Monday , December 15 2025
Breaking News

Classic Layout

बोरगाव वादळात सापडलेल्या नुकसानग्रस्त कुटुंबियांना ‘अरिहंत’तर्फे मदत

नुकसानग्रस्त कुटुंबियांना दिलेल्या वचनाची पूर्तता : लाखोंची मदत निपाणी(वार्ता) : चार दिवसापूर्वी बोरगाव शहर परिसरात वादळी वाऱ्यासह वळिवाचा पाऊस झाला. त्यामुळे परिसरातील अनेक कुटुंबियांचे मोठे नुकसान झाले. त्यामध्ये अनेक घरांचे छत उडून जाऊन अनेक कुटुंबे उघड्यावर पडली. या घटनेची माहिती मिळताच युवा नेते उत्तम पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट …

Read More »

हिंडलग्यात 9 एप्रिलला हनुमान स्पोर्ट्स क्लबतर्फे शरीरसौष्ठव स्पर्धा

बेळगाव : हिंडलगा येथील हनुमान स्पोर्ट्स क्लबतर्फे येत्या शनिवार दि. 9 एप्रिल 2022 रोजी सायंकाळी 5 वाजता हिंडलगा ग्रा. पं. सदस्य रामचंद्र मन्नोळकर आणि एसएसएस फाउंडेशनचे संस्थापक -चेअरमन संजय सुंठकर पुरस्कृत जिल्हास्तरीय 10 वी हिंडलगा श्री -2022, ग्रामपंचायत स्तरीय 10 वी हिंडलगा क्लासिक -2022 आणि जिम पातळीवरील रुद्र क्लासिक टॉप …

Read More »

मुस्लीमांवर आर्थिक बहिष्काराचे आंदोलन : प्रमोद मुतालिक

बेळगाव : सौंदत्ती रेणुका यल्लमा देवस्थानासह बेळगाव जिल्ह्यातील सर्व हिंदू देवालयांच्या यात्रा काळात आणि देवस्थान परिसरात मुस्लिम धर्मियांकडून केल्या जाणाऱ्या व्यापाराला विरोध करून त्यांच्यावर आर्थिक बहिष्कार घालण्याचे आंदोलन श्रीराम सेनेने छेडले असल्याची माहिती श्रीराम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांनी दिली. बेळगाव येथे आज गुरुवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते …

Read More »

क्षयरोग नियंत्रणासाठी बेळगाव जिल्ह्याला रौप्य पदक

बेळगाव : क्षयरोगाच्या नियंत्रणात बेळगाव जिल्ह्याने सर्वोत्तम कामगिरी करत रौप्य पदक मिळविले असून बेळगाव जिल्ह्याला मिळालेल्या यशाबद्दल जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ यांनी आनंद व्यक्त केला आहे. शिवाय पुढील वर्षी सुवर्णपदकाचा दिशेने कार्यरत राहण्यासाठी आवाहन केले आहे. बेळगाव जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभाग आणि संघ, क्षयरोग नियंत्रण …

Read More »

तिसरे राज्यस्तरिय बेळगाव मराठी साहित्य संमेलन ८ मे रोजी

बेळगाव : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद बेळगाव जिल्हा व मराठा मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक 8 मे 2022 रोजी मराठा मंदिर बेळगाव येथे तिसरे राज्यस्तरिय बेळगाव मराठी साहित्य संमेलनाचा जागर होणार आहे. डी. बी. पाटील फोटो स्टुडिओच्या कार्यालयात जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. अध्यक्षस्थानी ॲड. सुधीर चव्हाण …

Read More »

आयपीएलवर दहशतवादाचे सावट; एटीएसने दिला इशारा

मुंबई : महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे या शहरात 26 मार्चपासून आयपीएलचा 15 वा हंगाम सुरू होणार आहे. मात्र दहशतवादी विरोधी पथकाने आयपीएल खेळवण्यात येणारी ठिकाणे आणि खेळाडूंची हॉटेल्स ही दहशतवाद्यांच्या रडावर असल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे मुंबई आणि पुण्यातील आयपीएल व्हेन्यू आणि खेळाडूंच्या हॉटेलची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. एटीएसने काही …

Read More »

हंगामाची सुरूवात होण्यापूर्वीच धोनीने अचानक कॅप्टन्सी सोडली

नवी दिल्ली : महेंद्रसिंग धोनी (एमएस धोनी) याने इंडियन प्रीमियर लीग 2022 सुरू होण्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्जचे कर्णधारपद सोडले आहे. त्याच्या जागी अष्टपैलू रवींद्र जडेजाला चेन्नईचा नवा कर्णधार बनवण्यात आले आहे. चेन्नई सुपर किंग्जने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवरून ही माहिती दिली. धोनी एक खेळाडू म्हणून संघाशी जोडला जाईल. आयपीएल 2022 च्या …

Read More »

पालकमंत्री सतेज पाटील शिवसेना संपवतील – चंद्रकांत पाटील

पालकमंत्री सतेज पाटील शिवसेना संपवतील – चंद्रकांत पाटील कोल्हापूर – पालकमंत्री सतेज पाटील शिवसेना संपवतील. त्यांच्यापासून शिवसेनेने सावध राहावे, असा टोला भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी आज येथे लगावला. कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जाताना ते बोलत होते. या …

Read More »

१०० कोटी वसुली आरोपांसह परमबीर सिंग यांच्या विरोधातील सर्व तपास आता सीबीआय करणार!

नवी दिल्ली : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी १०० कोटी वसूलीचा आरोप करत महाविकास आघाडी सरकारवर मोठा बॉम्ब टाकला. या आरोपानंतर परमबीर सिंग अनेक महिने भूमिगत होऊन फरार झाले होते. दरम्यान, त्यांच्याविरोधात खंडणी तसेच धमकी अशा बऱ्याच प्रकरणात त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. परमबीर सिंग यांनी या प्रकरणात …

Read More »

नाशिक मार्गावरचा शिंदे टोलनाका होणार बंद; तीन महिन्यांत दिलासा मिळण्याची शक्यता

नाशिक मार्गावरचा शिंदे टोलनाका होणार बंद; तीन महिन्यांत दिलासा मिळण्याची शक्यता नाशिकः केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या घोषणेनंतर आता पुणे-नाशिक महामार्गावरील शिंदे टोलनाका  आणि पुणे-सोलापूर महामार्गावरील वरवडे टोलनाका बंद होणार आहे. पुणे-नाशिक महामर्गावर शिंदे गावाजवळील टोलनाका आणि संगमनेरच्या टोलनाक्यात फक्त 52 किलोमीटरचे अंतर आहे, तर पुणे-सोलापूरच्या दरम्यान 60 किलोमीटरच्या आत …

Read More »