Sunday , December 14 2025
Breaking News

Classic Layout

धरणी महिला मंडळाने पटकाविला पहिला नंबर

बेळगाव : म्हैसूर येथील कलामंदिरात डॉक्टर वीरेंद्र हेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरेन्द्र कुमार आणि अनिता सुरेन्द्र कुमार यांच्या पुढाकाराने राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित केली होती. यावेळी या स्पर्धेत बेळगावच्या धरणी महिला मंडळाने प्रथम क्रमांक पटकाविला. सदर स्पर्धेत एकूण 37 संघांनी भाग घेतला होता या स्पर्धेत संघामध्ये धरणी महिला मंडळाने प्रथम क्रमांक पटकावित …

Read More »

विद्यार्थ्यांना तत्काळ प्रमाणपत्रे उपलब्ध करून द्या

बेळगाव : दहावी आणि बारावीच्या परीक्षेला बसणाऱ्या आणि परीक्षा झाल्यानंतर दाखला घेण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना कास्ट (जातीचे प्रमाणपत्र) आणि इनकम सर्टिफिकेट तरी ती उपलब्ध करून द्या, अशा सूचना बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके यांनी केल्या आहेत. मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी यांचे हिरेमठ तहसीलदार कुलकर्णी आधी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आमदारांनी या …

Read More »

गृहमंत्री ज्ञानेंद्र, भाजप मुख्य सचिव सी. टी. रवी यांच्यावर गुन्हे दाखल करा

काँग्रेसतर्फे मागणी : शहर पोलिसांना निवेदन निपाणी (वार्ता) : बंगळूर येथे घडलेल्या घटनेवरून खरी माहिती न घेताच राज्याचे गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र व भाजपचे राष्ट्रीय मुख्य सचिव सी. टी. रवी यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे समाजामधील शांतता भंग पावली आहे. शिवाय जाती-धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाला आहे. दोघांचे वक्तव्य निंदनीय असून …

Read More »

शहापूर बसवाण्णा देवस्थानाची यात्रा भक्तीभावात

बेळगाव : खडेबाजार शहापूर येथील श्री बसवाण्णा देवस्थानच्या वतीने आज बसवाण्णा यात्रेच्या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. काल सोमवारी वाजतगाजत गाड्यांचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर आज मंगळवारी सकाळी अभिषेक, पुजा, आरती आदी धार्मिक विधी संपन्न झाले. त्यानंतर सायंकाळी निखाऱ्यावर चालण्याचा पारंपरिक इंगळ्याचा कार्यक्रम पार पडला. बसवाण्णा यात्रेला …

Read More »

शिवतीर्थ उद्घाटनाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना आम. अभय पाटील यांच्याकडून निमंत्रण

बेळगाव : बेळगाव दक्षिणचे आम. अभय पाटील यांनी आज मंगळवारी लखनौ येथे उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी यांची भेट घेतली. यावेळी आम. अभय पाटील यांनी, कर्नाटकचे मुख्यमंत्री माननीय बसवराज बोम्मई यांनी बेळगावमधील शिवचरित्राच्या उद्घाटनाचे दिलेले पत्र देऊन आमंत्रित केले. यावेळी आम. अभय पाटील यांच्या सोबत उत्तरप्रदेशचे परिवहन मंत्री दयाशंकर सिंग …

Read More »

म्हादई आंदोलन छेडण्याचा काँग्रेसला नैतिक अधिकार नाही : मंत्री गोविंद कारजोळ

बेळगाव : काँग्रेसने आपल्या सत्तेमध्ये म्हादई आंदोलनकर्त्यांवर तुरुंगात ठोकून हल्ला केला होता. या प्रश्नावर आंदोलन करण्याचा नैतिक अधिकार आता काँग्रेसच्या नेत्यांना राहिलेला नाही, अशी टीका जल संपदामंत्री गोविंद कारजोळ यांनी केली. मंगळवारी बेळगावात पत्रकारांशी बोलताना मंत्री कारजोळ म्हणाले, ‘म्हादाईसाठी मी आणि मुख्यमंत्री दिल्लीत जाऊन केंद्रीय जलसंपदा मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्याशी …

Read More »

शिवजयंती उत्सव पारंपारिक पद्धतीने तसेच मोठ्या उत्साहात साजरा करणार : नेताजी जाधव

बेळगाव : 2 मे रोजी जन्मोत्सव आणि 4 मे रोजी चित्ररथ मिरवणूक या वर्षी सार्वजनिक शिवजयंती उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्याचा निर्णय झाला. शहापूर विभाग सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाची बैठक मंगळवार दि. 12 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता श्री साईगणेश सोसायटीच्या सभागृहात झाली. अध्यक्षस्थानी नेताजी जाधव होते. गेली 2 वर्षे …

Read More »

पोलिसांसाठी 20 हजार घरे बांधणार: गृहमंत्री

बेळगाव : कर्नाटक पोलीस राज्यात सर्वोत्कृष्ट सेवा देत आहेत. पोलिस कर्मचार्‍यांना सुखा समाधानाने राहता यावे यासाठी 20 हजार नवी प्रशस्त घरे बांधण्याची योजना सुरू आहे. यामधील 10 हजार घरांचे बांधकाम प्रगतीपथावर आहे, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अरगा ज्ञानेंद्र यांनी दिली आहे. बेळगाव येथील केएसआरपी पोलीस कॉन्स्टेबल प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांच्या चौथ्या पथकाचे …

Read More »

अबणाळीत पांडुरंग अखंडनाम सप्ताहाला प्रारंभ

खानापूर (प्रतिनिधी) : अबणाळीत (ता. खानापूर) येथे सालाबादप्रमाणे यंदाही पांडुरंग अखंडनाम सप्ताहाला मंगळवारी दि. 12 रोजी प्रारंभ झाला. सकाळी पोथी स्थापना होऊन कार्यक्रमाला सुरूवात झाली. समारंभाच्या अध्यक्षस्थानी सिताराम राणे होते. यावेळी कार्यक्रमाला लैला शुगर्सचे एमडी सदानंद पाटील, निलावडे ग्राम पंचायत उपाध्यक्ष विनायक मुतगेकर, खानापूर तालुका विकास आघाडीचे अध्यक्ष भरमाणी पाटील, …

Read More »

खानापूर तहसील कार्यालयसमोर सापडले दोन दिवसाचे अर्भक

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील तहसील कार्यालयासमोरील आंब्याच्या झाडाखाली एका पिशवीत दोन दिवसाचे मुलीच्या जातीचे अर्भक सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. मंगळवारी दि. 12 रोजी सकाळी तहसील कार्यालयासमोरी आंब्याच्या झाडाखाली प्लास्टिक पिशवीत अर्भक असल्याचे भाजपच्या कार्यकर्त्यांना आढळून आल्याचे दिसताच कार्यकर्त्यांनी संबंधित सरकार दवाखान्यात चौकशी केली. मात्र प्रथम पोलीस स्थानकात तक्रार …

Read More »