यल्लीमन्नोळी फाट्यावर कारवाई
संकेश्वर (प्रतिनिधी) : हुक्केरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महंमदरफीक तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली हुक्केरी पोलीसांनी सापळा रचून चोरीछुपे, बेकायदेशीरपणे गांजा विक्री करणारे आरोपी अजय उर्फ अमर सुभाष कोळी (वय २४) राहणार तळवार गल्ली संकेश्वर, बबलू राजासाठी नाईकवाडी राहणार सोलापूर तालुका हुक्केरी यांच्याकडून लाल रंगाच्या प्लॅस्टिक कॅरी बॅगमधील २२५ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे. आरोपीकडून घटनास्थळी २२५ ग्रॅम गांजा, रोख १५० रुपये, एक सॅमसंग मोबाईल हॅंन्डसेट जप्त करण्यात आले आहे. दोघे आरोपी चोरीछुपे बेकायदेशीररित्या गांजा विक्री करीत असल्याची माहिती मिळवून हुक्केरी पोलीसांनी कारवाई केली आहे. पोलिसांच्या हाती एकटा आरोपी लागला असून दुसऱ्या आरोपींचा शोध घेतला जात आहे. गांजा विक्री करणाऱ्या आरोपींना शिताफीने अटक करुन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे कार्य हुक्केरी पोलीस निरीक्षक महंमदरफीक तहसीलदार, पोलीस उपनिरीक्षक पत्तेण्णावर, मंजुनाथ कब्बूर, उमेश आरभांवी, मुसा अत्तार यांनी केले आहे. हुक्केरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
