राष्ट्रीय स्तरावर निवड; सौंदलग्याच्या शिरपेचात मानाचा तुरा
सौंदलगा : सौंदलगा येथील ऋषिकेश सागर यादव यास लहानपणापासूनच व्हॉलीबॉल खेळाची आवड होती. ही आवड लक्षात घेऊन त्याचे वडील सागर वसंत यादव यांनी या खेळांमध्ये करियर करण्यास संधी दिली. त्याचे ऋषिकेश याने सोने केले.
ऋषीकेश यादव यांचे प्राथमिक शिक्षण सौंदलगा येथील मराठी शाळेत झाले त्याचबरोबर माध्यमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल येथे झाले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्याने देवचंद कॉलेज अर्जुननगर येथे प्रवेश घेतला, सध्या तो बीए करीत आहे. तेथे त्याने देवचंद कॉलेजकडून व्हॉलीबॉल खेळण्यास सुरुवात केली. यावेळी व्हॉलीबॉल फेडरेशन ऑफ इंडियाचे सचिव व महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल फेडरेशनचे कार्यकारी उपाध्यक्ष, बाळासाहेब सूर्यवंशी यांनी मार्गदर्शन केले. त्याच्यातील व्हॉलीबॉल स्पर्धेतील गुण हेरून प्रा. बाळासाहेब सूर्यवंशी यांनी ऋषिकेश यास विद्यापीठांतर्गत व्हॉलीबॉल स्पर्धेत निवडले. यातूनच त्याची निवड शिवाजी विद्यापीठाकडून होऊन विद्यापीठाकडून तो महाराष्ट्रामध्ये व्हॉलीबॉल स्पर्धेत भाग घेऊ लागला. यातून भारतातील पश्चिम विभागाकडून त्याची निवड झाली व भोपाळ येथील स्पर्धेत त्याने भाग घेतला. ही निवड सार्थ करत त्याने महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल संघात आपला प्रवेश निश्चित केला. आता त्याची निवड उत्तराखंड येथील रुद्रपुर या ठिकाणी होणार्या राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी झाली आहे.
यासंदर्भात ऋषीकेश यादव याने सांगितले की, प्रा. बाळासाहेब सूर्यवंशी यांच्या प्रेरणेने व बालवीर स्पोर्ट्स क्लब निपाणीचे अध्यक्ष राजू सावंत, डॉ. भालचंद्र आजरेकर (सर) यांच्या मार्गदर्शनामुळे माजी राष्ट्रीय स्तरावर निवड झाली आहे.
