खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील तहसील कार्यालयासमोरील आंब्याच्या झाडाखाली एका पिशवीत दोन दिवसाचे मुलीच्या जातीचे अर्भक सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
मंगळवारी दि. 12 रोजी सकाळी तहसील कार्यालयासमोरी आंब्याच्या झाडाखाली प्लास्टिक पिशवीत अर्भक असल्याचे भाजपच्या कार्यकर्त्यांना आढळून आल्याचे दिसताच कार्यकर्त्यांनी संबंधित सरकार दवाखान्यात चौकशी केली. मात्र प्रथम पोलीस स्थानकात तक्रार केल्याशिवाय सरकारी दवाखान्यात अर्भकाला घेण्यात आले नाही. लागलीच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन अर्भक दवाखान्यात दाखल करण्यात आले. डॉक्टर व नर्सनी अर्भकाची तपासणी करून बालकल्याण अधिकार्यांच्या स्वाधिन करून अर्भकाला बेळगावला पाठविण्यात आले.
खानापूर तालुक्यात अशी ही पहिलीच घटना घडली आहे. याबद्दल खानापूर एकच चर्चा सुरू आहे.
यावेळी भाजप नेते पंडित ओगले, किरण तुडयेकर, भुषण ठोंबरे, गोपाल भेकणे, संजू गुरव, गणेश गावडे, अनंत चौगुले, नारायण ठोंबरे आदीनी अर्भक दवाखान्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.
