशागोळ काॅलनीत नव्याने बांधण्यात आलेल्या श्री हनुमान मंदिर वास्तूशांती व उद्घाटन सोहळा हनुमान जयंती दिनी शनिवार दि. १६ एप्रिल २०२२ रोजी होत असल्याची माहिती चंद्रशेखर यशागोळ यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली. ते म्हणाले यशागोळ काॅलनीत उभारण्यात आलेल्या पवनपुत्र मंदिराचे उद्घाटन हनुमान जयंतीला …

Read More »

गोकाकच जिल्हा होणार : रमेश जारकीहोळी

संकेश्वर (महंमद मोमीन) : बेळगांव जिल्ह्याचा विस्तार वाढला आहे. कर्नाटकातील सर्वात मोठा जिल्हा म्हणून बेळगांवचा उल्लेख केला जातो. बेळगांव जिल्हा विभाजनात प्रामुख्याने गोकाकचा नामोल्लेख केला जात असल्याने गोकाकच जिल्हा होणार यात तिळमात्र शंका नसल्याचे माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. ते संकेश्वरला धावती भेट देऊन शिवकृपा कार्यालयात पत्रकारांशी …

Read More »