Sunday , December 14 2025
Breaking News

Classic Layout

शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ दोषींवर कारवाई करण्याची मागणी

बेळगाव : सिल्वर ओक या मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज शहरातील विविध संघटनांनी पंतप्रधानांकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे. शरद पवार यांच्या मुंबईवर झालेल्या घरावर झालेला हल्ला हा सुनियोजित होता. त्यामुळे दोषींवर कडक कारवाई करण्याकरिता बेळगाव राष्ट्रवादी काँग्रेस, समिती आणि …

Read More »

परिस्थितीचा सामना करण्यासाठी देशाचे नेतृत्व समर्थ : शायना एन. सी. यांचा विश्वास

बेळगाव : युक्रेन- रशिया युद्धामुळे जागतिक स्तरावर चिंतेचे वातावरण आहे. युद्धजन्य परिस्थिती मुळे जागतिक स्तरावर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. अशा वेळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी आपल्या देशाचे नेतृत्व समर्थ असल्याचा विश्वास, महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्या शायना एन. सी. यांनी बोलताना व्यक्त केला. शायना एन. सी. या जायंटस भवन …

Read More »

इचलकरंजीत रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा डोक्यात दगड घालून खून

इचलकरंजी : शहरातील वखार भाग येथे उदय मधुकर गवळी (वय 40, रा. रेणुका नगर झोपडपट्टी) या रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा निर्जनस्थळी डोक्यात दगड घालून खून करण्यात आला. खुनाचे नेमके कारण समजू शकले नाही. मात्र कौटुंबिक कारणावरून हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. वखार भाग येथे मोहन मोहन आर्केडच्या पाठीमागे पडीक …

Read More »

खानापूरातील रक्तदान शिबीरात 50 जणांचा सहभाग

खानापूर (प्रतिनिधी) : करंबळ (ता. खानापूर) येथील श्री ज्योतिर्लिंग सर्वागिण विकास संघाच्या दशकपूर्ती सोहळ्याचे औचित्य साधुन फिटनेस क्लब खानापूर व पाटील गार्डन करंबळ क्रॉस यांच्या सौजन्याने आरोग्य भारती याच्या मार्गदर्शनानुसार रक्तदान विषयी जागृती व्हावी म्हणून रविवारी दि. 10 रोजी येथील पाटील गार्डनमध्ये आयोजित रक्तदान शिबीरात जवळपास 50 जणांचा सहभाग होता. …

Read More »

पिण्याचे, सिंचनाचे पाणी पुरवण्यास सरकारचे प्राधान्य : मंत्री जे. सी. माधुस्वामी

चिक्कोडी : चिक्कोडी तालुक्यातील कोडनी गावात चिकोत्रा नदीवर बांधण्यात आलेल्या पूल वजा बंधार्‍याचे लघु पाटबंधारे आणि संसदीय व्यवहार मंत्री जे. सी. माधुस्वामी यांनी उद्घाटन केले. लघु पाटबंधारे आणि अंतर्जल विकास खात्यातर्फे बुदीहाळ गावात वेदगंगा नदीवर आणि चिकोत्रा नदीवर बांधण्यात आलेल्या पूल वजा बंधार्‍याचे रविवारी लघु पाटबंधारे आणि संसदीय व्यवहार मंत्री …

Read More »

दरवाढीविरोधात आंदोलन करण्याचा काँग्रेसला नैतिक अधिकार नाही : मुख्यमंत्री बोम्मई

बेंगळुर : सर्वाधिक दरवाढ, महागाई करण्याचे श्रेय काँग्रेसला जाते. त्यामुळे दरवाढीवरून आंदोलन करण्याचा काँग्रेसला अधिकार नाही अशा शब्दांत मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज काँग्रेसला फटकारले. बेंगळुरातील आरटी नगरातील आपल्या निवासस्थानी सोमवारी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले, आज उडुपी येथे होणार्‍या विविध विकास कार्यक्रमांत भाग घेणार आहे. उद्या मंगळुरात पक्षाची संघटनात्मक …

Read More »

सीमाभाग चर्चेत राहील!

आप्पासाहेब महाराजांची भाकणूक : बेनाडीत बिरदेव यात्रा निपाणी (विनायक पाटील) : पावसाचे प्रमाण कमी जास्त असून अवेळी पाऊस पडेल. त्यामुळे आजार वाढवून मृत्यूची शाश्वती नाही. नवनवीन रोग झपाट्याने वाढतील. खून, दरोडे, चोर्‍या दिवसेंदिवस चालूच राहतील. साखरेचे दर कमी होऊन गुळाचे दर वाढतील. कोरोना व्हायरस नष्ट होऊन सीमाभाग चर्चेत राहील, असे …

Read More »

बेळगाव चव्हाट गल्ली येथील देवदादा सासनकाठीचा दुसरा मुक्काम सौंदलगात

सौंदलगा : बेळगाव येथील चव्हाट गल्ली येथील कै. इराप्पा धुराजी यांच्या भक्तिमार्गातून इ.स.1800 मध्ये या सासनकाठीची परंपरा सुरू असून त्यावेळेपासून चव्हाट गल्ली व बेळगाव येथील लोक बैलगाडीसह सासनकाठी घेऊन चैत्र एकादशी दिवशी जोतिबा डोंगरावर दाखल होतात. जोतिबा डोंगरावरील दक्षिण दरवाजाच्या जवळ आल्यानंतर तेथील गुरव (पुजारी) सासनकाठीची पुजा, आरती, मनाचा विडा …

Read More »

सौंदलगा येथील ऋषिकेश यादव यांची व्हॉलीबॉलमध्ये उत्तुंग भरारी

राष्ट्रीय स्तरावर निवड; सौंदलग्याच्या शिरपेचात मानाचा तुरा सौंदलगा : सौंदलगा येथील ऋषिकेश सागर यादव यास लहानपणापासूनच व्हॉलीबॉल खेळाची आवड होती. ही आवड लक्षात घेऊन त्याचे वडील सागर वसंत यादव यांनी या खेळांमध्ये करियर करण्यास संधी दिली. त्याचे ऋषिकेश याने सोने केले. ऋषीकेश यादव यांचे प्राथमिक शिक्षण सौंदलगा येथील मराठी शाळेत …

Read More »

गांजा विकणाऱ्या दोघांना सीसीबीकडून अटक

बेळगाव : जुगार मटका आणि गांजा विक्रीचे प्रकार बेळगाव शहरात सुरूच आहेत. त्यामुळे या विरोधात पोलीस सज्ज झाले असून गांजा विक्री करणाऱ्या दोघाना अटक केली आहे. सीसीबीने रविवारी ही कारवाई केली असून त्यांच्याकडून सुमारे तीन लाखाचा गांजा व साहित्य जप्त केले आहेत. या कारवाईने गांजा विक्री करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ माजली …

Read More »