Tuesday , December 16 2025
Breaking News

Classic Layout

कोल्हापूर जिल्हा माहिती अधिकाऱ्यांची बेळगाव येथील वृत्तपत्रांना सदिच्छा भेट

बेळगाव : महाराष्ट्र शासनाच्या कोल्हापूर जिल्हा माहिती कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवार दिनांक ३ मार्च रोजी बेळगावमधील विविध वृत्तपत्र संपादक, चालक आणि मालकांची सदिच्छा भेट घेतली. आज बेळगाव शहरातील एका खाजगी हॉटेलमध्ये छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कोल्हापूर जिल्हा माहिती कार्यालयाचे उपसंचालक डॉ. संभाजी खराट, माहिती सहायक एकनाथ पोवार, सचिन वाघ, …

Read More »

मराठा मंडळ ताराराणी हायस्कूलच्या विद्यार्थिनींचे यश

मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठान खानापूर यांच्यावतीने सामान्य ज्ञान प्रज्ञाशोध परीक्षांचे आयोजन खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांना वाव देत सामान्य ज्ञान वाढविण्यासाठी तसेच स्पर्धा परीक्षांचा सराव होण्यासाठी येथील मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठान खानापूर यांच्या वतीने सामान्य ज्ञान प्रज्ञाशोध परीक्षांचे आयोजन मराठी भाषा दिनानिमित्त करण्यात आले होते. या परीक्षेमध्ये मराठा मंडळ ताराराणी …

Read More »

खानापूरात गजानन ट्राॅफी क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूरातील मलप्रभा क्रिडांगणावर श्री गजानन ट्राॅफी क्रिकेट स्पर्धेला गुरूवारी प्रारंभ झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका भाजपा अध्यक्ष संजय कुबल होते. यावेळी कार्यक्रमाला भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, माजी जि. प. सदस्य बाबूराव देसाई, अर्बन बॅंक संचालक मारूती पाटील, भाजप सेक्रेटरी गुंडू तोपिनकट्टी, भाजप रयतमोर्चा अध्यक्ष सदानंद होसुकर, माजी …

Read More »

जीवनाचं तत्त्वज्ञान मांडणारा जादूगार साहिर लुधियानवी : प्रा. डॉ. संध्या देशपांडे

कवी साहिर लुधियानवी यांची जन्मशताब्दी वर्ष आणि मराठी भाषा गौरव दिन साजरा : प्रगतिशील लेखक संघ आणि साम्यवादी परिवारतर्फे व्याख्यानाचे आयोजन बेळगांव (कवी. प्रा. निलेश शिंदे, बेळगांव) : अलौकआयोज्रतिभेचा कलावंत गीतकार साहिर लुधियानवींच्या कविता, गाणी लोकांच्या अजूनही आठवणीत आहेत. हेच त्यांच्या प्रतिभेचं यश. आज त्यांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू झालंय. साहिर …

Read More »

लग्नाचे आमिष दाखवून वेश्या व्यवसायात अडकविलेल्या तिघांना अटक

बेळगाव : लग्नाचे आमिष दाखवून एका नराधमाने 21 वर्षीय युवतीला वेश्या व्यवसायाकडे वळवून लैंगिक अत्याचार करणाऱ्या तिघा आरोपींना कॅम्प महिला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. समाजसेविका माधुरी जाधव, शिवकन्या पाटील, प्रमोदा हजारे यांच्या माहितीनुसार महिला पोलीस पोलीस इन्स्पेक्टर श्रीदेवी पाटील यांच्या नेतृत्वाखाली एस आय एम. बी. कुरुवत्तीमठ, …

Read More »

कोगनोळी येथे रेणुका यात्रा उत्साहात

कोगनोळी : येथील हणबरवाडी रोडवरील रेणुका मंदिरात रेणुका यात्रा उत्साहात संपन्न झाली. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मंदिर परिसरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. मंदिर परिसरात नारळ, साखर, कापूर, उदबत्ती, आईस्क्रीम, भेळ आदीसह अन्य दुकाने थाटण्यात आली होती. प्रति वर्षी कोगनोळी येथील हजारो भाविक सौंदत्ती यल्लमा डोंगरावर …

Read More »

हुक्केरी पोलीसांकडून २२५ ग्रॅम गांजा जप्त

यल्लीमन्नोळी फाट्यावर कारवाई संकेश्वर (प्रतिनिधी) : हुक्केरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महंमदरफीक तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली हुक्केरी पोलीसांनी सापळा रचून चोरीछुपे, बेकायदेशीरपणे गांजा विक्री करणारे आरोपी अजय उर्फ अमर सुभाष कोळी (वय २४) राहणार तळवार गल्ली संकेश्वर, बबलू राजासाठी नाईकवाडी राहणार सोलापूर तालुका हुक्केरी यांच्याकडून लाल रंगाच्या प्लॅस्टिक कॅरी बॅगमधील २२५ …

Read More »

खानापूर ता. समितीच्या बैठकीत माजी आमदार अरविंद पाटील यांचा निषेध

एकीच्या प्रक्रियेचे बैठकीत स्वागत खानापूर : बुधवार दि. 2 मार्च रोजी खानापूर येथील राजा शिव छत्रपती स्मारकात खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक तालुका समितीचे अध्यक्ष देवप्पा गुरव यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडली. समितीच्या जीवावर आमदारकी भूषविलेले मात्र वयक्तिक स्वार्थासाठी राष्ट्रीय पक्षाशी संधान बांधून भाजप प्रवेश केलेल्या खानापूरच्या माजी आमदार अरविंद …

Read More »

भाषिक अल्पसंख्यांकांच्या हक्कांची अमंलबजावणी करा

तालुका म. ए. समिती आणि युवा समितीचे निवेदन खानापूर : कर्नाटक शासनाच्या १९६३ व १९८१ च्या कायद्यानुसार राज्यातील भाषिक अल्पसंख्यांकाना त्यांच्या भाषेत व्यवहार करण्याचे स्वतंत्र मिळावे, तसेच केंद्रीय भाषिक अल्पसंख्यांक आयोगाच्या अल्पसंख्यांकांसाठी असलेल्या अधिकारांची अंमलबजावणी व्हावी, या मागणीचे निवेदन खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती तसेच महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने …

Read More »

अवैद्य दारू निर्मिती अड्ड्यावर छापा; तब्बल ४१ लाखांचा मुद्देमाल जप्त

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : बेकायदेशी देशी, विदेशी मद्य निर्मिती करणाऱ्या अड्ड्यावर छापा टाकून राज्य उत्पादन शुल्क विभागाने मद्य निर्मितीसाठी लागणारे साहित्य, मद्यसाठा आणि इतर साहित्य असे एकूण ४१ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. कोल्हापूर शहरापासून जवळच असणाऱ्या गोकुळशिरगाव येथील एका शेडमध्ये ही अवैद्य दारू भट्टी सुरू होती. त्यामुळे परिसरात एकच खळबळ …

Read More »