Tuesday , August 11 2026
Breaking News

खानापूरच्या वनविभागाकडून तब्बल दोन महिन्याने व्याघ्र गणना!

Spread the love


खानापूर (प्रतिनिधी) : सालाबादप्रमाणे यंदाही खानापूर वनविभागाने व्याघ्र गणना दि. 4 फेब्रुवारी पासून सुरू करण्यात आली. मात्र खानापूर वनविभागाचे एसीएफ संतोष चव्हाण यांनी तब्बल दोन महिन्यानंतर माहिती दिली.
व्याघ्र गणनेच्या निमित्ताने जंगलातील एकूण प्राण्यांची संख्याही मोजण्यात आली. त्यामुळे खानापूरच्या वनवैभवात भर पडून संख्या समजण्यास मदत झाली.
खानापूर तालुक्यातील घनदाट जंगलात वाघ, बिबटे, चितळे, सांबर, गवा, हरण, रानडुक्कर, अस्वल, रानमांजर, आदी जंगली प्राण्यांची मोठी संख्या आहे.
खानापूर तालुक्यातील खानापूर, लोंढा, नागरगाळी, गोलिहळ्ळी, भीमगड आणि कणकुंबी या सहा विभागामध्ये एकाच वेळी वाघ्रगणतीचे काम करण्यात आले.
वाघ्र गणती करताना जंगलातील वन्यप्राण्यांचा आधिवास तसेच व्यास्तव्याची संभाव्य ठिकाणे, पाणवठे, नदी नाल्याचे काठ त्याचबरोबर ये-जा करण्याचे मार्ग आशा ठिकाणी वाघाची निश्चित आकडेवारी समजण्यासाठी एकूण ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत.
तसेच अज्ञातस्थळी कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
एकच वाघ वेगवेगळ्या ठिकाणी लावलेल्या कॅमेर्‍यात दिसून येत असल्याने वेगवेगळ्या कॅमेरात एकाच वाघाची छायाचित्रे आहेत की नाही हे ठरवणे कठीण झाले आहे. त्यामुळे वाघ्र गणतीत निश्चित व्याघ्र संख्या कळण्यास वेळ गेला आहे. त्यामुळे तब्बल महिन्यानंतर एसीएफ संतोष चव्हाण यानी माहिती दिली.
खानापूर तालुक्यातील कणकुंबी आणि भीमगड वनविभागातील जंगलात चार ते पाच ठिकाणी कॅमेरामध्ये वाघाचे अस्तित्व दिसून आले. असले तरी बिबट्याच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याची शक्यता आहे.
यापैकी काही ठिकाणी अस्वल, गवे, हरण, बिबटे, आणि रानडुक्कर दिसून आले आहे. ऐवढेच नव्हे काही ठिकाणी तीन ते चार अस्वलाच्या कळपाचा कॅमेरात समावेश असल्याचे टिपण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘क्रांती सप्ताह’ आचरणातून देशप्रेम जागर: म.मं ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयाच्या उपक्रमाचा दिमाखदार प्रारंभ

Spread the love  बेळगाव : मराठा मंडळ संचलित ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय, खानापूर येथे विद्यार्थिनींच्या सर्वांगीण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *